कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी शेवट पर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या महादेव केंद्रे यांचे निधन

!!! दु:खेद वार्ता !!! सारडगांव येथील जेष्ठ नागरिक महादेव नामदेव केंद्रे यांचे वृद्धापकाळाने निधन

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे परळी वैजनाथ दिनांक 8 नोव्हेंबर 2025 परळी तालुक्यातील सारडगांव येथील जेष्ठ नागरिक तथा कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी शेवट पर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या महादेव नामदेव केंद्रे (वय 85 ) यांचे काल दिनांक 7 नोव्हेंबर शुक्रवार रोजी वृद्धापकाळाने निधन झाले आहे

आज दिनांक 8 नोव्हेंबर शनीवारी रोजी सकाळी 9 वाजता सारडगांव येथील सार्वजनिक स्मशानभूमी ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले

कै.महादेव केंद्रे यांच्या मातोश्री कै.हरीबाई नामदेव केंद्रे या सारडगांव ग्रामपंचायत च्या सलग चार वेळा सदस्य राहिल्या होत्या ! कै.महादेव केंद्रे यांच्या पश्चात त्यांना वाल्मिक, बाबुराव अशोक व दिनानाथ केंद्रे आसे चार मुलं व एक मुलगी देहुबाई असा परीवार आहे सारडगांव येथील प्रतिष्ठित नागरिक रुस्तुम निवृत्ती केंद्रे यांचे ते चुलते होते

दरम्यान आज अंत्यसंस्कार विधीसाठी जि.प.सदस्य प्रा.मधुकर आघाव यांच्या सह सारडगांव येथील महिला व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Back to top button
error: Content is protected !!