पाटोद्याच्य माजी सभापतीचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत सापडल्यामुळे खळबळ

वेगवान मराठी परळी: –पाटोदा दि.30 11 24
पाटोदा पंचायत समितीचे माजी सभापती गोवर्धन सानप(गवळी अप्पा )यांचा मृत्यूदेह संधिग्त अवस्थे मध्ये सौताडा शिवरात आढळून आल्याने घातपात असल्याची बातमी कळली,घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी , डॉगस्कॉड सह पाटोदा पोलीस स्टेशन, उप विभागीय अधिकारी तसेच अतिरीक्त पोलीस अधिक्षक तातडीने घटनास्थळी आल्यामुळे तपासाचे चक्र गतीने फिरवल्याचे दिसून आले,जवळपास अनेक वर्षे अशी दुर्दैवी घटना या परिसरात घडली नसल्याचे स्थानीकांकडुण सांगितले जात आहे घडलेल्या या घटनेचा तपास तातडीने केला पाहिजे.आसा सुर स्थानिकांडुण निघताना दिसत आहे.
(दबक्या आवाजात गोळी बाराच्या चर्चा देखील होत आहेत.त्यामुळे घातपात असण्याची शक्यता हि नाकारता येत नाही)
या भागातील स्थानिक गोवर्धन सानप यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची या भागात चर्चा होत होत्या. पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी एका स्थानिक वृतपत्राच्या प्रतिनिधीस बोलताना मात्र गोवर्धन सानप यांची हत्या झाली नसल्याचे पोलिस अधीक्षकांनी सांगितल्याचं समजत आहे .गोळीबाराच्या अफ़वा आहेत असे स्पष्ट केले आसल्याचे समोर येत आहे परंतु हा एक गुप्ततेचा किंवा दबावाचा भाग देखील असु शकतो आशी शंका देखील व्यक्त करण्यात येत आहे.पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेहाची तपासणी केल्यानंतर खरे कारण काय आहे ते लवकरच समोर येऊ शकते.
दरम्यान माजी सभापती गोवर्धन सानप यांचा मृतदेह सौताडा येथे आढळून आला आसुन. मागील दोन दिवसांपासून ते बेपत्ता होते. शेवटी आज दुपारी त्यांचा मृतदेह सौताडा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्यासह पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाल्याचे समजते. गोवर्धन सानप हे आष्टी मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांचे कार्यकर्ते आसल्याचे सांगण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनीच सानप यांना पाटोद्याच्य पंचायत समितीचे सभापती केल्याचे सांगितले जाते.
मागच्या दोन दिवसांपासून ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती. आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. सानपांनी आत्महत्या केली की त्यांचा घातपात करण्यात आला याचा शोध बीड पोलिस प्रशासनातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस घेत आहेत.