क्राईमबीडमहाराष्ट्र

चंदुलाल बियाणीच्या राजस्थानीचे शेत कुंपणाने खालले

Chandu Biyani's Rajasthan farm is covered with fences

केशव मुंडे वेगवान मराठी परळी 

परळी प्रतिनिधी 15 नोव्हेंबर 2024 –नागरी सहकारी,मल्टीस्टेट पतसंस्था,अर्बन निधी,अशा अनेक पतसंस्थेतील घोटाळे व गैरव्यवहारामुळे या संस्थे मध्ये आपल्या कष्टाची कमाई ‘ठेव’ म्हणुन ठेवणाऱ्या ठेवीदार व त्यांचे कुटुंब उध्वस्त होत आहेत,

या संस्थेत काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांऱ्यांचा भविष्याचा प्रश्न देखील निर्मान झाला आहे,याकडे सरकारचे लक्ष नाही किंवा कठोर कायदे देखील नाहीत,यामुळे एका पाठोपाठ एक या प्रमाणे आपल्या कडे मल्टीस्टेट व नागरी सहकारी पतसंस्थेचे घोटाळे बाहेर येत आहेत.संस्थेच्या संचालक मंडळांनी केलेल्या गैरव्यव्हारामुळे या संस्थाना कुलुप लागुन संस्था बंद पडत आहेत़

  • शुभ कल्यान,ज्ञानराधा,बीएचआर,जीजाऊ ,साईराम,माऊली इत्यादि मल्टीस्टेट व नागरी पतसंस्था नंतर या क्षेत्रात अग्रेसर असलेल्या परळी वैजनाथ येथील राष्ट्वादी कांग्रेसचे जेष्ठ नेते चंदुलाल बियानी,सचिव,बद्रीनारायण बाहेती,विजयप्रकाश लड्डा,सारडा सेठ व इतर संचालक प्रमुख अधिकारी,कर्मचारी,ठेवीदारांच्या ठेवींवर डल्ला मारुण फरार झालेले आहेत..यामुळे या संस्थेत “ठेवी” ठेवणारे ठेवीदार,ग्राहक देशोधडीस लागले आहेत 300 कोटीच्या ठेवी असणारी व 500 कोटीपेक्षा जास्त उलाढाल असलेली “राजस्थानी मल्टीस्टेट नावाचे टायटॅनिक   बुडाली आहे,या संस्थेत ठेव म्हणुण ठेवलेला पैसा मिळत नसल्याने आतापर्यत 5 ठेवीदारांचे बळी गेले आहेत तर अनेक ठेविदारांचे मानसिक संतुलन बिघडले आहे यामध्यें महिला ठेवीदारांची संख्या मोठी आहे…

चंदुलाल बियाणीचा इतिहास:—परळी वैजनाथ परिसरातील मुळगांव पट्टीवडगांव ता.आंबाजोगाई येथुन नोकरीच्या निमिताने बियाणी कुटुंब परळी वैजनाथ येथे स्थायिक झाले स्व.मोहनलाल मदनलाल बियाणी हे परळी येथील खासगी शाळेत शिक्षक होते.आपला शिक्षकीपेशा करत करत त्यांनी परळी शहरात मुद्रणालय सुरु केले ‘जगदीश प्रिटींग प्रेस’ या नावाने त्यांची शहरातील मोंढा भागात त्यांची प्रेस होती.पुढे त्यांनी ‘मराठवाडा साथी” हे वर्तमान पत्र सुरु केले.प्रेस आणि वर्तपत्र चालवत असताना शहरातील सर्वसामान्य व्यापारी व इतर गरजुंची गरज भागावी म्हणुन शहरातील व्यापारी,मारवाडी समाज बांधव,व मित्र परिवाराच्या सहकाऱ्याने सुमारें 35 वर्षापुर्वी “राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्था सुरू केली या पतसंस्थेच्या माध्यमातुन त्यांनी अनेक गरजु व व्यापाऱ्यांना अर्थिक मदत केली, विनाविलंब कर्ज मिळत आसल्याने त्या काळात ही पतसंस्था शहरासह ग्रामिण परिसरात देखील लोकप्रिय झाली ,सर्वसामान्यांचा विश्वास वाढल्याने शहरासह ग्रामिण भागातील लोकं पतस‌ंस्थेत ठेवी ठेवु लागले बघता बघता लाखोची उलाढाल या संस्थेत सुरु झाली…

परळीच्या राजकिय, सामाजीक, शैक्षणीक,साहित्य,कला,धार्मीक, सहकार,व्यापार,उधोग,अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेले कै.मोहनलाल बियाणी यांचे जेष्ठ पुत्र चंदुलाल बियाणी यांच्याकडे या पतसंस्थेची धुरा मोहनलाल बियाणी यांनी सोपवली आपल्या वडिलांचे मार्गदर्शन व आदर्श समोर ठेवुण चंदुलाल बियाणी यांनी “राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेचा कारभार सुरु केला केंद्र सरकारच्या खुल्या अर्थिक धोरणा नंतर देशात सर्वत्र मल्टीस्टेट पतसंस्था सुरु झाल्या 2012 ला चंदु बियाणी यांनी परळी मध्ये “राजस्थानी मल्टीस्टेट या नावाने दुसरी पतसंस्था सुरु केली,

