क्राईम

बीड येथे दिवसा ढवळ्या मर्डर करून फरार झालेला आरोपी जेरबंद

Police arrest Harshad Shinde's killer

अंकुशनगर बीड येथील खून प्रकारणातील आरोपी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखा व शिवाजीनगर पोलीस स्टेशनची संयुक्त कारवाई

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे बीड येथील अंकुशनगर भागात दिनांक 06/01/2026 रोजी हर्षद तुळशीराम शिंदे हा पाईपलाईन दुरुस्तीच्या कामाचा खड्डा खोदत असताना त्याठिकाणी विशाल संजय सुर्यवंशी रा. कालिकानगर, अंकुशनगर, बीड येऊन त्याचेकडील पिस्टलने हर्षद तुळशीराम शिंदे यांचेवर गोळ्या झाडून व धारदार शस्त्राने वार करून खून केला होता.

त्यावरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड येथे गुरनं 10/2026 कलम 103 बीएनएस सह कलम 3/25,4/25 भा.ह. का अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सदर गुन्ह्यातील फरार आरोपी विशाल सुर्यवंशी याचा शोध घेण्याकरिता मा. नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक बीड यांनी वेगवेगळे पथक तयार करण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व पो.स्टे. शिवाजीनगर बीड यांना आदेशित केले होते.

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा बीड यांचे दोन व शिवाजीनगर बीड यांचे एक पथक आरोपी शोध घेत होते.

त्यामध्ये सदर पथकाने CCTV फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेत असताना आज रोजी गोपनीय बातमीदारा व्दारे माहिती मिळाली की, सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा कळंब येथून केजकडे येणार आहे.

त्यावरून स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन येथील अधिकारी व अंमलदार यांनी संयुक्तरित्या सापळा लावून आरोपी विशाल संजय सुर्यवंशी यास केज शिवारात कळंब ते केज रोडवर कमल पेट्रोलपंपाजवळ यास पकडण्यात आले आहे.

सदर गुन्ह्याचे पुढील तपास कामी आरोपी व त्याने वापरलेली मोटार सायकल ही पोलीस स्टेशन शिवाजीनगर बीड यांचे ताब्यात देण्यात आलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पो. नि. प्रविण कुमार बांगर हे करत आहेत.

सदरील कामगिरी ही श्री नवनीत काँवत, पोलीस अधीक्षक, बीड, श्री सचिन पांडकर, अपर पोलीस अधीक्षक बीड, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, स्थानिक गुन्हे शाखा, प्रविण बांगर पोलीस निरीक्षक, शिवाजीगनर यांचे मार्गदर्शनाखाली,

स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, पोलीस हवालदार राहूल शिंदे, मनोज वाघ, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अश्पाक सय्यद, अर्जुन यादव, विकी सुरवसे,

चालक पो.ह. नितीन वडमारे, सिध्देश्वर मांजरे सर्व व पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथील सहा.पो.उप निरीक्षक बलराज सुतार, पोह रविंद्र आघाव, अनंत गिरी पोअ सुदर्शन सारणीकर यांनी संयुक्तरित्या केली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!