बीड प्रकरणी धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरोपांना शरद पवार पक्षाच्या नेत्याचे उत्तर

राजकारणा साठी राजकारण जरूर करावे पण जनतेच्या प्रश्नासाठी राजकारण बिलकुल नसावे
– देवराव लुगडे महाराज (परळी एणसीप एसपीचे नेते)
वेगवान मराठी परळी (प्रतिनिधी ) दि -30 जुन 2025 बीड येथील उमाकिरण क्लासेसच्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेतीला आरोपांना देवराव लुगडे महाराज यांनी दिले रोखठोक उत्तर – ( सत्याप्रती बोलू काही…)
बीड प्रकरणावर तब्येत ठीक नसतानाही बोलताना खूप त्रास होत होता मध्यंतरी झालेल्या बेल पाल्सी आजारामुळे बोबडी वळत असतानाही आ धनंजय मुंडे यांनी तत्परता दाखवत बोबडी न वळता स्पष्ट शब्द उच्चारत पत्रकार परिषद घेतली त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि आभार मानतो आसे शाब्दिक टोले मारत परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे परळी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज व्यक्त केले.
आरोपी हा आरोपीच आहे आणि माणुसकीला काळीमा फासणार्या घटनेतील आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे त्याचं कुणीही समर्थन करणार नाही आणि मला तरी कोणी केलेलं दिसत नाही.
कारण त्या नीच प्रवृत्तीचे आम्ही सर्व जाती धर्मातील 98 टक्के लोक नक्कीच नाहीत. बाकी तुम्ही सर्व जाती धर्मातील 2 टक्के कसे आहेत त्याबद्दल मी इथे बोलणार नाही.
पण आमदार साहेब जी तत्परता बीडच्या प्रकरणांमध्ये तुम्ही दाखवली हीच तत्परता कै संतोष अण्णा देशमुख यांच्यासह परिळीमध्ये अनेक प्रकरण घडली त्यावेळेला का दाखवली नाही ? ज्याचा उल्लेख मी काही कारणास्तव या ठिकाणी करत नाही.
माझ्या कडेही परळी मध्ये असे अनेक कुटुंब आहेत ज्यात अनेक महिला मुली आहेत त्यांचं आयुष्य बरबाद केलं आहे कोणी केलं त्या मागचे सूत्रधार कोण होते कोणाच्या पाठिंब्याने हे सगळं केलं त्यांचा पाठीराखा कोण होता त्याबद्दल सध्या तरी मी इथे बोलणार नाही कारण विषयांतर नको त्यामुळे माझा प्रश्न आहे की हीच तत्परता परळीतल्या अनेक प्रकरणांमध्ये तुम्ही दाखवली का नाही ?
2019 विधानसभेमध्ये खूप मोठ्या ताकदीने तुम्हाला निवडून दिले विजयी झाल्यानंतर परळीतील व्यापाऱ्यांनी खूप मोठ मोठ्या कपडे वाल्यांनी कपड्याच्या, भांड्यावाल्यांनी भांड्याच्या, सोन्याच्या व्यापाऱ्यांनी सोन्याच्या कमानी उभारून आपले खूप मोठे परळीच्या मोंढा मैदानात स्वागत केले होते आणि याच स्वागत सभेमध्ये आपण परळीत पूर्णपणे सुरक्षित आणि व्यापाऱ्यांना संरक्षण मिळेल
स्वतंत्रपणे व्यापार करण्यासाठी सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले पण पुढील काही दिवसातच व्यापाऱ्यावर हल्ले झाले अन्याय अत्याचार गुंडागर्दी चालू झाली अनेक व्यापाऱ्यांच्या एजन्सी लाटल्या परळी शहरातील व्यापारी आजही दहशतीच्या वातावरणात व्यापार करत आहे हे कोणामुळे व कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे
याचेही आत्मचिंतन आपण कराल व करावच तुमच्या सत्तेतील काळात परळी मध्ये असंख्य प्रकरण घडले आहेत ज्याचे पुराव्यानिशी मी या ठिकाणी दाखले देऊ शकतो पण आता देणार नाही वेळ प्रसंगी नक्कीच देईल.
बीड प्रकरणांमध्ये आमदार संदीप भैया क्षीरसागर तुम्ही दोषी मानता त्यांचा सी डी आर तपासण्याची मागणी करता मग तुमचे वाल्मीक कराड सोबतचे आर्थिक सह सर्वच बाजूने नाते किती घट्ट आहे हे सगळ्या जगाला माहित आहे तरीही तुम्ही निर्दोष कसे काय ? तुम्ही पण तेवढेच दोषी असायला पाहिजेत का नाही ?
आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून हे बरोबर नाही न्याय हा समान असालाच पाहिजे बीड मधल्या प्रकरणाचं कुठल्याच माणसाने समर्थन केलं नाही आम्ही तर म्हणतो अशा नराधमांना तात्काळ सजा झाली पाहिजे
पण तुमच्या सोबतच्या रात्रंदिवस असणाऱ्या माणसाने केलेल्या नीच प्रवृत्तीचं तुमच्याच बांडगुळांनी मोठ्या ताकदीने समर्थन केल आहे किंवा आजही करतात तेव्हा तुम्ही गप्प का ?
अवादा कंपनीकडून घेतलेली खंडणी कोणासाठी होती हे न कळण्याएवढी बीड जिल्ह्यातील जनता दूधखुळी नाही आणि महत्त्वाचं परळी मध्ये जाधव आणि गायकवाड कुटुंबातील मुलींचे प्रकरण ह्या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना होत्याच पण ती प्रकरण एवढं भयानक असून सत्तेचे आणि पैशाच्या जोरावर दाबण्यात आलं.
त्या दोन्ही कुटुंबातील मुलींनी स्वतःचं आयुष्य संपवलं आणि ते कुटुंब येथून मजबूर होतं स्थलांतरित झालं.
अशा काही घटना परळीमध्ये घडल्यात तेव्हा ती तत्परता का दाखवली नाही आणि महत्त्वाचं काही प्रकरणावर तर वेळ प्रसंगी नक्कीच बोलण्याचा प्रयत्न राहील पण आज ती वेळ नाही
महाराष्ट्रामध्ये पाठीमागे एका रेणू शर्मा नावाच्या महिलेवर असाच अन्याय अत्याचार झाला आहे आशा बातम्या टीव्हीवर बघण्यात आल्या होत्या त्याही महिलेला न्याय मिळो व त्या प्रकरणातील जे कोणी दोषी आहे त्याला कडक सजा मिळो.
बीड प्रकरणांमध्ये त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे तसेच महिलांचेच नाही तर परळीच्या भागांमध्ये अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांवर अन्याय अत्याचार झाले आहे अनेकांना परळी सोडून स्थलांतरित व्हावं लागलं आहे किंवा गप गुमान परळीमध्येच राहाव लागला आहे त्यांनाही न्याय मिळो.
आमदार साहेब परळीची बदनामी सगळ्या महाराष्ट्रात एवढ्या भयानक पद्धतीत झाली आहे की बाहेर गेल्यानंतर याचा प्रत्यय पावलो पावली येत आहे त्याला कारणीभूत तुमच्यासह आपण परळीकर सगळेच आहेत.
आपण परळी कडे विशेष लक्ष देऊन जो काही परळी मध्ये आजही नंगानाच चालू आहे त्याला थांबवण्यासाठी आपण हीच तत्परता दाखवावी
आम्ही परळीकर म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून नक्कीच सोबत आहोत.
परळीतील सर्व काही सुरळीत करण्यासाठी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार करणाऱ्याला सुता सारखं सरळ करण्यासाठी चुकीला चूक खऱ्याला खरं म्हणण्याची ताकद धमक तुमच्यामध्ये एक लोकप्रतिनिधी म्हणून असायलाच पाहिजे
आणि ती आपण ठेवाल आपला कोण परका कोण हे न बघता जो कोणी चुकीचा आहे त्याला सजा देण्याची ताकद धमक तुमच्यामध्ये राहावी हीच माफक अपेक्षा…
शेवटी आज ना उद्या सत्य बाहेर येत असतं जनता जनार्दन उघड्या डोळ्यांनी बघत आहे नक्कीच या प्रसंगी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी एकच नम्र प्रार्थना आहे की या निच प्रवृत्तीच्या लोकांना सद्बुद्धी मिळू दे असे गुन्हे न घडण्यासाठी त्यांना चांगली अक्कल येऊ दे
आणि अशा घटनेच्या आडून स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी बीड जिल्ह्यातील जनतेत दरी निर्माण करणाऱ्या निर्दयी निर्लज्ज काही नेत्यांना लाज, भान, अक्कल येऊ दे हीच पुन्हा एकदा प्रभू वैद्यनाथाच्या चरणी प्रार्थना करत दिव्याखाली खूप मोठा अंधार असताना आमदार धनंजय मुंडे दुसऱ्याचा अंधार दाखवत आहेत
याच खूप मोठे आश्चर्य व्यक्त करत सौ चूहे खाकर बिल्ली चली हज अशी अवस्था आमदाराची झाली असल्याची परखड टीका आमदार धनंजय मुंडे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मा तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज यांनी केली.