या संस्थेलाही ग्राहक,ठेवीदार,यांच्यासह सर्वसामान्य व्यापारी, आणि नारीकांचा प्रतिसाद मिळाला संस्थेच्या जाहिराती,ठेवीवरील आकर्षक व्याज,विनाविलंब कर्ज,सामाजीक कार्यातील सहभाग,स्थानीकच्या लोकप्रतिनिधीशी असलेले घनिष्ठ संबद्ध यामुळे राजस्थानी पतसंस्थे बरोबरच “राजस्थानी मल्टीस्टेट याही पतसंस्थेने शहराच्या क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण केला चंदुलाल बियाणी यांनी आपल्या कल्पना योजना राबवुण ठेवीदार व कर्जदारांसाठी तसेच इतर ग्राहकांसाठी विवीध योजना कार्यान्वीत केल्या,या योजनांना स्वतःच्या वर्तमान पत्रासह इतर प्रसार माध्यमातुन मोठी प्रसिद्धि देण्यात आली,त्यामुळें राजस्थानीचा विश्वास,लोकप्रियेता वाढतच गेली,ठेवींचा वेग आणि ओघ ही वाढतच गेला..

संस्थेतील व्याजाचा पैसा ही खेळता राहीला पाहीजे व त्यातुण संस्थेला लाभ हि झाला पाहीजे या उद्देशाने चंदु बियाणी यांनी संस्थेच्या संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्यावर संस्थेकडे असलेल्या सर्वसामान्यांच्या ठेवीचा पैसा विविध क्षेत्रात गुंतवायला सुरुवात केली.

महाराष्ट्रात प्रमुख शहरात व मोठ्या बाजारपेठेच्या ठिकाणी संस्थेच्या शाखा,विस्तार कक्ष सुरु केले. संस्थेच्या सर्व शाखेतून राष्ट्रीयकृत बैंकेच्या कारभारापेक्षाही चांगली,अद्यावत तत्पर सेवा मिळु लागल्याने सर्वसामान्य ठेवीदार या पतसंस्थेच्या पायऱ्या चढु लागले,अर्थिक क्षेत्रात व सहकारात राज्यात चंदु बियाणी यांनी आपल्या कार्यकुशलतेने. “राजस्थानी चे” नाव केले त्याच बरोबर ठेवीही जमवल्या.पानटपरी वाल्यापासुन सफाई कामगारापर्यंत तसेच नोकरदार,व्यापारी, सेवानिवृत्ति धारक,शिवाय धुणी भांडी करणाऱ्या सर्वसामान्य महिला हातावर पोट आसणारे मजुर,कामगार,अशा सर्व स्तरातील नागरीकांनी मोठ्या विश्वासाने “राजस्थानी मल्टीस्टेट मध्यें पोटमारुन आपल्या कष्टाची जमवलेली पैशाची शिदोरी ठेवीच्या रुपाने गुंतवली तर कोणी बचत खाते नित्यसंचय खाते,आरडी,करंट खाते,अशा पद्धतीने विविध खाते काढुण संस्थेत लाखोनीं पैसे जमा केले,यामुळें संस्थेची आर्थिक उलाढाल वाढतच गेली.‌.

दरम्यान गेल्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंत राजस्थानी मल्टीस्टेट कडे 283 कोटी व राजस्थानी सहकारी पतसंस्थेकडे 21 कोटी ठेवी जमा होत्या .सहकार खात्याच्या सुचना व नियमाप्रमाणे या दोन्ही संस्थेने विविध बैंका व पतसंस्थेत सुमारें 39 कोटी ची गुंतवणूक केली गरजु व्यापारी, उद्दोजक ,नोकरदार, व इतरांना 245 कोटीचे कर्ज वितरीत केले ,कर्जाची वसुलीही कर्मचारी करुण घेत यामुळे संस्थेचा गाडा चालत राहीला.

चंदु बियाणी हे राजकारण ,समाजकारण,शिक्षण,उद्योग,व्यापार,गुत्तेदारी,अशा विविध क्षेत्रात कार्यरत असल्यामुळें या क्षेत्रात काम करत असताना पडणारे अर्थिक खड्डे बुजविण्यासाठी पतसंस्थेतील पैशाचा ते सर्रास वापर करु लागले.मित्र,कर्मचारी सहकारी यांच्या नावावर कर्जाच्या फाईल करुण संस्थेतील पैशाचा वापर त्यांनी स्वतःच्या गरजांसाठी सुरु केला,हे खड्डे बुजविण्यासाठी संस्थेकडुन घेतलेले कर्ज भरले गेले नाही.दुसरीकडे खड्डे वाढतच गेले पैशाची उचलही वाढतच गेली,

आपल्या खासगी कामासाठीही संस्थेच्या खेळत्या भांडवलातील  पैशाचा वापर सुरु झाला या गोष्टी संस्थेच्या काही कर्मचाऱ्यांनी संचालक मंडळाला निदर्शरनास आणुन दिल्या, त्यानंतर काही संचालकांनी चंदु बियाणी यांना समज दिली,परंतु काही उपयोग झाला नाही नंतरच्या काळात काही संचालकांनी देखील संस्थेतील पैशावर डल्ला मारला इतरांच्या नावावर त्यांनीही कर्ज काढले,मात्र काही प्रामाणीक संचालकांना या गोष्टी न पटल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि संस्थेकडे पाठ फिरवली,

