बीड च्या एसपीं समोर काय आहेत आव्हाणे

वेगवान मराठी बीड -केशव मुंडे 22 12 24 –नियुक्तीच्या दिवशीच कार्यभार स्विकारत बीड जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या संदर्भातील जबाबदारी गांभिर्याने घेत असल्याची चुणुक नवनियुक्त पोलिस अधिक्षक नवनित कॉवत यांनी दाखवुण दिली आहे.

एस पी नवनीत कॉवत यांना खालील गोष्टींना घालावा लागेल आळा 👇

१) जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात जनतेला वेठीस धरुण त्यांच्या कडुण पैसे उकळण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पोसलेले दलाल कार्यरत आहेत,

2) बीड जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनला विविध अवैध धंदे आणि बेकायदेशीर व्यवहारांचे हाफ्ते ठरलेले आहेत,

३) बीड जिल्ह्यातील शासकीय सेवेतील कर्मचारी अधिकारी एवढेच नाही तर पोलीस प्रशासणातील बहुतांश कर्मचारी हे राजकीय पुढाऱ्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होऊण बसलेत,

4) वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी चिटकुण राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या तात्काळ करणे आवशयक आहे

5) राजकीय पुढाऱ्यांणी पाळलेले छप्परी कार्यकर्ते,चिंधीचोर गुंडे,अवैध दारुचे अड्डे,अवैध गांजाची लागवड आणि विक्री अवैध गुटखा विक्री,अवैधपणे सुरु असलेली गायी आणि बैलांची तस्करी

6) भुमाफीया,वाळुमाफीया,विमामाफीया,चंदनचोर -खंडणीखोर,माफीया,अवैध ढाबे,हॉटेल्स,बार,आणि महिलांवर होणारे आत्याचार,बलात्कार,

7) राजकीय पुढाऱ्यांच्या दबाव धुडकाऊण अवैद्य धंद्यांवर धाडी टाकुण काळ्या धंंद्यांवर प्रतिबंध घालणे आवशयक आहे

8) बीड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विशेषता परळी तालुक्यातील मिसरुड न फुटलेल्या अंडकुला एवढाल्या एवढाल्या गाबड्या जवळ आसलेले पिस्टल,गावठी कट्टे,चौपर,सतुर,वाघनखं,इत्यादी घातक हात्यारांचा सुरू असलेला वापर,बोगस कामे,आणि फसवणुक करणारे 420-तसेच उच्चभ्रु समाजाच्या आडुण सुरू असलेले काहींचे काळे गोरख धंदे…

9) बाहेरील राज्यातील किंवा बाहेरील जिल्ह्यातील गुत्तेदार,किंवा व्यवसायीकांना राजकीय पुढारी व विशेषता लोकप्रतिनिधीं पासुण अभय मिळवुण देणे,

१०) बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे आणि मागील 10 वर्षापासुण झालेल्या खुनांचा तपास पुन्हा करुण सत्य बाहेर काढणे इत्यादी

बीड जिल्ह्यात स्वच्छता अभियाण करायाचेच आसेल तर वरील गोष्टींवर काम करावेच लागेल आणि चर्चेतुन ऐकलेल्या कॉवत साहेबांच्य कामाच्या कौतुकाचे किस्से पाहता कॉवत साहेब बीड जिल्ह्यातील जनतेला भयमुक्त करतील याची खात्री आहे,पोलीस अधिक्षक साहेबांना पुढील कार्यास शुभेच्छा…

पत्रकार -केशव मुंडे वेगवान मराठी 8888387 622 परळी वैजनाथ बीड महाराष्ट्र – 431515

Back to top button
error: Content is protected !!