ड्रॉ तांदळे यांचे चोरी झालेले दागीने पोलीसांनी जशास तसे केले स्वाधिन

चोरीस गेलेले साडे दहा लाखाचे दागिने फिर्यादीस केले परत.

वेगवान मराठी प्रतिनिधी दि 23 जुन बीड: पोलीस ठाणे बीड शहर येथे चोरीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांचे घरातून दागिने चोरी गेले होते.. बीड शहर पोलिसांकडून चोराचा शोध होऊन त्याला अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

आज दिनांक 23 जून रोजी चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने मुद्देमाल हा मुळ मालकास परत करण्यात आला आहे. यावेळी डॉक्टर लक्ष्मीकांत तांदळे यांनी आभार व्यक्त केले .पोलीस अधीक्षक श्री नवनीत काँवत यांच्या या कार्यपद्धतीमुळे नागरिकांमध्ये विश्वास वाढीस लागला आहे.

पोलिस अधीक्षक श्री. नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक श्री सचीन पांडकर, शितलकुमार बल्लाळ, सहा.पोलीस निरीक्षक-बाबा राठोड व पोलिस अंमलदार बालाजी मुळे यांचे उपस्थितीत सोन्याचे दागिने फिर्यादीस सन्मानपूर्वक परत करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!