बीड जिल्ह्यातील 14 हजार जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप

जिल्ह्यात चौदा हजार दोनशे जात वैधता प्रमाणपत्र वितरित

 _इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसह विविध लाभार्थ्यांना दिलासा-

 बीड, दि. 24 (वेगवान मराठी केशव मुंडे .):-  शैक्षणिक वर्ष २०२4-२5 मध्ये जिल्ह्यातील इतर मागासवर्ग विद्यार्थ्यांसह विविध लाभार्थ्यांना जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड यांचेमार्फ़त एप्रिल 2024 ते डिसेंबर 2024 अखेर तब्बल 14200 वैधता प्रमाणपत्र निकाली काढण्यात आले.

जिल्ह्यातील अनु. जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग,  विशेष मागासप्रवर्ग व एस. ई.बी.सी. प्रवर्गासाठी शैक्षणिक कामासह सरकारी कामांमध्ये, शासकीय योजनांकरता जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

वैधता प्रमाणपत्रासाठी  लागणारी कागदपत्रे व इतर बाबी वेळ खाऊ असतात. मात्र जात पडताळणी समितीमार्फ़त अशा चौदा हजार दोनशे लाभार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र समितीमार्फ़त वितरित करण्यात आलेले आहेत.

लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन व ऑफ़लाईन आलेली कागदपत्रे तपासल्यानंतर त्यामधील त्रुटी असल्यास तसे कळवले जाते.

त्यानंतर लाभार्थ्यांनी या त्रुटी पुर्तता केल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावाला तत्वत: मान्यता देऊन हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी समितीसमोर ठेवला जातो. समिती कागदपत्रांची पडताळणी करुन त्या प्रस्तावाला अंतिम मान्यता देते व त्यानुसार लाभार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरित केले जाते.

सन       प्राप्त प्रकरणे      निकाली प्रकरणे

2020-21         9060   6873

2021-22         9668   10878

2022-23         16887            12562

2023-24        13418            18215

2024-25  ( डिसेंबर 2024 अखेर)

14334            14286

एकुण    63367            62814

तरी या कार्यालयात त्रुटी पुर्ततेअभावी आपला जातीदावा समितीकडून फेटाळण्यात आल्यास तसेच शैक्षणिक प्रवेशासाठी, निवडणूक, सेवेसाठी अपात्र ठरल्यास याची सर्वस्वी जबाबदारी अर्जदार व उमेदवारांची राहील. त्यामुळे समितीच्या वतीने विशेष अभियान दरम्यान कार्यालयीन वेळेत प्रमाणपत्र पडताळणी 100 दिवसांचे लक्ष्य अंतर्गत त्रुटी पुर्तता विशेष शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या विशेष शिबीराचा जास्तीत जास्त अर्जदारांनी लाभ घ्यावा व सन २०२4-२5 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 11 वी , १२ वी विज्ञान शाखेत प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी समितीकडे अर्ज दाखल करावेत, असे अवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, बीड कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!