पुढे चंदु बियाणी यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य व इतर जवळचे सहकारी मित्र यांची संस्थेच्या संचालक मंडळावर नेमणूक करत गैरकारभार पुढे चालुच ठेवला,ज्यादा व्याजाच्या विविध योजना कार्यान्वीत केल्या बचत खात्यावरील शिल्लक रक्कमेलाही चांगले व्याज देऊ लागले या अमिषाला सर्वसामान्य माणूस बळी पडत गेला,रात्रंदिवस घाम गाळुण कष्ट करुण,आपल्या मुलाबाळांचे तोंड मारुण जमवलेले पैसे मुदत ठेवीच्या रुपाने जमा करु लागले ठेवीचा ओघ कायम आसल्याने संस्थेच्या कारभारात पडत गेलेले खड्डे व त्याचा परिणाम फारसा जानवला नाही,

पुढे पुढे तर विरोध करणारे कोणीच नसल्याने धाक ही राहीला नाही,त्यामुळें चंदु बियाणी यांनी सैराट होत अधिकच मनमानी चालवली संस्थेच्या शाखा विस्तार कक्ष काढणे सूरूच ठेवले,या शाखेत फर्नीचर, संगणक,व इतर गोष्टींवर वारेमाप पैसाउधळला ,कर्मचाऱ्यांऱ्यांचा भरतीवर भरती करुण त्यांना इतर पतसंस्थेच्या तुलनेत दूप्पट अर्थिक वेतन दिले,संस्थेचे प्रत्यक्ष उत्पन्न कार्यालयीन काम व लागणारे मणुष्यबळ याचा विचार कधी त्यांनी केला नाही ,कर्मचाऱ्यांऱ्यांच्या मोठ्या संख्येने वेतनाचा भार,इतर खर्चाचा बोजा संस्थेवर पडला , कर्जदाराची पात्रता,कुवत,न बघता,राजकिय नेत्याच्या शिफारशी वरुण त्यांच्या कार्यकर्त्यांना  त्यांच्या औकातीपेक्षा जास्त कर्ज वाटप केले

आपल्या जवळच्या मर्जितील लोकांनाही कर्जाची खैरात वाटली,संस्थेच्या दैनंदीन खर्चावर गावोगावी असलेल्या शाखेवर नियंत्रन राहीले नाही,मोठी उधळपट्टी चालवली गेली,काही कर्मचारी व संचालकांनी संधीचा फायदा घेत आपले हात ओले करुण धुवुण घेतले,पतसंस्थेतील पैसा लोकांचा आहे,त्यांच्या कष्टाचा आहे,तो परत करावा लागेल याची जाणीव कूणालाच नव्हती,

“उस गोड लागतोय खा मुळासकट”आसेच सुरु झाले संस्थेचा पैसा आपल्या घरचाच बापदादाचा आहे असे समजुत चंदु बियाणी यांनी पैशाची उद्धळपट्टी सुरुच ठेवली,संस्थेचे लेखा परिक्षण करणाऱ्यांनीही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले,हातावरचे शिल्लक कर्ज याबाबत थातुरमातुर शेरे तपासणीत देऊण वेळ मारुण नेली ,सरकारी यंत्रणेनेही गलथान कारभाराकडे दुर्लक्षच केले,संस्थेतील गलथानपणा संबंधीत सहकार खात्याच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणुन दिला नाही,परिणामी संस्थेच्या जहाजाला पडलेले छिद्र वाढतच गेले.

राजस्थानीतील या सर्व गलथान,भोंगळ,बेजबाबदार,मनमानी कारभाराचा वास यायला सुरुवात झाली, त्यानंतर काही राजकिय नेत्याच्या जवळील ठेवीदारांना संस्थेतील ठेवी काढुण घ्यायला लावल्या,औरंगाबाद शहरातील संस्थेच्या शाखेतून याचा प्रारंभ झाला,ठेवी काढण्यासाठी ठेवीदार येऊ लागल्याने कर्मचाऱ्यांची दमछाक सुरु झाली, ठेवी देण्यासाठी पैसे कमी पडु लागले त्यामुळें इतर बैकेत केलेली गुंतवणूक काढुण अथवा त्यावर कर्ज काढणे सूरू झाले,हा पैसाही संपल्यामुळे चंदु बियाणी यांनी आपले मित्र,नातेवाईक,इतरांना संस्थेत ठेवी ठेवण्याचे व ठेवीला जादा व्याज देण्याचे अमिष दाखवुण ठेवी जमविण्याचा प्रयत्न चालवला ,प्रसार माध्यमात यासाठी मोठमोठया जाहिराती दिल्या,

परंतु उपयोग झाला नाही ठेविदारांच्या ठेवी काढण्यासाठी रांगा वाढत गेल्या व त्यांना देण्यासाठी पतसंस्थेत पैसाच राहीला नाही संस्थेची तिजोरी रिकामी झाली, चंदु बियाणी यांच्या जवळच्या लाभार्थींनीही ठेवी पेलण्यास असमर्थता दाखवली,कोणीच साथ दिली नाही ज्यांना कोटीवर कर्ज दिले ती मंडळीही कर्ज भरण्यास असमर्थ झाली,यामुळे चंदु बियाणी सर्व बाजुनीं मोठ्या आर्थिक संकटात सापडले की राजकिय चकृरव्यूहात अडकविले हा प्रश्न आहे,

संस्थेत उरली सुरली रक्कम घेऊण तसेच संस्थेची प्रोपर्टी सावकाराकडे ठेवुण मिळेल तेवढी रक्कम घेत त्यांनी घराला कुलुप ठोकुण कुटुंबियांसह ठेविदारांना वाऱ्यावर सोडुण परळी सोडली,चंदु बियाणी व त्यांचे कुटुंबीय तसेच इतर संचालक, जबाबदार कर्मचारी अधिकारी फरार होऊण आज वर्ष होत आहे राजस्थानी मल्टीस्टेटच्या सर्व शाखा कुलपात बंद आहेत ,संस्थेचे सर्व व्यव्हार ठप्प आहेत ग्राहक ठेवीदार सभासद आदिच्या तक्रारीनंतर चार पाच महिण्यांनी राजस्थानी नागरी पतसंस्थेवर प्रशासक आला आहे,

