परळी येथील विजय बडे मावळा पुरस्काराने राजगडावर सन्माणीत

!! हा सन्मान परळी च्या मातीचा आणि प्रभू वैजनाथाच्या आशीर्वादाचा !!
!! हा पुरस्कार माझ्या गोरक्षक टीम आई वडील आणि मार्गदर्शक यांना समर्पित करतो !! – विजय बडे
वेगवान मराठी प्रतिनिधी परळी दि 10 जुन 2025 परळी वै जि बीड येथील हिंदुराष्ट्र सेनेचे परळी तालुका प्रमुख गोरक्षक विजय बडे यांना गोरक्षण या पवित्र कार्यात शिवराज्य अभिषेक दिनी किल्ले राजगड येथे मावळा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
देव देश धर्म.कार्यात काम करत असताना अनेक अडचणीवर मात करून अनेक हल्ले सहन करून गो मायेच्या प्राणाचे रक्षण केले म्हणून शिव राज्याभिषेक सोहळ्यात किल्ले राजगड येथे पुरस्कार देऊन सन्मानित केले
मावळ मतदार संघाचे आमदार सुनील अण्णा शेळके गुरुवर्य गोरक्षकांचे कवच मिलिंद भाऊ एकबोटे .हिंदुवादी हभप संग्राम बापू भंडारे हभप कोकरे महाराज व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला