क्राईमशेती

आता महाराष्ट्रातील शेतक-यांची कर्जमाफी

Loan waiver of farmers in Maharashtra

वेगवान मराठी / साहेबराव ठाकरे 

मुंबई, ता. 24 नोव्हेंबर 2024 – महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक धुमधडाक्यात पार पडली. महाराष्ट्र मध्ये निवडणुकीच्या दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडी यांनी मोठमोठ्या घोषणा दिल्या.Loan waiver of farmers in Maharashtra

महाराष्ट्रातलं राजकारण या घोषणामुळे ढवळून निघालं. महाराष्ट्राचं राजकारण आता वेगळ्या स्तरावर जाऊन पोहोचलेलं आहे. मतदारांना खुश करण्यासाठी राज्यातील राजकीय लोक मोठ्या प्रमाणात घोषणा करत आहे.

या घोषणांची अंमलबजावणी महाराष्ट्र मध्ये सुरू आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठी योजना सुरू झाली ती म्हणजे लाडकी बहिणी योजना. आणि याच योजनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण एकतर्फी झाले त्याला जोड मिळाली ती म्हणजे शेतक-यांची कर्ज माफी करण्यात येणार याची.

महाराष्ट्रातील जनतेने शेतकरी वर्ग असो वा  सर्वसामान्य माणूस, या मतदारांनी महायुतीच्या तीनही नेत्यांच्या पक्षांना भरभरून मतदान दिले. यामुळे महाविकास आघाडीला डावलून महायुतीने महाराष्ट्रात विजयाचा महामेरू वेगळ्या स्थानावर नेऊन ठेवलाय.

महाराष्ट्रातील राजकारण मागील लोकसभेच्या वेळेस कांद्यावरून मोठ्या प्रमाणात तापलं होतं. यावेळेस महायुतीच्या उमेदवारांना कांद्याची चांगली साथ लाभली. कारण कांद्याची आता चांगल्या प्रमाणात मागणी आणि चांगल्या प्रमाणात भाव मिळत असल्यामुळे कांद्याबाबत शेतकऱ्यांना ओरड करता आली नाही.

विरोधकांचे यामुळे गळेचपी झाली. कांद्याचा मुद्दा उठवण्यासाठी सरकारमध्ये महत्त्वाचा विषय असतो, मात्र यावेळेस कांद्याचे भाव सहा हजारापेक्षा जास्त राहिल्यामुळे विरोधकांना कांद्याचे भांडवल करता आले नाही. लोकसभेला कांद्यावरुन महायुतीच्या अनेक जागा गमवाव्या लागल्या. कांदा आता फक्त नाशिक जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रताील ब-याच जिल्ह्यामध्ये पिकविला जात असल्यामुळे कांद्याचे राजकारण महाराष्ट्रात येथून पुढे महत्वाचे ठरणार आहे.

शेतक-यांची कर्ज माफी 

Loan waiver of farmers in Maharashtra शेतकरी मतदार राजाला आपल्याकडे वळवण्यासाठी महायुतीच्या सरकारनं महत्त्वाच्या घोषणा केलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची घोषणा लाडकी बहीण असली तरी यानंतरची दुसरी घोषणा जी आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी.

महाविकास आघाडीनेही शेतकऱ्यांचे तीन लाखापर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर महायुतीच्याही सरकारने जर आमचं सरकार पुन्हा स्थापन झालं तर आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहे.

त्यामुळे आता राज्यांमध्ये महायुतीचा सरकार स्थापन झालेला आहे. आता महायुती दिलेल्या शब्दाला जागणार का आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा कर्ज माफ होणार का?  हे काही दिवसात कळणार आहे.

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तीन लाख रुपये पर्यंतच कर्ज माफ होईल अशी शेतकरी मतदार राजाला अपेक्षा आहे. खरोखर महायुती आता या दिलेला शब्दाला जागणार असेल तरच येथून पुढे महाराष्ट्रातील शेतकरी महायुतीच्या शब्दांवर विश्वास ठेवणार आहे. जर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर येथून पुढे महायुतीच्या सरकारला खाली खेचणं फार कठीण जाणार आहे. कारण या कर्जमाफीमुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीची पकड मजबूत होणार आहे यात शंका नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!