प्रदिप वखरे,व गणेश बहिर यांच्यावर गावठी पिस्टल प्रकरणी थेट कारवाई

स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने गावठी कट्टा पकडला- एक आरोपी ताब्यात.
वेगवान मराठी दि 23 /7/ 2025 मा. पोलीस अधीक्षक बीड यांनी बीड जिल्हयामधील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहीती काढुन कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केल्याने स्थानिक गुन्हे शाखेला दिनांक 23.07.2025 रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की नवगन राजुरी ता.जि.बीड येथे बस स्थानक परीसरात असलेल्या विना नावाचे टपरी मध्ये गुलाबी रंगाचे टि शर्ट व काळी जिन्स् पॅन्ट् घातलेल्या इसमांनी त्याचे पॅन्ट्च्या आतमध्ये एक गावठी कट्टा खवलेला आहे.
सदरील बातमी वरुन पथकाने नवगण राजुरी येथे जावुन सदरील ठिकाणी छापा टाकला असता
एक ईसम प्रदीप अशोक वखरे, वय 27 वर्ष, रा. माळी गल्ली, राजुरी (न) ता.जि बीड हा मिळून आला त्याचे अंगझडती घेतली असता पॅन्ट्च्या आतमध्ये एक गावठी कट्टा मॅगझीनसह मिळुन आला.
सदरील गावठी कट्टा त्याला गणेश श्रीराम बहीर रा. राजुरी (न) ता.जि बीड यांने दिल्याचे सांगीतले. दोन्ही आरोपीविरुदध् पोलीस ठाणे बीड ग्रामीण गु.र.नं 237/2025 कलम 3/25 शस्त्र अधिनियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
सदरील कामगिरी ही श्री नवनित काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, श्री बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, विष्णु सानप, विकास राठोड, भागवत शेलार चालक अतुल हराळे यानी केली आहे.
