शरद पवार गटाच्या नेत्याचे धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप
Sharad Pawar group leader Rajabhau Phad made serious allegations against Dhananjay Munde

केशव मुंडे वेगवान मराठी परळी 17 नोव्हेंबर 2024
परळी प्रतिनिधी –परळी मतदार संघातील राष्ट्वादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते राजाभाऊ फड हे परळी विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक होते,परंतु ऐणवेळी राजेसाहेब देशमुख माकेगावकर यांना शरद पवार यांच्या पक्षाची उमेदवारी जाहीर झाली,परंतु दरम्यानच्या काळात ज्या घडामोडी घडल्या त्यावर काल सिरसाळा येथील जाहीर सभेत कृषीमंत्री आणि परळी मतदार संघाचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी राजेभाऊ फड यांच्या कुटुंबाची भर सभेत खिल्ली उडवली होती,
आपल्या कुटुंबाचा जाहीर सभेत केलेला अपमान जिव्हारी लागल्याने आज सकाळी एणसीपी एसपी चे नेते राजाभाऊ फड यांनी परळी येथील त्यांच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप करत खालील प्रश्न उपस्थित केले आहेत…
1} औगस्ट महिण्यात पोळा सणाच्या दोन दिवस आगोदर पहाटेच्या वेळी परळी तालुक्यातील बेलंबा तांडा येथील स्वाती शामराव राठोड हि महिला परळी-सोनपेठ बेलंबा रोडच्या बाजुला प्राताविधीसाठी बसलेली आसताना त्या महिलेला स्वतः धनंजय मुंडे चालवत आसलेल्या गाडीने चिरडले आणि यामध्ये स्वाती राठोड या महिलेचा मृत्यू झाला परंतु या घटणेला दाबण्यात आल्याचा गंभीर आरोप राजाभाऊ फड यांनी जाहीर पत्रकार परिषदेत पुराव्यासहीत केला आहे..
2} निवडणुक शपथ पत्रात दाखविलेल्या पाच अपत्यापैकी 2 अपत्याची आई कोण आहे हे दाखविण्यात आले नसुण अनुक्रमे-शिशीव धनंजय मुंडे,व शिवानी धनंजय मुंडे या दोन अपत्यांना जन्म देणारी माता कोण आहे हे प पालकमंत्र्यांनी निवडणुक आयोगाला सांगावे आसे आव्हाण केले आहे,लाडकी बहिण योजनेचा डांगोरा करत फिरणाऱ्या मंत्री महोदयांनी मतदार संघातील बहिणी सुरक्षीत ठेवल्या नसुण मतदार संघात अन्याय आणि आत्याचाराचे साम्राराज्य निर्माण केल्याचा आरोप केला आहे
3} एका कुटुंबातील तिन तिन जन उमेदवारी मागत असल्याचा आरोप केला आहे परंतु मि माझ्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे त्यामुळे गुट्टे कुटुंबाचा आणि माझा संबंध जोडण्याचा प्रश्नच नाही आसे सांगत,पालकमंत्र्यांच्या घरात सरपंच,जि.प.सदस्य खासदार दोन दोन आमदार,मंत्रीपद,हे कसे चालते याचे उत्तर धनंजय मुंडे यांनी द्यावे,आसे आव्हाण करत ड्रा बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या अधिकारानुसार इतरांनी निवडणुक लढवणे,उमेदवारी मागणे हा गुन्हा आहे का आसा प्रती पश्न राजाभाऊ फड यांनी केला आहे…
4 } शेतकऱ्यांनी भरलेला विमा मंजुर झाला तरी तो रद्द करूण विमा कंपनीसोबत साटेलोटे करुण शेतकऱ्यांचा विमा पालकमंत्र्यां कडुण लाटला जात आसल्याची माहीती आजच्या पत्रकार परिषदेत राजाभाऊ फड यांनी दिली आहे,तर दुसरीकडे मला उमेदवारी नाकरल्या नंतर माझ्या कार्यालयातील शरद पवार यांच्या फोटोला शाई लावणारा आणि बैनर फाडणारा तरुण हा धनंजय मुंडे यांचाच आसुण त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले आहे,
शरद पवार हे सर्व जातीधर्माच्या लोकांचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्याशी गद्दारी करुण आलेल्या गद्दारांचा फोन पवार साहेब तर सोडा पण त्यांच्या पक्षातील कोणताही नेता गदारांचा फोन घेत नाहीत त्यामुळे धनंजय मुंडे यांनी खोटे बोलुण जनतेची दिशाभुल करु नये,परळीतील जनता खुप हुशार आहे येणाऱ्या 20 तारखेला ते मतदानातून दाखवुण देतील आसा आत्मविश्वास राजाभाऊ फड यांनी व्यक्त केला
याच बरोबर मतदार संघातील अनेक समस्यांवर आणि धनंजय मुंडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत बीड जिल्ह्यतुन गोपीनाथ मुंडे यांनी वाढवलेले कमळ हादपार करायची शपथ घेतलेल्या धनंजय मुंडे यांच्या कार्याला यश आले आसुण भारतीय जनता पक्षाच्या एकनिष्ठ मतदारांनी आणि गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणाऱ्या बांधवांनी या निवडणुकीत विचारपुर्वक मतदान करावे आसे आव्हाण राजाभाऊ फड यांच्या कडुण करण्यात आले आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.