परळी मध्ये पोलीसांची रेड ! देशी,विदेशी अवैध दारु पकडली

अवैध दारु वाहतुकीवर परळी पोलीसांची कारवाई देशी विदेशी दारुची चोरटी वाहतुक रोखली
वेगवान मराठी प्रतिनिधी परळी केशव डी.मुंडे –आज दिनांक 25/02/2025 रोजी पहाटे 04:00 वाजेच्या सुमारास परळी शहर पोलीसांना गोपनीय माहीती मिळाली की, एक इसम हा त्याच्याकडील टाटा इंडीका कारमधुन अवैध दारुची वाहतुक करीत असल्याची माहीती मिळाली होती.
मिळालेल्या माहीतीची खात्री करण्यासाठी परळी शहरचे पथक शासकीय वाहनाने रवाना झाले असता, अंबाजोगई रोडकडून एक चारचाकी येतांना पथकाला दिसली. पोलीसांनी सदर वाहनास थांबवीण्याचा प्रयत्न केला असता पोलीसांना पाहून सदर इसम हा त्याची कार घेवुन पळू लागला.
त्यावेळी परळी शहरच्या पथकास सदर वाहनावर संशय बळावल्याने त्यांनी सदर वाहनाचा पाठलाग केला
असता सदर इसम याने 4:30 वाजच्या सुमारास परळी शहरातील आझाद चौकात त्याच्याकडील टाटा इंडीका
कार सोडुन पळून गेला. पोलीसांनी सदर गाडीची झडती घेतली असता सदर टाटा इंडीका कार क्रमांक MH
23 6580 मध्ये देशी विदेशी दारुचे एकुण 21 बॉक्स मिळून आले. पोलीस पथकाने रुपये 1,14,3360/-
किंमतीचे देशी विदेशी दारुचे 21 बॉक्स व रुपये 3,00,000/- किंमतीची टाटा इंडीका कार क्रमांक MH 23
6580 असा एकुण 4,14,360/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस स्टेशन परळी शहर येथे टाटा
इंडीका कारच्या चालका विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास परळी शहर पोलीस करीत आहेत. फरार
आरोपीचा शोध सुरू आहे. नागरीकांना अवैध धंद्यांबाबत माहीती द्यायची असल्यास त्यांनी QR Code स्कॅन
करुन माहीती द्यावी, जेणेकरुन पोलीसांना अवैध धंद्यांवर प्रभावी कारवाया करता येईल. तसेच माहीती
देणाराचे नाव, ओळख व मोबाईल क्रमांक गुप्त ठेवले जाईल.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक श्री. नवनित कौवत (भा.पो.से.), अपर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके, पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ नाचण यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा/1224 बालाजी दराडे, पोहवा/562 भास्कर केंद्र, पोहवा बापू नागरगोजे, पोहवा/1620 सुरज गुट्टे, पोना/1918 गोविंद भताने, पोकॉ/1261 रामकिसन रेडेवाड, पोकों/1313 पंडीत पांचाळ यांनी केली आहे.