एका शतकाचा प्रवास संपला ! सारडगांवची आलमा माय काळाच्या पडद्या आड

!! आलमाबाई आघाव यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन; !! वारकरी संप्रदायाची सेवाभावी ज्योत मालवली !!
!! राजकीय सामाजिक व सांप्रदायिक क्षेत्रातील मान्यवरां कडुण श्रद्धांजली !!
!! सारडगांवच्या आलमा माय काळाच्या पडद्याआड !! ग्रामस्थ आणि नातेवाईकां मध्ये शोककळा !! शोकाकुळ वातावरणात अंत्यसंस्कार संपन्न !!
परळी वैजनाथ, प्रतिनिधी :वेगवानमराठी 2/9/26 बुधवार – पंडित आण्णा आणि मुंडे साहेबां पासुण ते संपुर्ण सारडगांव त्यांना आलमा माय म्हणुन आदरणे संबोधायचे त्याच आलमाबाई निवृत्ती आघाव काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत ,मुंडे घराण्याचे खंदे समर्थक तथा सारडगांव चे माजी सरपंच, चेअरमन, कै.उत्तमराव निवृत्ती आघाव यांच्या त्या मातोश्री आणि वैजनाथ कारखाण्याचे संचालक एणसीपीचे नेते संजय उत्तमराव आघाव यांच्या त्या आजी होत्या
त्यांच्या पश्चात् भगवान निवृत्ती आघाव ( मुलगा ) छगाबाई सानप ( मुलगी ) केशव उत्तमराव आघाव ( नातु ) संजय उत्तमराव आघाव ( नातु ) महादेव उत्तमराव आघाव (नातु) पतरुंड,चितरुंड व भरगच्च आसा परीवार आहे
वारकरी संप्रदायाच्या सेवेत आपले संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या आलमाबाई निवृत्ती आघाव यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदायासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, एक सेवाभावी, संस्कारशील आणि मायाळू व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.
आलमाबाई यांनी आयुष्यभर वारकरी संप्रदायाची मनोभावे सेवा केली. केदारेश्वर महाराजांच्या सेवेतही त्यांनी मोठे योगदान दिले.
सप्ताह, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध प्रसंगी येणाऱ्या वारकऱ्यांची त्या अत्यंत आपुलकीने सेवा करीत असत. सप्ताहासाठी आलेला वारकरी चहा-पाणी, जेवण घेतल्याशिवाय किंवा उपाशीपोटी परत जाऊ नये, याची त्या नेहमी काळजी घेत असत.
तब्बल १०२ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी सेवाभावाची परंपरा जपली. माऊलींच्या दिंडीत त्या आयुष्यभर सहभागी होत असत. वारकरी, संत-महंत आणि धार्मिक परंपरेविषयी त्यांच्या मनात असलेली श्रद्धा त्यांच्या आचरणातून सातत्याने दिसून येत होती.
घरातील सर्वांनाही त्यांनी प्रेम, माया आणि चांगले संस्कार दिले.
साधेपणा, सेवाभाव, भक्ती आणि वारकरी परंपरेशी निष्ठा हीच त्यांच्या जीवनाची ओळख होती. त्यांच्या निधनाने कुटुंबीयांनी एक प्रेमळ आधार गमावला असून वारकरी संप्रदायानेही एक निष्ठावंत सेवेकरी गमावला आहे.
अखिल भारतीय वारकरी भजनी मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
हभप सागर महाराज,हभप भरत महाराज,यांनी आलमाबाई आघाव यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करुण भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली
अंत्यविधीस माजी आमदार संजय दौड़, जि.प.सदस्य मधुकर आघाव,माजी सभापती प्रभाकर फड,जिवराज ढाकणे श्रीहरी मुंडे आणि परळी तालुक्या सह अनेक ठिकानांहुण अप्तेष्ठ मित्र परीवार व सारडगांव ग्रामस्थ उपस्थित होत