परंतु त्यांचे कामही संथ गतीने सुरु आहे प्रशासक संस्थेचे कार्यालय उघडुण कधी बसल्याचे दिसत नाहीत,मधल्या काळात चंदु बियाणी यांचे कुटुंबीय परळी सोडुण फरार झाल्यानंतर व संस्थेच्या शाखांना कुलुप लागल्यानंतर संस्थेचे ठेवीदार ,इतर ग्राहक यांच्या तोंडाचे पाणी पळाले मोठ्या रक्कमा असलेल्या ठेवीदारांच्या झोपा उडाल्या ठेवीदार वेडे पिसे होऊण चंदु बियाणी व इतर संचालकांच्या घरी संस्थेच्या बंद असलेल्या शाखांवर चकरा मारू लागले,संबंधीतांना मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करु लागले, निदर्शने केली,मोर्चै निघाले,आंदोलन उपोषन ही केले गेली परंतु राजकिय वरदाहास्त लाभलेल्या चंदु बियाणी यांचे विरोधात लढणाऱ्या ठेवीदारांना प्रशासणा कडुण बेदखल करण्यात आले,

पुढे ठेवीदारांची संघटणा जन्माला आली,फरार झालेले चंदु बियाणी सोशलमिडीयाच्या माध्यमातुन ठेवीदारांना सांगत होते की लवकरच शाखा पुर्ववत सुरु होतील मी कौक्रीट जमण्यासाठी प्रयत्न करत आहे,याविषयी तारखा देत होते,पौम्पलेट छापुण वाटत होते,परंतु ग्राहकांना पतसंस्थेकडुण ठेवी मिळाल्या नाहीत की शाखा सुरु झाल्या नाहीत,चंदु बियाणी यांनी परळीसाठी दिलेले योगदान त्यांचे कार्य यातुन मिळवलेली सहानभुती,उभी केलेली माणसे आदी सर्वांना पतसंस्थेच्या बाबतीत चंदु बियाणी असे करतील असे वाटले नाही काही मंडळीनीं पतसंस्था वाचवण्यासाठी बाजारपेठेतुन मदत फेरीही काढली त्यातुन 25 ते 30 लाख जमा झाले ही रक्कम संस्थेच्या कार्यालयात जमा केली परंतु उपयोग झाला नाही देणारे पुन्हा अडकुण बसले.

आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणुण अनेक ठेवीदार चंदु बियाणी,सचिव,बद्रीनारायण बाहेती,जयप्रकाश लड्डा व इतर संचालक,शाखाधिकारी,यांना फोन करत राहिले.परंतु काहीच उपयोग झाला नाही सुरवातीचे काही महिने चंदु बियाणी यांचा मोबाईल,व्हाट्सएप चालु होते पुढे ते पण बंद झाले.ज्यांच्या मनगटात बळ होते जे राजकिय नेत्याच्या जवळचे होते आशा काही ठेवीदारांना विविध मार्गाने आपल्या ठेवी काढल्या,परंतु ज्यांनी संयम ठेवला संस्थेला आणि संचालक मंडळाला सहकार्य केले त्यांचे आणि सामान्य ठेवीदार मात्र अडकुण बसले,आपल्या ठेवी मिळाव्यात म्हणुण परळीसह राज्यात विविध ठिकाणी ठेवीदारांना संघटीत होऊण आंदोलन सुरू केली,उदगीर, लातुर,परळी,आंबाजोगाई, बीड,औरंगाबाद, जालना मंठा अथवा विविध ठिकाणीं राजस्थानी मल्टीस्टेट च्या पदाधिकाऱ्यांवर,प्रमुख अधिकारी,व इतर संचालकांसह चंदु बियाणी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत,

गुन्हे दाखल झाल्या नंतर अरोपीनां अटक करा,आमच्या ठेवी परत करा या मागण्या करत ठेवीदारांना पोलीस ठाण्यासमोर ठिय्या केला.बीडला मोठे आंदोलन केले,गुन्हे दाखल झाल्यानंतर अनेक महिण्यांनी पोलीसांनी पुण्यातुन चंदु बियाणी याच्या मुलाला अभिषक बियाणीस अटक केली इतर अरोपी मात्र मोकाट आहेत आणि त्यांचे संबंधीत कुटुंबीय मात्र  लोकप्रतिनिधी सोबत राजरोसपणे उघड प्रचार करत आहेत़.ठेवीदार जाब विचारायला गेले तर,तपास चालु आहे,लवकरच आरोपीस अटक करु आशा पद्धतीने हतबल पोलीस सांगत आहेत,

गेल्या वर्षापासुन परळीसह विविध गावातील ठेवीदार आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणुण प्रयत्न करत आहेत,चंदु बियाणी  व त्यांच्या सहकाऱ्यांना शिव्यांची लाखोळी वाहत आहेत शिव्या श्राप देत आहेत आपल्या ठेवी परत मिळतील की नाही असा प्रश्न या ठेवीदारांपुढे आहे जादा व्याजाच्या अमिषाला बळी पडुण कोणी मुलीच्या लग्नासाठी,शिक्षणासाठी,घर बांधकामासाठी,उपचारासाठी, व्यापार,उधोगासाठी,या पतसंस्थेत ठेवी ठेवल्या आहेत,चंदु बियाणी,आणि या प्रकरणात हात धुवुण घेणाऱ्यांना गोरगरीब ठेवीदारांची “हाय” लागल्या शिवाय राहणार नाही,

