6 बाईकांसह आरोपी गजाआड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

(स्थानिक गुन्हे शाखा-वीड कामगिरी)

आंतर जिल्हा मोटार सायकल चोरी करणारा सराईत आरोपी स्था.गु.शा. वीड ने निष्पन्न करुन तव्वल 06 मोटार सायकली जप्त करुन 05 गुन्हे आणले उघडकीस

वेगवान मराठी प्केरतिनिधी शव डी मुंडे बीड मा.पोलीस अधीक्षक साहेब बीड यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिलेले आहे. त्यावरून मा.पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 09/07/2025 रोजी पोलीस पोउपनि श्री. महेश विघ्ने यांना गोपनिय माहिती मिळाली की, इसम नामे गोकुळदास बोरगे हा चोरीची मोटार सायकल विक्री करण्याकरीता गिन्हाकाचे शोधात मांजरसुंबा येथे आलेला आहे. त्यावरुन लागलीच पोलीस निरीक्षक श्री. शिवाजी बंटेवार स्था.गु.शा.बीड यांना बातमी कळवुन त्यांनी खबरेचे अनुषंगाने जावुन कारवाई करण्याचे आदेश दिल्याने पोउपनि श्री. महेश विघ्ने व त्यांचे पथकातील अंमलदार यांनी मांजरसुंबा येथील शिकर इंग्लीश स्कुल येथे आरोपीचे राहते घरी जावुन शोध घेतला असता त्याचे घरासमोर एक मोटार सायकल मिळुन आली सदर मोटार सायकल बाबत विचारणा केली असता सदरची मोटार सायकल त्याने बीड येथुन चोरी केली असल्याचे सांगितले. त्यास ताब्यात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्याने सोलापुर, अहिल्यानगर, बीड येथुन वेगवेगळ्या ठिकाणांवरुन एकुण 06 मोटार सायकल चोरी केल्या असल्याचे सांगितले. सदरच्या मोटार सायकल ह्या त्याचे ताब्यातुन जप्त करण्यात आलेल्या असुन अभिलेखावरील खालील प्रमाणे गुन्हे उघडकीस आलेले आहेत.

जप्त केलेली वाहने अ.क्र. पो.स्टे.चे नाव

शिवाजीनगर (बीड) केज (बीड) पेठ बीड (बीड)वडवणी (बीड)सदर बाजर (सोलापुर शहर)

गुरनं327/2025 ,317/2025,154/2022,149/2025,456/2025

कलम303(2)BNS303(2)BNS379 भादंवि303(2)BNS303(2)BNS

बाईकचे वर्णन

होन्डा शासन,स्प्लेंडर,स्प्लेंडर प्रो,HF डिलक्स,स्प्लेंडर प्लस,स्प्लेंडर प्लस

आरोपी नामे गोकुळदास मगर बोरगे रा. बाभळखुटा ता. जि.बीड याचे ताब्यातुन एकुण 06 मोटार सायकली कि.अं. 1,50,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर आरोपीचा पुर्व इतिहास पाहता तो मोटार सायकल चोरी करण्याचे सवईचा असुन स्था.गु.शा.बीड ने त्याचेकडुन यापुर्वी सन 2024 मध्ये 22 मोटार सायकल जप्त करुन 18 गुन्हे स्था.गु.शा. बीड ने उघडकीस आणले होते.

सदरची कामगिरी मा.श्री. नवनित काँवत पोलीस अधीक्षक, बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री. शिवाजी बंटेवाड पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. बीड, यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री. महेश विघ्ने, पोह/महेश जोगदंड, पोह जफर फर पठाण, पोह/दिपक खांडेकर, पोअं/बाप्पासाहेब घोडके, चापोह/गणेश दराडे सर्व स्था.गु.शा.बीड यांनी मिळून केलेली आहे.

Back to top button
error: Content is protected !!