बीड ब्रेकींग-पोलीस कॉन्सटेबल अनंत इंगळे यांची आत्महत्या

वेगवान मराठी बीड क्राईम-K.D.MUNDE -8 जानेवारी २०२५ खरच बीड जिल्ह्यात चाललय काय कालच आंबाजोगाई येथुन जवळच असलेल्या ठिकाणावर एका इसमचा संशयास्पद अवस्थेत मृत देह सापडला होता तर आज सकाळी सकाळी चक्क पोलीस हेड क्वॉर्टरमध्ये राहत्या घराच्या बाजूस झाडाला गळफास लावून एका पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे..👇

बीड शहरातील नगर रोडवरील पोलीस वसाहतीतील राहत असलेले पोलीस शिपाई अनंत मारोती इंगळे मु कळंमआंबा ता. केज जि बीड यांनी राहत्या घराच्या बाजूस झाडाला गळफास लाउण आत्महत्या केली आहे

अनंत इंगळे हे बीड पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते. आज सकाळी गळफास घेतल्याचे निदर्शनास आल्यामुळे नागरिकांनी याची माहिती शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली असता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून  प्रेत शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे आत्महत्येचे कारण मात्र आतापर्यत समजलेले नाही .

Back to top button
error: Content is protected !!