ठेवीचा पैसे मिळत  नाहीत म्हणुण अनेक ठेवीदार चिंताग्रस्त आहेत.झोपेत बडबड करत आहेत तर कोणी झोपतच नाहीत,अनेक जनांचे मानसिक संतुलन बिघडले आहे,या चिंतेने चार पाच जनांचा जिव गेला आहे,पिडीत ठेवीदार खोट्या आशेवर वेड्या सारखे इकडं तिकडं फिरत आहेत.अनेकांचे उंबरठे झिजवत आहेत.परळी येथील सामाजीक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांनी या ठेवीदारांची संघटणा बांधुण,संघर्ष सुरु केला आहे,यामध्ये प्रामुख्यानें बाबासाहेब पांचांगे,मिलिंद क्षिरसागर, गुनाबाई मुंडे अंजली फड,भानुदास गुट्टे,तुकाराम नागरगोजे, कै.श्रिराम जोशी,उद्धव आघाव,गोविंदराव गुट्टे,शिवम कराड,श्रिहारी दहिफळे,मुंडे मामा डाबीकर,इनामदार भाभी,सोळंके साहेब,शेख मामु खानसाब,अशा सर्व जातीधर्माच्या ठेवीदारांची वज्रमुठ बांधुण सेवकराम जाधव यांनी सोबतीला निर्भिड पत्रकार केशव मुंडे यांच्या समर्थ साथीने ठेवीदारांचा लढा उभा केला आहे,

मोर्चै, निदर्शने, उपोषणे,मेळावे,राजकीय लढे,देत ठेवीदारांची चळवळ जिवंत ठेवण्याचे काम अविरत सुरु ठेवले आहे,तरी पण ठोस काही हाती लागताना दिसत नाही,दरम्यान हे प्रकरण कृती समितीकडुण सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आसुण किमान 210 ठेवीदारांचे पिटीशन दाखल करण्यात आले आहेत,यामध्ये ठेवीदारांचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी कृती समिती कडुण योग्य ती काळजी घेण्यात आली आहे,

आपल्या माणसांची दखल कोणताही नेता,पक्ष,आणि लोकप्रतिनिधी घेत नाही म्हणुण या मागण्या शासण दरबारी मांडण्यासाठी ठेविदारांच्या वतीने परळी विधानसभेचा निवडणुक लढवण्याचा निर्णय झाला ठेवीदारांच्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला होता आणि त्याचे सर्वाधिकार ठेवीदार कृती समितीसह ठेवीदारांनी निवडलेल्या दोन्ही अनुक्रमाने सेवकराम जाधव आणि केशव मुंडे यांना बहाल केले होते,यासाठीं लागणारा अवश्यक निवडणुक निधी देखील जमा करण्यात आला होता याच बरोबर मतदार संघातील इतर जनते मधुण देखील समर्थन मिळत होते,परंतु ठेवीदारांच्या लढ्यात राजकारण आले तर मुख्य विषय बाजुला जाऊण ठेवीदारांच्या लढ्याला राजकीय वळण लागेल आणि लढा भरकटला जाऊ शकेल या कारणामुळें ठेवीदार कृती समिती आणि त्यांचे उमेदवार सेवकराम जाधव आणि केशव मुंडे यांनी ठेवीदारांचे हित सर्वोतोपरी ठेवत परळी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीतुन स्व इच्छेणे माघार घेण्याचा एकमुखी निर्णय घेतला,

राजस्थानी मल्टीस्टेटच्या सभासद,ग्राहक,ठेवीदार,यांनी एकत्र येऊन राजकीय पक्षाचे नेते,सामाजीक कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या,परंतु काहीच उपयोग झाला नाही,या प्रश्नी बहुतेक जणांनी वर हात केले,याच प्रश्नावर ठेवीदारांनी वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्यांची भेटीही घेतल्या होत्या,परंतु ठोस काही झाले नाही,चंदु बियाणी हे एका सत्ताधारी पक्षाचे नेते आहेत,स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याशी चंदु बियाणी यांचे पारीवारीक घनिष्ठ संबद्ध आहेत,सरकार दरबारी त्यांचे वजन आहे,याबरोबरच ठेवीदारांचा हाडपलेला अमाप पैसा सोबतीला आहे,वृतपत्राच्या क्षेत्रात व सामाजीक,राजकीय क्षेत्रात फरार अरोपी चंदु बियाणी याचा दबदबा आसल्याने प्रशासकीय पातळीवर आणि न्यायालयीण कामकाज प्रभावित होत आसुण ठेवीदारांच्या लढ्यात अडथाळे निर्माण करण्यात चंदु बियाणी यशस्वी होत आहे,

त्यामुळें हा प्रश्न हाती घ्यायला कोणीही धजावत नाही,जाऊद्या आपल्याला काय करायचयं ! असे म्हणुण जबाबदार लोकं ठेवीदारांना टाळु लागलेत,चंदु बियाणी यांनी आपल्या संस्थेच्या लाखो रुपयांच्या जाहिराती वृत्तपत्र व इतर माध्यमांना दिल्या आहेत,यामुळे त्यांच्या विरोधात भुमिका घेण्यासाठी अथवा हजारो ठेवीदारांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी विविध माध्यमांनी विशेष काही केलेले नाही,प्रसार माध्यमांनी जरी रान उठवले असते तरी या प्रश्नाचे चित्र वेगळेच दिसले असते, काही मोजक्याच माध्यमांनी या प्रश्नाच्या बातम्यांना चांगली प्रसिद्धि देण्यात आली आहे.

