बीड जिल्ह्यातल्या या तांड्याचे महसुली गावात रुपांतर

मौजे निमगाव मायंबा‘लमाणतांडा’ला महसूली गावात रूपांतर करण्याची अधिसूचना जारी
वेगवान मराठी प्रतिनिधी बीड, दि, 5 मार्च 2025 (केशव डी.मुंडे ) :- शिरूर कासार तालुक्यातील मौजे निमगाव मायंबा अंतर्गत असणाऱ्या लमान वाडी तांडा क्रमांक दोन ला लमान तांडा अधिसूचना रद्द करून महसुली गावात रूपांतरित करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी जाहीर केली आहे.
याबाबतच्या आदेशात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय अधिसूचना महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी 1076/63923/म-6 दि. 1 जुलै 1976 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.41) त्याच्या कलम 4 च्या पोटकलम (1) च्या परंतुकाखाली राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत.
त्यांचा वापर करुन मी, अविनाश पाठक, जिल्हाधिकारी बीड मौजे निमगाव मायंबा अंतर्गत अधिसूचना दि. 28 फेब्रुवारी 2011 अन्वये रुपांतरीत करण्यात आलेले लमाणवाडी नं. 1 व अधिसूचना दि. 31.01.2022 अन्वये रुपांतरीत करण्यात आलेले लमाणवाडी तांडा क्र. 02 अधिसूचना रद्द करत असून याव्दारे दि. 31.04.2025 पासून बीड जिल्हयाच्या शिरुर कासार तालुक्यातील मौजे निमगांव मायंबा पैकी एकच ‘लमाणतांडा’ला महसूली गावात रुपांतर करीत आहे.
सोबतच्या परिशिष्टामध्ये प्राथमिक स्वरुपात प्रसिध् करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केले आहे.सोबत अधिसूचनेची परिशिष्ट यादी खालील प्रमाणे आहे.
