परळी-धर्मापुरी मध्ये पोलीसांची रेड ! मोठं घबाड हाती

परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे क्यु आर कोड वरुण अलेल्या तक्रारी वरुण पोलीसांची रेड ! तेरा लाखाचा गुटखा जप्त !
आणि सदरील कारवाई नंतर या पथकातील पोलीस कर्मचाऱ्या कडुण पोलीस अधिक्षकांना काम फत्ते झाल्याचा विवरणासह संदेश 👇
वेगवान मराठी 13 फेब्रुवारी 2025
मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी जनतेच्या तक्रारी जाणुन घेण्यासाठी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प अंतर्गत जनतेस देण्यात आलेल्या क्युआर कोडवर दिनांक 12-02-2025 रोजी पो.स्टे. परळी ग्रामिण हद्यीत मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्याकडे महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला गुटखा / तंबाखुजन्य पदार्थ असल्याची गोपनिय माहीती मिळाल्याने सदरची माहीती मा. पोलीस अधीक्षक यांनी पो.स्टे. परळी ग्रामिण प्रभारी अधिकारी यांना देऊन कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मा. पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या माहीतीवरुन प्रभारी अधिकारी पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी दोन स्वतंत्र पथके तयार करुन मौजे धर्मापुरी येथील सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांचे किराणा दुकानावर व राहते घरी दिनांक 12/02/2025 रोजी दुपारी 3 ते 5 वाजेच्या दरम्यान छापा टाकला असता दोन्ही ठिकाणी मिळुन 1) शॉट पानमसाला 2) नवरतन पान मसाला 3) विमल पान मसाला 4) V-1 तंबाखु 5) जाफरानी तंबाखु व इतर तंबाखुजन्य पदार्थ असा एकुण 13,50,000/- रुपये किंमतीचा मुद्येमाल मिळुन आल्याने सदरचा मुद्येमाल पो.स्टे. परळी ग्रामिण येथे आणुन पुढील योग्य ती कायदेशिर कारवाई करण्याकामी अन्न व औषधी प्रशासनास पत्र व्यवहार करण्यात आला असुन अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणी नंतर गुन्हा दाखल करीत आहोत.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि श्री. मजहर सय्यद, सपोनि श्री. समाधान कवडे, पोउपनि श्री. अंकुश निमुने, रियाज शेख, पोअं. विष्णु घुगे, पांडुरंग वाले, सुनिल अन्नमवार, तुळशीराम परतवाड, सुंदर केंद्रे, शंकर वाघमारे सर्व नेमणुक पो.स्टे. परळी ग्रामिण यांनी केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक यांनी सुरु केलेल्या संवाद प्रकल्प अॅपवर मिळालेल्या गोपनिय माहीतीवरुन करण्यात आलेली आहे. बीड पोलीस दलातर्फे बीड जिल्हयातील जनतेस अवाहन करण्यात येते की, संवाद प्रकल्प अॅप वर जास्तीत जास्त गोपनिय माहीती दयावी जेणे करुन अवैध बंदयावर धडाकेबाज कारवाई करता येईल. माहीती देणाराचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल.
आज रोजी आपल्या आदेशाप्रमाणे परळी तालुक्यातील धर्मापुरी येथे पोलीस अधिकारी व स्टाफसह स्वतः जाऊन इसम नामे सोमनाथ अशोक फड व बाबुराव श्रीपती मुसळे यांच्या दुकानात व अन्य ठिकाणी छापे मारून तपासणी केली
सदरील तपासणी मध्ये महाराष्ट्र राज्यात वाहतुक, विक्री व सेवनास प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला ज्यामध्ये शॉट पान मसाला, विमल पान मसाला, नवरतन पान मसाला, व्ही वन तंबाखू, जाफरानी तंबाखू
व इतर नावे असलेले गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ अंदाजे किंमत १३,५०,०००/- असा मुद्देमाल घटणास्थळी मिळाला सदरील मुद्देमाल पोलीस ठाणे परळी येथे आणून सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
तसेच अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती भोसले मॅडम यांना संपर्क करून माहिती देण्यात आली असून त्यांच्या विभागास लेखी पत्र देण्यात आले आहे.
त्यांच्याद्वारे फिर्याद व पंचनामा कार्यवाही करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवली आहे.
एकुणच काय तर आता कोणीही कसल्याही परस्थिती मध्ये अवैध धंदे करु शकणार नाहीत कारण क्यु आर कोडद्वारे तक्रार करणे तसेच माहिती पुरवीणे सोपे झाले असुण तक्रारदार आणि माहितीगाराचे नाव गोपनीय राहणार असल्याने पोलीसांना माहीती देण्यासाठी जनता समोर येऊ शकते