दरम्यानच्या काळात संस्थेच्या नावावर असलेल्या संस्थेने गुंतवणूक केलेल्या काही मालमत्तेची खरेदी विक्री झाली.ज्यांच्यात बळ होते अशा ठेवीदारांनी आपला पैसा मोकळा केल्याचे सांगितले जाते,इतर सर्वसामान्य मात्र लटकले आहेत,अशाच प्रकारे दिवाळे निघुण बंद पडलेल्या बीडच्या ज्ञानराधा,मल्टीस्टेट या पतसंस्थेत राजस्थानीची गुंतवणूक असल्याचे सांगितले जाते, परंतु या पतसंस्थेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या गुंतवणुकीवरही चंदु बियाणी यांनी तारण कर्ज घेतल्याची माहीती आहे, राजस्थानीच्या दोन्ही पतसंस्थेची रक्कम मोठ्या प्रमाणात काही कोटीच्या घरात चंदु बियाणी,संचालक मंडळ,तसेच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना बिना तारण कर्जाच्या स्वरुपात प्रसाद वाटल्यासारखे देण्यात आले आहे,यामुळे ही संस्था दिवाळखोरीत निघाली आहे…

बीड जिल्ह्यत विविध पतसंस्थेच्या आर्थिक घोटाळ्याचा व गैरकारभाराचा मोठा परिणाम चांगल्या प्रकारे चालत आसलेल्या इतर पतसंस्थांवर झाला आहे,या संस्थेत असलेल्या ठेवी अनेक ठेविदारांनी काढल्या आहेत, यामुळे संस्थांना गेल्या काही महिण्यात संस्था चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे,

जिल्ह्यात मल्टीस्टेट व सहकारी पतसंस्थेचे मोठे जाळे आहे शेकडो कोटीच्या ठेवी या संस्थेत आहेत.हजारो कोटीची उलाढाल या संस्थेतुन होते,हजारो कर्मचारी या संस्थेत काम करतात.या प्रकारामुळे संस्थेचे व काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ,परंतु संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेत या परस्थितीचा सामना केला आहे,परस्थिती पुर्वपदावर आणली ,

दरम्यान राजस्थानी पतसंस्था बंद पडल्यामुळे येथे काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांनां घरी बसावे लागले आहे,त्यामुळें त्यांच्या कुटुंबावरही परिणाम झाला,तर काही कर्मचाऱ्यांनी संस्थे कडण लाखोचे कर्ज घेतले आहे ते मात्र मोठे खुष आहेत राजस्थानी मल्टीस्टेट बंद पडल्याने संस्थेतुन ज्यांनी कर्ज उचलले आहे त्यांची मात्र चंगळ झाली आहे,.

कर्जदारांवर एक लाख कर्ज घेतले तर 85 हजारच पदरात पडत आसत आसे बोलले जात आहे, कर्जावर अल्वा सव्वा व्याज भरावे लागत आसे आशी नाटकी तक्रार आता कर्जदार करु लागलेत,दरम्यान राजस्थानीला कुलुप लागल्यानंतर या संस्थेत ज्या ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत ते चिंताग्रस्त आहेत तर ज्यांनी लाखो कोटीचे कर्ज घेतले आहे ते लांडगे मात्र खुष आहेत ही संस्था बंद पडावी त्यामुळें आपले कर्ज भरायचे वाचेल असे या कर्जधारकांना वाटत आहे.

राजस्थानी मल्टीस्टेट हि मराठवाडय़ातील अग्रेसर संस्था आहे,तर पतसंस्था परळी तालुक्यातील मोठी नागरी पतसंस्था आहे,या दोन्ही पतसंस्था उभ्या करण्यात ठेवीदारांसह अनेकांचे योगदान आहे,परंतु ही संस्था बंद पाडण्यात मुठभर राजकीय नेते आणि संचालक मंडळ जबाबदार आहे,या संस्था वाचल्या पाहीजेत,त्या जपल्या पाहीजेत,त्या पुर्ववत सुरु झाल्या पाहीजेत,ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळाल्या पाहीजेत,असे पण अनेकांना वाटते,त्यामुळें या संस्थेवर कार्यक्षम प्रशासकाची व प्रशासकीय मंडळाची नियुक्ति होणे गरजेचे आहे, या संस्थेत अडकलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात म्हणुण जी मंडळी लढा देत आहे त्यांच्या कष्टाला न्याय मिळाला पाहीजे,काही कर्मचाऱ्यांनी ठेवी व कर्जाच्या व्यव्हारात हात धुवुण घेतले असल्याचे सांगितले जाते त्यामुळें या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहीजे,.

