बीडमहाराष्ट्र

भगवान गडाचा चौथा उत्तराधिकारी ठरला

कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे चौथे महंत

  • केशव मुंडे वेगवान मराठी -दिनांक 14.10.24 — पाथर्डी  तालुक्यातील एकनाथवाडी येथील श्री क्षेत्र निरंजन संस्थानचे महंत ह. भ. प. श्री.कृष्णा महाराज शास्त्री यांची श्री क्षेत्र भगवानगडाचे चतुर्थ उत्तराधिकारी (महंत) पदी श्री क्षेत्र भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांचा पुढील उत्तरधिकारी म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे.असून त्यांना सोमवारी एकनाथवाडी या ठिकाणाहून ग्रामस्थांनी सकाळी ८ वाजता रथामध्ये बसवून ढोल ,ताशा, टाळ, मृदंग, हरी नामाचा जयघोष करत महिला भगिनी व पुरुष मंडळी हातामध्ये झेंडे, पताका घेऊन कृष्णा महाराज यांना भगवानगडावरती पोहोचवले. एकनाथ वाडी पासून निघाल्यानंतर रस्त्यामधील मुंगसवाडे, श्रीपतवाडी ,मालेवाडी, खरवंडी कासार, किर्तनवाडी या ठिकाणी कृष्णा महाराज शास्त्री यांचे लोकांनी भव्य असे स्वागत करण्यात आले. रस्त्याने जिकडे तिकडे गर्दीच गर्दी होती. ठिकठिकाणी जेसीबीच्या साह्याने फुलाचा वर्षावही करण्यात आला. श्री संत भगवान बाबा की जय, नामदेव महाराज शास्त्री की जय अशा घोषणा देत सर्व भाविक मंडळी भगवान गडाकडे पायी वाटचाल करत होती.

 

 

कृष्णा ‌महाराज यांच्या विषयी सांगायचे म्हणजे त्यांचे मूळ गाव तेलंगणा असून ते बारा वर्षांपूर्वी भगवानगडावरती आले. ज्ञानेश्वरी चे संपूर्ण शिक्षण भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठामध्ये झाले. त्यांचे
एम ए पर्यंतचे शिक्षण झालेले आहे. त्यांनी बारा वर्षे ज्ञानेश्वर चे संपूर्ण शिक्षण डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांच्याकडून घेतले आहे. त्यांना तीन वर्षांपूर्वी एकनाथवाडी येथील निरंजन संस्था या ठिकाणी महंत म्हणून राहिले आहेत. भगवान गडावरती श्री संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या मंदिराचे काम सुरू असून ते काम 2026 ला पूर्ण होणार आहे. त्याच वर्षी भगवानगडाचा अमृत महोत्सव असून या अमृत महोत्सवामध्ये नवनियुक्त महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना गादीचे हस्तांतर करण्यात येईल असे डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी सांगितले. पुढील काळामध्ये कृष्णा महाराज शास्त्री हे भगवानगड व भगवानगडाचा विकास करतील याचा संपूर्ण विश्वास मला आहे. या सर्व गोष्टींचा विचार करूनच मी कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड केली आहे. भविष्यामध्ये अशाच माणसाची गरज भगवानगडाला आहे. अशा पद्धतीचा शब्दही त्यांनी मला दिला आहे, असे यावेळी शास्त्री यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!