क्लासेस चालवयाचे तर सिसी टिव्ही कैमेरे अनिवार्य करा -जाधव सर

Tuition classes should not be conducted without installing CCTV cameras.
सिसिटीव्ही कॅमेरे बसवल्या शिवाय शिकवणी क्लासेस चालवू नयेत
पाल्यांच्या बाबतीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहावे लागेल – सेवकराम जाधव
परळी वैजनाथ :-वेगवान मराठी प्रतिनिधी परळी दि 29 जुन 2025
शहरातील प्रत्येक शिकवणी क्लासेस मध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करावे लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत घडणारे किळसवाने अनुचित प्रकार थांबवण्यास मदत होईल. या सर्व बाबींसाठी पालकांनी सजग व दक्ष राहणे आवश्यक असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.
बीड येथे क्लासेस मधे घडलेला किळसवाना प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्राबद्दल असलेला आदर संपुष्टात तर येणार नाही ना ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
अनपेक्षित घटनेने पालकांच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञान मंदिरात असे नालायक प्रवृतीचे मूठभर लोक घुसल्यामुळे सबंध शैक्षणिक क्षेत्र बदनाम होताना दिसत आहे.
अशा विकृती वेळीच प्रशासनाने भर चौकात ठेचून काढल्या पाहिजेत. त्याशिवाय हे प्रकार थांबणार नाहीत. एका विद्यार्थिनीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्या जातो, स्वतःला शिक्षक म्हणवणारे दोन विकृत नालायक जाणीवपूर्वक त्रास देतात, शरीराला हात लावतात. तब्ब्ल वर्षभरानंतर हा निंदनीय प्रकार उघडकीस आला आहे.
अशा नासक्या मनोवृत्तीचा नुसता निषेध व्यक्त करून चालणार नाही तर या विरोधात ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
प्रत्येक क्लासेस मध्ये सिसिटीव्ही कॅमेरे बसवणे बंधनकारक करणे आवश्यक आहे. ज्या क्लासेस मध्ये कॅमेऱ्याची व्यवस्था नाही त्या ठिकाणी आपल्या पाल्ल्यांना पाठवू नये.
विद्यार्थ्यांसोबत चे अनुचित प्रकार टाळण्यासाठी येणाऱ्या काळात पालकांना सजग व दक्ष राहावे लागणार आहे. असे मत सेवकराम जाधव यांनी व्यक्त केले आहे.