क्राईम

परळीतील मकोकातील फरार आरोपींना अटक

MCOCA criminals arrested from Parli

(अट्टल चैनस्नॅचिंग करणा-या मोक्यातील फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने कोम्बींग ऑपरेशन करून ठोकल्या बेड्या)

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी दिनांक 31 मार्च 2026 पोलीस ठाणे धारूर गुरन.01/2026 कलम 204,318(4),319 (2),3(5) भारतीय न्याय संहिता प्रमाणे दाखल गुन्ह्याचा समातंर तपास स्थानिक गुन्हे शाखा बीड हे करीत असतांना सदर गुन्ह्यातील घटनास्थळावरील cctv फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की,

सदरचा गुन्हा हा परळी येथील ईराणी गल्लीमध्ये राहणा-या (बाहेर जिल्ह्यातील सराईत आरोपीनी केला असुन ते सध्या ईराणी वस्ती परळी येथे राहत आहेत.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ईराणी वस्ती परळी येथे कोम्बींग ऑपरेशन करून सदरचे आरोपी ताब्यात घेण्याचे गुप्त नियोजन करण्यात आले.

दि.28.03.2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके तयार करून त्यांना कारवाईची गुप्त माहिती देवून सदरचे विशेष कोम्बिंग ऑपरेशन करण्याचे ठरवुन रात्रभर ईराणी वस्तीमध्ये आरोपीची गोपनिय माहिती घेवुन, पहाटे ईराणी वस्ती परळी येथे कोम्बीग ऑपरेशन करून छापा टाकला असता

त्याठिकाणी सराईत गुन्हेगार नामे 1) कंबर उर्फ डंम्बर शहाजहान ईराणी वय 45 वर्षे रा.श्रीरामपुर जि. आहिल्यानगर हमु ईराणी गल्ली परळी ता. परळी जि.बीड 2) हसनैन बरकतअली मिर्झा बेग उर्फ ईराणी वय 20 वर्षे रा. भिवंडी कल्याण मुबई हमु ईराणी गल्ली परळी ता. परळी जि.बीड असे दोन गुन्हेगार मिळुन आले.

त्यांच्याकडे नमुद गुन्ह्याच्या व इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने सखोल व विश्वासात घेवुन विचारपुस केली असता

त्यांनी पोस्टे धारूर गुरन.01/2026 कलम 204,318(4),319 (2), 3 (5) भारतीय न्याय संहिता गुन्हा केल्याचे सांगुन पोस्टे आष्टी गुरन. 40/2026 कलम 304(2), 3(5) भारतीय न्याय संहिता व पोस्टे शिवाजीनगर गुरन. 11/2026 कलम 304(2),3(5) भारतीय न्याय संहिता असे एकुन तीन (03) गुन्हे केल्याची कबुली दिली.

त्यांच्या गुन्हेगारी अभिलेखाची माहिती घेतली असता त्यांच्याविरूध्द इतर जिल्ह्यात गुन्हे दाखल असुन

आरोपी क्रमांक 2 हा ठाणे जिल्ह्यातील मकोका गुन्ह्यात फरार असल्याची माहिती मिळाली. सदर दोन्ही आरोपीस गुन्ह्याचे तपास कामी पोस्टे धारूर यांच्या ताब्यात देण्यात आले असुन पोस्टे धारूर त्यांच्याकडे सखोल तपास करीत आहेत.

सदर आरोपीकडुन तीन लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन त्यांच्याकडुन आणखीन गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके,

सहा. पोलीस अधीक्षक श्री. ऋषीकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि शिवाजी बंटेवाड, पोनि धनजंय ढोणे (प्रभारी संभाजीनगर परळी), पोउपनि श्रीराम खटावकर, सुशांत सुतळे,

पोलीस हवालदार मारूती कांबळे, सचिन सानप, रामचंद्र केकान, गोविंद भताने, आनंद मस्के, अशोक दुबाले, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, गोविंद राख, विकास राठोड,

स्वाती मुंडे व पोलीस अंमलदार सचिन आंधळे, अर्जन यादव, अलीम शेख, बिभीषण चव्हाण, विकी सुरवसे व चापोह नितीन वडमारे, अतुल हराळे, सिध्देश्वर मांजरे असेंनी संयुक्त केलेली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!