प्रतिष्ठित घरातील जुगारुंचा पर्दाफाश ! बीड पोलीसांच्या हाती मोठे घबाड

पोलीस स्टेशन पेठ बीड गुरनं. 192/2025 कलम 12 (अ) म.ज.का. प्रमाणे छापा टाकुन केला 258650 /- रुपयेचा मुद्देमाल केला जप्त

केशव डी मुंडे वेगवान मराठी प्रतिनिधी बीड दिनांक 10/07/2025 रोजी पोलीस ठाणे पेठ बीड येथे हजर असतांना, गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, इसम नामे १) रशिद ऊर्फ मोग्या आब्दुल रज्जाक रा. गांधीनगर २) शेख शेरु रा. इस्लामपुरा पेठ बीड हे काही इसमांना सोबत घेवुन अलकबीर फंक्शन च्या पाठीमाघे बंद लाकडी मशीन येथे मोकळ्या जागेत बल्बच्या उजेडात काही लोकांना घेवुन तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवीत आहे.

अशी खात्रीलायक बातमी मिळाले वरुन आम्ही स्वतः पोलीस निरीक्षक, अशोक मुदिराज, सोबत सपोनि. प्रितमकुमार पुजारी, सफौ/१३६महादेव पवार, पोह/१८०३ नितीन राठोड, पोह/१६१३ रमेश भोले, पोह/१०६५ नितीश माने, पोशि/२१४६ शिवाजी राख, पोशि/२०५३ दिपक भोजे, पोशि/२११३ शरद भारती यांना घेवनु मिळालेल्या बातमीचे ठिकाणी २२.३० वा. छापा मारला असता

सदर ठिकाणी इसम नामे 1) सचिन वसंत जधव वय ४५ वर्षे रा. गांधीनगर पेठ बीड २) मोहम्मद कुतुबुद्दीन शेख वय 53 वर्ष रा.तेलगाव नाका बीड ३) जुनेदोद्दीन हामिदोद्दीन इनामदार वय २७ वर्ष रा. गांधीनगर पेठ बीड ४) शेख रहीम शेख तय्यब वय 34 वर्षे रा. इस्लामपुरा पेठ बीड ५) सहीद खान रहीम खान पठाण वय ४० वर्ष रा. गांधीनगर पेठ बीड ६) विक्रांत चंद्रकांत गायकवाड वय २६ वर्ष रा. गांधीनगर पेठ बीड ७) सय्यद इस्माईल सय्यद जाफर वय ५५ वर्ष रा. शंहन्शाह नगर पेठ बीड ८) शेख सलीम शेख हबीब वय ५५ वर्ष रा. शंहन्शाह नगर पेठ बीड ९) ज्ञानेश्वर आश्रुबा गायकवाड वय ४९ वर्ष रा. गांधीनगर पेठ बीड हे मिळुण आले

त्यांचे अगझडतील जगाराचे साहित्य पत्ते सह नगदी रक्कम 33150/- रु., आठ मोबाईल कि.88500/- रु., दोन मोटार सायकल व एक स्कुटी कि. 137000/- रु. असा एकुण 258650/- रु. मुद्देमला जप्त करण्यात आला.

सदर छापा बाबत सरकार तर्फे फिर्यादी नामे महादेव निवृत्ती पवार वय 56 वर्ष व्यवसाय नौकरी सफौ / 136 नेमणुक पोलीस ठाणे पेठ बीड यांनी दिलेल्या फिर्याद वरुन एकुण 11 इसमान विरुध्द नमुद प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन या बाबत मा. पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक, श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी,

श्री. कमलेश मीना यांना माहीती देवुन मा. वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांनी वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कार्यवाही केली असुन पुढील तपास पोह/1508 अनिल भालेराव हे करीत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!