Cyclone Remal अबब…रेल्वेच्या वेगाने येतयं पहिलं चक्रीवादळ! वादळाचा भारतावर परिणाम
Cyclone Remal 'रेमाल' चक्रीवादळ रविवारी रात्री बंगालच्या उपसागरात धडकू मोठी हाणी पोहचवू शकते.

वेगवान मराठी / धीरेंद कुलकर्णी
नागपूर, ता. 26 में 2024 –
‘रेमाल’ चक्रीवादळ रविवारी रात्री बंगालच्या उपसागरात धडकू शकते, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. रेल्वेच्या वेगाने येणारे हे वर्षातील पहिलं चक्रीवादळामुळे मोठी भिती वाढली आहे. सोसाट्याचा वार वाहत असून चक्रीवादळ 110-120 किमी प्रतितास वेगाने वारे वाहून किनारपट्टीवर धडकू शकते. त्यामुळे कल्पना करा की, जर रेल्वे ताशी 110 किमी वेगाने धावत असेल तर या वादळाचा वेग ताशी 110 ते 120 असण्याची शक्यता आहे. तेंव्हा त्याची टक्कर किती जोरात होणार आहे.
वेगवान मराठीमध्ये नोकरीची नामी संधी
या कालावधीत, समुद्राच्या लाटा 1.5 मीटरपर्यंत वाढू शकतात, ज्यामुळे किनारपट्टीच्या पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या सखल भागात पूर येऊ शकतो. हवामान खात्याने मच्छिमारांना 27 मेच्या सकाळपर्यंत बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भाग टाळण्याचा सल्ला दिला आहे. ‘रेमाल’च्या प्रभावामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, मिझोराम ते बिहारपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे.
‘रेमाल’ चक्रीवादळामुळे, कोलकाता विमानतळावरील उड्डाण सेवा रविवारी दुपारी 12 ते सोमवारी सकाळी 9 पर्यंत 21 तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. भारतीय तटरक्षक दलाने समुद्रात आपत्ती निवारण पथके तैनात केली आहेत. याव्यतिरिक्त, NDRF च्या 12 तुकड्या बंगालमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. बंगाल सरकारने शनिवारी झालेल्या बैठकीत चक्रीवादळाचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेतला. केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्य अधिकाऱ्यांसोबत तयारीचा आढावा घेतला.
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, उत्तर ओडिशातील बालासोर, भद्रक आणि केंद्रपारा या किनारी जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 27 मे रोजी मयूरभंजमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 26 मे रोजी मिझोराम, त्रिपुरा आणि दक्षिण मणिपूरमध्ये बहुतांश ठिकाणी हलका पाऊस अपेक्षित आहे, काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. आसाम आणि मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरामध्ये 27 आणि 28 मे रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्येही थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळ ‘रेमाल’ मुळे, बंगालमधील श्यामा प्रसाद मुखर्जी बंदरातील सर्व मालवाहतूक रविवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 12 तासांसाठी स्थगित केली जाईल.
‘रेमाल’ चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका आहे का?
हवामान खात्याने 26-27 मे रोजी दक्षिण 24 परगणामध्ये 100 ते 110 किमी प्रतितास आणि उत्तर 24 परगणामध्ये 90 ते 100 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. कोलकाता, हावडा, नादिया आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती विभागाने दिली आहे.
