लाचेचा दुसरा हप्ता घेतानी शिक्षण विभागाचा वरिष्ठ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
While accepting a bribe of 50 thousand, the official of G.P. got caught in the net of ACB

.-बीड ब्रेकींग- जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात एसीबीची धाड
© शिक्षण विभागाचा वरिष्ठ लिपीक ACB च्या जाळ्यात
® 90 हजाराची केली होती मागणी
40 हजाराचा पहिला हप्ता घेतल्याचे उघड
आता दुसरा हप्ता 50 चा घेताना सापडला कचाट्यात
वेगवान मराठी बीड -K.D.MUNDE बीड दि. 8 : बीड जिल्ह्यातील लाचखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. दिवसेंदिवस लाचखोर एसीबीच्या जाळ्यात अडकले जात आहे. बीडच्या शिक्षण विभागातील (माध्यमिक) वरिष्ठ लिपिक संतोष कुडके यास 50 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
बीड येथील सेवानिवृत्त शिक्षकाच्या कामासाठी 90 हजाराच्या लाचेप्रकरणी माध्यमिक शिक्षक विभागाच्या वरिष्ठ लिपिकास (कुडके) बीड एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. सदर लाचखोराने यापुर्वी लाचेचे चाळीस हजार रुपये स्विकारले असून पन्नास हजार रुपये घेतांना आज माध्यमिक शिक्षण विभागात पकडले आहे.
DYSP शंकर शिंदे यांनी केलेल्या या कारवाईमुळे शिक्षण विभागातील लाचखोराचे धाबे दणाणले आहेत. तसेच या कारवाईमध्ये शिक्षण विभागातील मोठे अधिकारी गळाला लागण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.