एकाच गावच्या दोन अधिकाऱ्यांचा एकाच वेळी आयुक्तपदी पदोन्नतीचा योगायोग

कासारी गावचे दोन भूमिपुत्र एकाच वेळी आयुक्त.
महाराष्ट्र शासन पशुसवर्धन विभागाच्या आयुक्तपदी डॉ. श्यामराव वायबसे, डॉक्टर विलास डोईफोडे यांना पदोन्नती
केशव मुंडे वेगवान मराठी बीड प्रतिनिधी-केज तालुक्यातील कासारी गावचे दोन भूमिपुत्र तीस वर्षांपूर्वी एकत्र नोकरीला लागले पण आज महाराष्ट्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाच्या आयुक्तपदी एकाचवेळी नियुक्ती झाली. डॉ.शामराव रामराव वायबसे यांची इस्लामपुर या ठिकाणी आयुक्त म्हणून रुजू झाले तर डॉ.विलास डोईफोडे पंढरपूर या ठिकाणी आयुक्त पदी नियुक्ती झाल्याने बीड जिल्ह्यासह कासारी, केज तालुक्यातील असंख्य नातेवाईक मित्रपरिवार यांच्याकडून अभिनंदन केलं जात आहे.
ग्रामीण भागातील कासारी गावच्या या भूमिपुत्रानी आपल्या गावापासून दूर जात गेल्या 30 वर्षापासून महाराष्ट्र शासन पशुवर्धन विभागात पशुधन सेवा केली .अनेक ठिकाणी विविध जिल्ह्यात आपली आरोग्य सेवा दिली. कासारी गावचे भूमिपुत्र एकाच वेळी वरिष्ठ पदापर्यंत पोहोचले. दोघांचाही स्वभाव हसरा व प्रेमळ आहे त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांच्या पशुधनाला जीवदान दिले आहे. सोलापूर, मंगळवेढा, सांगोला, सांगली, पंढरपूर तालुक्यामध्ये त्यांनी आपली सेवा मोठ्या प्रमाणात दिली आहे. डॉक्टर शामराव वायबसे हे पशुवैद्यकीय सर्जन आहेत. त्यामुळे त्यांनी अनेक वेळा पशुधनाला मरणाच्या दाढीतून वाचवलेले आहे. त्यांनी अनेक पशुधनाच्या सर्जरी करून त्यांना जीवदान दिल्यामुळे ते मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहेत. तसेच डॉक्टर विलास डोईफोडे हे देखील सर्जन पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांचं सुद्धा मोठं नाव आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात प्रचंड प्रमाणात चांगले पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून ओळख आहे. या दोन्ही डॉक्टरांची पशुवैद्यकीय विभागात वेगळी ओळख आहे. गेल्या 30 वर्षापासून यांनी शेतकऱ्याच्या पशुधनाला प्रधान्य देत मनोभावे सेवा केली. आज कासारी गावचे भूमिपुत्र एकाच वेळी आयुक्ता झाल्याने. गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. प्रत्येक नागरिकांनी त्यांना शुभेच्छा देत अभिनंदन हे केलं. बीड जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असावी दोन मित्र एकाच वेळी नोकरी लागले आणि एकाच वेळी आयुक्त पण झाले. त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. तसेच गावचे ज्येष्ठ नागरिक सुखदेव वायबसे, रघुनाथ वायबसे, सूर्यभान वायबसे, दिलीप वायबसे, संजय डोईफोडे, सरपंच उत्तम डोईफोडे, अण्णासाहेब वायबसे, गोरख वायबसे, जयदेव वायबसे, पत्रकार ज्ञानोबा वायबसे यांच्यासह अनेकांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.