गावठी कट्टा घेऊण फिरणाऱ्या युवकास केले पोलीसांनी गजाआड

वेगवान मराठी बीड K D MUNDE –दिनांक ०४/०१/२०२५
(गावठी पिस्टल बाळगणाऱ्यास ठोकल्या बेडया)
बीड जिल्हयातील सर्वाजनिक सुव्यवस्था व कायदा आणि सुव्यवस्था अबाध्दीत ठेवण्यासाठी जिल्हयाचे पोलीस अधिक्षक श्री नवनीत कौवत यांनी जिल्हयाची धुरा संभाळल्यापासुन शर्तीचे प्रयत्न चालविले आहेत.
बीड जिल्हयातील गुंडगीरीचे व गुन्हेगारीचे समूळ उच्चटन करण्याच्या उदात्त दृष्टीकोण डोळयासमोर ठेवून श्रीमती चेतना तिडके अप्पर पोलीस अधिक्षक अंबाजोगाई, श्री अनिल चोरमले उप विभागीय पोलीस अधिकारी उपविभाग अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विनोद घोळवे पोलीस निरीक्षक अंबाजोगाई शहर यांनी अंबाजोगाईतील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहवी या करीता शर्तीचे प्रयत्न चालविले असून आज दिनांक ०४/०१/२०२४ गोपनिय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहीतीच्या आधारे पाण्याची टाकी लातुर पॉईट येथे एक इसम गावठी पिस्टल कमरेला लावुन फिरत आहेत.
अशी माहीती मिळाल्यावरुन पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहरचे पथक सदर ठिकाणी जाऊन अचाणक छापा मारला असता सदरचे इसम पळुन जात असतांना त्याचा पाठलाग करून पकडला. पकडलेल्या इसमास त्यास त्यास त्यांचे नाव गाव विचारता त्यांने त्यांचे नाव श्रीकांत ऊर्फ बबलु पांडुरंग भोसले वय ४१ वर्षे रा. यशवंतराव चव्हाण चौक अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड असे सांगितले.
त्यांचे ताब्यात गावठी बनावटीचे सिल्वर कलरचे पिस्टल एकुण ४०,०००/- रुपयाचा माल मिळुन आलेला आहे. त्यांचे विरुध्द पोलीस स्टेशन अंबाजोगाई शहर येथे गुन्हा क्रमांक ०९/२०२५ कलम ३/२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदरची कामगिरी ही, पोलीस निरीक्षक व्हि.यु. घोळवे, सहा. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, पोह/१४७९ आवले, पोह १४८५ वडकर, पोअं/२०२० नागरगोजे, पोअं/१७० काळे यांनी केली आहे.
भविष्यात अवैद्य शस्त्र, वाळुचा चोरटा व्यापार करणारे तसेच जिवन आवश्यक वस्तुचा काळा बाजार करणारे व्यक्ती व दादागिरी करणाऱ्या व खंडणी बहादर, धोकादायक गुंडावर जास्तीत जास्त MPDA, मोक्का, हद्यपार, कायद्याअंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा पोलीस अधिक्षक श्री नवनीत कौवत यांनी दिलेले आहेत.