परळीतील राजस्थानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासद व ठेवीदारांनी तक्रारी केल्या नंतर सहकार खात्याने या संस्थेवर अनेक महिण्यां नंतर प्रशासकाची नेमणूक केली, राजकीय व इतर दबावापोटी अनेक दिवस प्रशासकाने पदभारच घेतला नाही, नंतर ज्या प्रशासकाने पदभार घेतला त्याचे काम फरार अरोपी धार्जिणे सुरु आहे, संस्थेच्या प्रशासकाने संस्थेचे कार्यालय सुरु करावे,संपुर्ण कर्ज व इतर व्यवहाराची चौकशी करावी ,कर्ज वसुली करावी,ठेवीदारांना त्यांच्या ठेवी द्याव्यात असे सभासद व ठेवीदारांचे म्हणणे आहे, परंतु यासाठी संघर्ष समिती तिव्र आंदोलन करताना दिसत नाही,

चंदु बियाणी यांनी राजस्थानी मल्टीस्टेट, नागरी सहकारी पतसंस्था,अर्बन निधी,अशा आर्थिक संस्थेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्यानें परळीत बालवाडीपासुण,ते शाळेपर्यंत तसेच नामांकित कोचींग क्लासेस,जीम,पोहण्याचा तलाव,पाण्याचा फिल्टर प्लैंट उभा केला शहरातही सामाजीक धार्मीक,सांस्कृतीक,उपकृम,राबवले यातुन बियाणी यांनी पत आणि प्रतिष्ठा कमावली,यामुळे बियाणी परळी शहरच नाही तर राज्यभर राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यकती म्हणुण उदयास आले होते,मल्टीस्टेट, नागरी पतसंस्था,आर्थिक अडचणीत आल्यानंतर त्यांनी परळी सोडुण पळुण जाण्याचा मार्ग स्वीकारला.त्यांच्या सहकाऱ्यांनां देखील तसाच सल्ला देण्यात आला..

चंदु बियाणी स्वतः तर पळुण गेलेच परंतु संचालक व कुटुंबालाही शहर सोडण्यास भाग पाडले,आणि खरी मोठी चुक चंदु बियाणी यांनी हीच केली,संस्था कुलुप बंद करण्या ऐवजी पोलीस संथक्षणात संस्थेत थांबुन व्यवहार हाताळत परस्थितीला सामोर जात कर्ज वसुलीवर भर देऊण ठेवीदारांच्या जमतील तशा ठेवी दिल्या आसत्या तर आज ओढावलेली नामुष्कीची वेळ आली नसती,.

शहर सोडुण गेल्यानंतर त्यांनी संस्था पुर्ववत करण्याकरता आर्थिक मदतीसाठी विविध ठिकाणी खेटे खाल्ले परंतु त्यांच्या मदतीला कोणीच धाऊण आले नाही,ज्यांना आशाच प्रकरणात मदतीचा हात देऊण बाहेर काढले त्यांनीही चंदु बियाणीस असमर्थता दाखवली,ठेवीदारांच्या तक्रारीनंतर विविध शहरातील पोलीस ठाण्यात चंदु बियाणी सचिव,बद्रीनारायण बाहेती,संचालक मंडळ,पदाधिकारी यांच्यावर विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत,त्यामुळें पोलीस त्यांना कोणताही क्षणी आणि कोणत्याही बिळातून काढुण अटक करु शकतात,चंदु बियाणी यांनी मनमानी करुण गंभीर चुका केल्या आहेत,त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत़,

कारण ज्यांच्या प्रेमापोटी किंवा दबावाखाली दहशतीखाली येऊण ज्यांनी मनमानी केली आहे ते वाचवण्यासाठी येणार नसुण त्यांनीच बियाणी च्या साम्राज्याचा अस्त करण्याचा विडा उचलल्याचे चंदुलाल बियाणी यांच्या लक्षात आलेले दिसत नाही,पुतणा राक्षसणीच्या प्रेमाचे कितीही राजकीय पाठबळ आसले तरी कितीही विलंब झाला तरी एक दिवशी चंदुलाल बियाणी ला अटक होण्याशिवाय किंवा ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याशिवाय कोणताच मार्ग नाही,तसेच सक्षम प्रशासक लागु झाल्यास संस्थेची आर्थिक परस्थिती सुधारण्यास मदत होईल आसे अनेक तज्ञांचे म्हणणे आहे,

 

दरम्यान मल्टीस्टेट, नागरी पतसंस्थांमध्ये गैरव्यवहार,घोटाळे सातत्याने घडत आहेत यामुळे या पतसंस्था,कार्यरत असलेले कर्मचारी, ठेवीदार,व इतर ग्राहकांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळें पतसंस्थेतेतील ठेवीला व कर्मचाऱ्यांना प्रशासकीय संथक्षण आणि संचालकांवर नियंत्रन ठेवणारा सक्षम कायदा होणे गरजेचे आहे या संस्थांच्या संपुर्ण कारभारावर नियंत्रन ठेवणारी कडक,पारदर्शक,लेखा परिक्षण करणारी यंत्रणा असते आवशयक आहे,यासाठी कायद्यात ही तरतुद होणे गरजेचे आहे आसे जानकरांचे मत आहे,

राजस्थानी बंद पडल्यामुळे व संस्थेचे अध्यक्ष व इतर संचालक घर आणि शहर सोडुण फरार झाल्याणे या संस्थेच्या सहकार्यानें चंदुलाल बियाणी व त्यांच्या पुढाकाराणे होणारे सामाजीक सांस्कृतीक धार्मीक उपकृम ठप्प झाले आहेत परिणामी परळी शहरातील मोठी चळवळ बंद झाली आहे, चंदुलाल बियाणी परळीच्या राजकारणातील प्रभावी नेते होते,ते घर आणि शहर सोडुण फरार झाल्यामुळें त्यांच्या विरोधकांचा आनंद मात्र गगणात मावेणासा झाला आहे..

