सोयगाव -सिल्लोड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) जेष्ठ नेते रंगनाथनाना काळे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा

वेगवान मराठी
सोयगाव -सिल्लोड विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस (SP) जेष्ठ नेते रंगनाथनाना काळे यांना नागरिकांचा वाढता पाठिंबा
माजी मंत्री स्वर्गीय बाबुरावजी काळे यांचे सुपुत्र रंगनाथनाना काळे- अब्दुल सत्तार यांच्यात लढत होण्याची सोयगाव सिल्लोड विधानसभा मतदार संघात शक्यता वर्तवली जात आहे त्या अनुषंगाने रंगनाथनाना काळे यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील गावामध्ये भेटीगाठी सुरू केल्या असून जनतेनेमधून त्यांना चांगला पाठिंबा मिळताना दिसून येत आहे
जेष्ठ नेते रंगनाथनाना काळे महाविकास आघाडीचे उमेदवार असणार याची शक्यता वर्तविण्यात येत असून सोयगाव -सिल्लोड भाग्यविधाते ,शिक्षण महर्षी माजी मंत्री स्वर्गीय बाबूरावजी काळे यांचे रंगनाथनाना काळे सुपुत्र आहे
रंगनाथनाना काळे शांत, संयमी नेतूत्व असल्याने मतदार संघातून त्यांना संधी मिळणार असल्याचेही बोलल्या जात आहे
सोयगाव-सिल्लोड मतदार संघातील गावामध्ये रंगनाथनाना काळे यांनी भेटी गाठी सुरू केल्या असून रंगनाथनाना काळे यांनी या अगोदर 1999 मध्ये मतदार संघातून निवडणूक लढवली आहे, तसेच रंगनाथनाना काळे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदचे अध्यक्षपद व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद पद भूषविले आहे
