राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना किसान दिनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन

शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमीभाव देऊन खरेदी केंद्र सुरू करा. विजेचे खाजगीकरण थांबवा- प्रा. सुशीलाताई मोराळे
वेगवान मराठी केशव मुंडे बीड प्रतिनिधी:- दिनांक 23 डिसेंबर हा राष्ट्रीय शेतकरी दिवस संपूर्ण देशात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य म्हणून आज संपूर्ण देशभर संयुक्त किसान मोर्चा नवी दिल्ली व किसान संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना शेतकऱ्यांच्या मागण्याचे निवेदन प्रा. सुशीलाताई मोराळे राष्ट्रीय उपाध्यक्ष किसान संघर्ष समिती मार्फत देण्यात आले.


दिवसेंदिवस शेती क्षेत्र कार्पोरेटच्या घशात घातले जात आहे. पंजाब हरियाणा चा शेतकरी या विरोधात लढत आहे. जगजीत सिंग डल्लेवाल हे प्राणांतिक उपोषणाला बसले आहेत. त्यांचा प्राण धोक्यात आला आहे मात्र सरकार एक शब्द बोलत नाही. देशात एनडीए 3 सरकार लोकशाहीची हत्या करत आहे. पंजाबच्या शंभू व खनौरी सीमावर हजारो शेतकरी बसले आहेत. अश्रुधुर, रबराच्या गोळ्या, पाण्याचे फवारे त्यांच्यावर सोडले जात आहेत. अत्यंत क्रुरतापूर्वक हे आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे. गेली 21 दिवस ग्रेटर नोएडाच्या जेलमध्ये शेतकऱ्यांना कोंडले आहे. नवी राष्ट्रीय कृषी बाजार नीती, तीन कृषी कायदे मागच्या दाराने पुन्हा पारित करण्याचा डाव आहे. राष्ट्रीय कृषी बाजार नीती परत घ्या, डिजिटल कृषी मिशन व राष्ट्रीय सहयोग निती वापस घ्या. संघर्ष करणाऱ्या शेतकरी संघटनांशी चर्चा करा‌. एम एस पी ऋण माफी धोरण अंमलबजावणी करा. विजेचे खाजगीकरण थांबवा. शेतकऱ्यांचे दमण तंत्र थांबवा. जगजीत सिंग डल्लेवाल चे प्राण वाचवा. आशा मागण्या किसान किसान संघर्ष समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड यांच्यामार्फत राष्ट्रपती द्रोपदी मुरमु यांना निवेदन देवुन केल्या आहेत. या निवेदनावर माऊली शिरसाट बबनराव आंधळे राजेंद्र दराडे सचिन गवळी उद्धव सानप तुकाराम बारगजे इत्यादींच्या सह्या आहेत

Back to top button
error: Content is protected !!