मराठवाड्याची लेक कोकणात नंबर एक, वैष्णवी आघाव सन्मानित

सारडगावची लेक वैष्णवी आघाव ‘AWARD OF EXCELLENCE – DIAMOND ACHIEVER’ पुरस्काराने सन्मानित

वेगवान मराठी परळी वैजनाथ सारडगांव दि 28 /9/26-ग्रामीण भागात ग्रामीण डाक सेवकाचे कार्य कसे असावे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे परळी तालुक्यातील सारडगावची वैष्णवी फुलचंद आघाव!

आपल्या अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि सेवाभावाच्या जोरावर तिने गावातील घरोघरी जाऊन भारतीय डाक विभागाच्या विविध योजना ग्रामस्थांपर्यंत पोहोचवल्या आणि त्यांना त्या योजनांचा लाभ मिळवून दिला.

तिच्या या उत्कृष्ट आणि उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत भारतीय डाक विभाग, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सन 2025-26 या कालावधीसाठी तिला *’AWARD OF EXCELLENCE – DIAMOND ACHIEVER’* या सन्माननीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

हा पुरस्कार *श्री. रामचंद्र जायभाये (Chief Postmaster General, Maharashtra & Goa Circle), श्री. रमेश पाटील (DPS, Goa Region) आणि श्री. नंदकुमार कुरलपकर (अधीक्षक, डाकघर, सिंधुदुर्ग विभाग)* यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

हा सन्मान केवळ वैष्णवीचा नसून, तिच्यावर विश्वास ठेवून भारतीय डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक ग्रामस्थाचा देखील आहे.

तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल आम्हाला मनस्वी अभिमान असून, परळी तालुक्यातील सारडगावचे नाव कोकणापर्यंत पोहोचवल्याबद्दल सारडगाव ग्रामस्थांकडून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे

खालील लिंक वर क्लिक करून आमचे नव नवीन अपडेट मिळवा चॅनल लाल सबस्क्राईब करा https://www.youtube.com/@KDMMARATHI

Back to top button
error: Content is protected !!