संतोष देशमुख प्रकरणातील 3 आरोपींच्या पोलिस कस्टडीत वाढ

वेगवान मराठी केशव मुंडे –बीड जिल्ह्यातील मस्साजोग ता.केज येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आलेल्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे, महेश केदार आणि प्रतिक घुले या तीन आरोपींची पोलीस कोठडी दि. २३ डिसेंबर रोजी संपत होती.

आज दि. २३ डिसेंबर रोजी पोलीस बंदोबस्तात या तीनही आरोपींना केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने पुन्हा त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करीत ६ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडीत वाढ केली आहे.

दरम्यान चौथा आरोपी विष्णू चाटे यांची २७ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे. तसेच याच गुन्ह्यात आणखी तीन आरोपी फरार आहेत.

Back to top button
error: Content is protected !!