क्राईमखेळछत्रपती संभाजी नगरपुणेबीड

अंजली दमाणीयांची जुबानी,मुख्यमंत्र्यां समोर बीडची कहाणी

Anjali Damania's story of Beed district in front of Chief Minister

वेगवान मराठी बीड K.D.MUNDE दिनांक  7 जानेवारी २०२५ –बीड जिल्ह्यातील अवैध धंदे बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था,बोकळलेली गुंडगिरी,जातीच्या आणि राजकीय सामाजिक क्षेत्राच्या आड लपलेले काळ्या धंद्यांचे पांढरे मुखवटे,जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी लोकशाहीची हत्या करुण वाढवलेली हुकुमशाही,व गोरगरीब लोकांच्या भावनांचा खेळ करत स्वार्थासाठी सुरु असलेला भोळ्या भाबड्या लोकांचा वापर,आणि इतर ही बरेच काही विषय घेऊण सामाजसेवीका अंजली दमाणीया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांची भेट घेतली आसुण बीड जिल्ह्यात सुरु आसलेला बेकायदेशीर कारभाराचा नंगानाच व जिल्ह्यातील सामान्य जनतेच्या वेदना आणि व्यथा त्यांच्या समोर प्रस्तूत केल्या आहेत पहा 👁️खालील मागण्या 👇

समाजसेविका अंजली दमाणीया यांनी काल मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र व 10 प्रमुख मागण्या

१. संतोष देशुखांच्या हत्येच्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे

२. धनंजय मुंडे हे वाल्मिक कराड यांच्या अतिशय जवळचे आहेत म्हणून त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे

३. SIT बरखास्त करुन बीड जिल्ह्या बाहेरचे चांगले ऑफिसर च्या ऑफिसर्स नी तपास करावा .

४. तपास on camera झाला पाहिजे.

५. बीड मधे एक hotline नंबर सुरू करण्यात यावा. तक्रार देणाऱ्यांची गुप्तता
बाळगण्यात यावी.

६. बिंदुनामावली बीड मधे पळाली जात नाही. त्याची सत्यता बघण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात यावे.

७. सगळे सत्र परवान्यांची चौकशी करण्यात यावी

८. परळी Thermal project येथे एक स्पेशल फ़ोर्स लावण्यात यावा व हा परिसर सीसीआयटी ने कवर करण्यात यावा. राख माफिया बंद करण्यासरही हे करण्यात यावे

९. ज्या वाहनांना वर नंबर प्लेट्स नाही अशी सगळी वाहने जप्त करण्यात यावी

१०. पवन चक्कीची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात यावी व यातून येणारे भाडे हे शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्यात यावे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!