राजकारण

पिकविम्याची तुलना औनलाईन रम्मीशी करणाऱ्या कृषीमंत्र्यांचा निषेध-सुधीर बिंदु

Agriculture Minister Dhananjay Munde's public protest comparing farmers' survival to online rummy-farmer leader Sudhir Bindu

परळी प्रतिनिधी-17 नोव्हेंबर

भारत राष्ट्र समितीच्या वतीने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांचा निषेध
दि-१५ -११-२०२४ शुक्रवार रोजी सिरसाळा येथील स्वतःच्या प्रचाराच्या जाहीर सभेत बोलतांना राज्याचे कृषीमंत्री यांनी पीक विम्याची तुलना ऑनलाईन रम्मीशी करुन शेतकऱ्यांना ऑनलाईन रम्मी खेळुन मिळणाऱ्या पैशापेक्षा जास्त विमा दिल्याचे सांगुन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. सोयाबीन च्या भावत शेतकऱ्यांची क्विंटलला दोन हजार रुपये हानुन दोन रुपये दिल्यची ऐट कृषीमंत्र्यांनी मिरवु नये . सरकार कंपनीला देत असलेल्या प्रिमीयमच्या दहा टक्के ही नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मिळत नाही.कृषीमंत्र्यांचा जाहीर तीव्र निषेध भारत राष्ट्र समितीच्या वतीने करण्यात येत आहे .

सिरसाळ्याच्या सभेत बोलतानी धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची चेष्टा करतानी, नाही म्हणलाव तरी औनलाईन रम्मी खेळल्यास मिळणाऱ्या रक्कमेपेक्षा जास्त विमा मि दिलाय की आसे असंवेदनशिल बोलुण शेतकऱ्यांच्या दुखावर मिठ चोळण्याचे पाप केले आसुण हा समस्त शेतकऱ्यांचा अपमान आहे त्यामुळे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांची जाहीर माफी मागावी
सुधीर सुधाकरराव बिंदू
भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!