ठेवीदार कृती समिती परळी यांच्या प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया:–  केशव मुंडे } परळी येथील राजस्थानी मल्टीस्टेटचे चेअरमन आणि संचालक मंडळाने केलेल्या घोटाळ्यातुन वाचवण्यासाठी कितीही पळवाटा शोधल्या तरी,न्याय व्यवस्थेच्या आणि संवैधानिक मार्गाने शेवटच्या ठेवीदारांची ठेवी मिळवुण दिल्या शिवाय ठेविदारांचे कृती समिती गप्प बसणार नाही,त्यामुळें ठेवीदारांनी खचुन न जाता चुकीचे पाऊल उचलुण आपल्या जिवाचे बरेवाईट करुण घेऊ नये, अशी आपणास कळकळीची विनंती मी ठेवीदारांचा प्रतिनिधी म्हणून आव्हाण करत आहे: —केशव मुंडे {पत्रकार,प्रतिनिधी ठेवीदार कृती समिती परळी }

किती मृत्यु झाल्यावर चंदु बियाणी पैसे देणार ?-सेवकराम जाधव–आजपर्यंत फक्त परळीतील रहिमोद्दीन नंबरदार,विमल माने,श्रिराम जोशी,हे तीन ठेवीदार पैसे बुडाल्याच्या धास्तीने हाय खाऊण मरण पावले आहेत काहीजन अंथरुणाला खिळुण आहेत काहीजनांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.{ सेवकराम जाधव,:–सामाजीक कार्यकर्ते तथा अध्यक्ष ठेवीदार कृती समिती }

कायद्यात बदल हावा:–सुवर्णा फड कन्हेरवाडी :–अनेक मल्टीस्टेट बंद पडताहेत लोकांचे पैसे घेउण संचालक पळुण जातात,ठेवीदारांना कोणीही वाली आणि वाणी नाही,राज्य सरकार आम्हांला आधिकार नाही म्हणुण हात वर करते तर केंद्र सरकारा पर्यंत सामान्य लोक पोहचु शकत नाही मल्टीस्टेटच्या कायद्यात बदल होणे गरजेचे आहे.

:-गुनाबाई सायसराव मुंडे तळेगांव पांगरी :-सर्व ठेवीदारांचे पैसे मिळाल्या शिवाय आमचा लढा थांबणार नाही,पोलीस निरिक्षका पासुण ते कमिशनर पर्यंत आणि जिल्हा न्यायालयापासुण ते उच्च न्यायालया पर्यंत आम्ही लढा दिलेला आहे, राजकीय वरदाहास्तामुळे आरोपी मोकाट फिरत आहे परंतु पुढेही हा लढा न्याय मिळे पर्यंत अविरत सुरुच राहील–{ उपोषण कर्त्या आंदोलक,आणि ठेवीदार कृती समिती सदस्या:-गुनाबाई मुंडें

: -बाबासाहेब पांचांगे: –2012 ला स्थापण झालेल्या राजस्थानी मल्टीस्टेटच्या एकट्या परळी शहरात मुख्यशाखेसह चार शाखा आहेत तर राज्यासह राज्याबाहेर एकुण 40 शाखा आहेत, गेल्या डिसेंबर 2023 अखेरपर्यंत 283 कोटीच्या ठेवी संस्थेने दिलेले 229 कोटीचे कर्ज 28 कोटी 30 लाखाची गुंतवणूक,आणि  151 कोटीची मालमता आहे, 35 वर्षापुर्वी 1989 ला स्थापन झालेल्या दोन्ही संस्थेकडे 2100 ठेवीदार आसुण एकट्या परळी तालुक्यातील ठेवीदारांच्या 80 कोटीच्या ठेवी संस्थेकडे आहेत आम्ही परळी येथील 210 ठेवीदारांसह ठेवी परत मिळाव्यात म्हणुण मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत छ.संभाजीनगर खंडपीडात याचीका दाखल केल्या आहेत़

चंदु बियाणी यांनी अनेक मालमता विकल्या आहेत त्यांचे सचिव बद्रीनारायण बाहेती यांच्या राहत्या घराचे आसे काही होऊ नये म्हणून या घराची खरेदी विक्री करु नये म्हणून घरावर सुचना लिहुण ठेवली आहे,राजस्थानीचे व इतर संस्थेचे ठेवीदार या प्रसंगातुन मार्ग काढण्याची विनंती करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी कडे कैफियत घेऊण गेले आसता,

तुम्ही मला विचारुण ठेवी ठेवलात का ? या घटणेशी माझा काय संबंध ? तुम्हाला इतर बैका ठेवी ठेवायला नव्हत्या का ? मि आपली काहीच मदत करु शकत नाही परत माझ्याकडे येऊ नका आसे असंवेदनशिल उत्तर देऊन लोकप्रतिनिधी ने एकप्रकारे गुन्हेगारांचे अप्रत्यक्षपणे समर्थन केले आसुण ठेवीदारांच्या ठेवी लुबाडण्यात मोठे रैकेट असल्याचा संशय आम्हांला आहे,

कारण ठेवीदारांच्या ठेवींवर उभारलेल्या पोद्दार स्कुल मध्ये काही राजकीय पुढारी स्कुल प्रशासणास दमदाटी करुण आणि धमक्या देऊण शाळेतील जमा रक्कम घेऊण गेले आहेत आशी माहीती शाळेच्या व्यवस्थापांकडुण जाहीरपणे ठेवीदारांना देण्यात आली आहे 

:–बाबासाहेब पांचांगे,मिलिंद क्षिरसागर,भानुदास गुट्टे, गोविंदराव गुट्टे, उद्धव आघाव, तुकाराम नागरगोजे,ठेवीदार कृती समिती परळी 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!