2020 मधला विमा शेतकऱ्यांना देण्यासंदर्भात न्यायालयाचे आदेश

केशव मुंडे वेगवान मराठी परळी बीड
बीड प्रतिनिधी दि-17-10-24 शेतकरी नेते भाई गंगाभिषन थावरे यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने बिड जिल्हाधिकारी आणि राज्य सरकारला याबाबत निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत ..न्यायालयात दाखल याचिकेतून महसूल व कृषी विभागाचे पंचनामे गृहीत धरुन शेतकऱ्यांना 2020 मधला विमा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तर याच मागणीसाठी 7 ऑक्टोबर 2020 रोजी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले होते. तर 1 जुलै 2021 रोजी विमा कंपनीविरोधात बैलगाडी मोर्चा काढण्यात आला होता.तसेच 1 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायत समोर बोंबाबोंब आंदोलन केले होते. तरीही याची दखल ना सरकारने घेतली आणि नाही विमा कंपनीनं. त्यानंतर या प्रकरणी 4 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली. यानंतर आता राज्य शासनासह, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त आणि बीडचे जिल्हाधिकारी यांना नोटीस बजावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.