ईव्हिएममुळे नाही तर या कारणांमुळें महाविकास आघाडीची नौका बुडाली
Not because of EVM but because of this reason Mahavikas Aghadi boat sank

वेगवान मराठी परळी महाराष्ट्र दिनांक 29//11/24
केशव मुंडे परळी बीड प्रतिनिधी- 23 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचा लागलेला निकाल ज्यांना अनपेक्षित वाटत आहे,ते या निकालाकडे संशयाने पाहत आहेत आणि याच संशयातुन पराभवाचे कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.परंतु आता पर्यंत ना पराभव झालेल्या राजकीय पक्षांकडून,राजकीय विश्लेश्कांकडुण,विजयी झालेल्या महायुतीकडुण,ना मिडीयाच्या कोणत्याही समुहाकडुण या निकालाच्या मुख्य पहेलुंवर कोणीही भाष्य करत या निकालाचे ठोस पोस्टमार्टम केलेले नाही,किंवा त्यांना याचा आणखी ही शोध लागलेला नाही असेच म्हणावे लागेल….
काय आहेत महाविकास आघाडीच्या पराभवाचे मुख्य कारणे,आणि एकतर्फी वाटणारी निवडणुक कशी फिरली ?
१-लोकसभा निवडणुकीत एणडीए विशेष करुण भाजपा ज्या अहंकारात राहिली आणि 400 जागांचे स्वपन्न मतदारांना ग्राह्य धरुण नरेंद्र मोदी यांनी स्वता भोवती लोकसभेची निवडणुक बंदिस्त केली,हाच ओव्हरकौन्फिडन्स भाजपाला भोवला याचे मंथन करुण भाजपा सावध झाली परंतु महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या डोक्यात याची हवा शिरली,आणि महाविकास आघाडीची पहिली चुक इथेच झाली….
2–जागा वाटपात झालेली दिरंगाई,आपण जो उमेदवार देऊ तो निवडुण येईल अशी झालेली मानसिकता,प्रत्येक मतदार संघात 4 ते 5 इच्छुक उमेदवारांच्या कोपराला लावलेला गुळ,आणि ऐणवेळी शक्तीशाली इच्छुकांना नाकारुण,एकनिष्ठ राहण्याची शक्यता आसणाऱ्या कमजोर उमेदवारांची केलेली निवड,ज्यांना आशेला लाऊण ठेवले होते त्यांना समजाउण कामाला लावण्यात आलेले अपयश, किंवा समजुत काढण्याचा न केलेला प्रयत्न,यामुळे त्या नाकारलेल्या इच्छुकांच्या समर्थकांनी नाराजीच्या रागातुन महायुतीच्या उमेदवाराला किंवा अपक्षांना केलेल्या सहकार्याचा फटका,
3–लोकसभा निवडणुकी मध्ये मराठा समाजाचे एकगठ्ठा मतदान महाविकास आघाडीला झाले होते,परंतु मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे,मराठा समाजातील राजकिय सामाजीक क्षेत्रातील दुसऱ्या फळीतील तरुणांनी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रेरणेने आणि समाजाच्या हितासाठी मनोज जरांगे यांच्या वर विश्वास ठेऊण स्वताची राजकीय कारकिर्द पणाला लावली,परंतु सहा महिन्यापासून तयारी करत आसताना आणि उमेदवारी मागायला येणाऱ्या इच्छुकां कडुण 500 रुपयांचे बौंड घेऊण उमेदवाऱ्या दाखल करायला लावणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना ऐण फौर्म काढायच्या शेवटच्या दिवशी अचानक आसा काय साक्षात्कार झाला रामजाने पण मनोज जरांगे पाटील यांनी या निवडणुकीतुण स्पेशल माघार घेउण राजकिय पक्षाचे सोडुन सर्वच मराठा समाजातील अपक्ष उमेदवारांना फौर्म काढायचा आदेश देऊण मराठा समाजाला तर तोंडावर पाडलेच परंतु राजकिय क्षेत्रात करिअर करणाऱ्या हजारो मराठा नेत्यांची राजकीय कारकिर्द एका क्षणात उद्धवस्त करुण टाकली,हि घटणा या निवडणुकीची दिशा बदलणारी प्रमुख घटणा होती,
4–मनोज जरांगे पाटील यांच्या अविचारी भुमिकेमुळे नेत्यांसह मराठा समाज सावध झाला आणि मनोज जरांगे पाटील यांचा नाद सोडुण ज्याचे त्याचे राजकीय संबंध जपत स्वतः स सेफ करण्याच्या भुमिकेत येऊण महाविकास आघाडीने विशेष करुण शरद पवार यांनी प्रदिर्घ काळ सत्तेमध्ये राहुण देखील आणि लोकसभा निवडणुकीत भरभरुण मतांनी उमेदवार निवडून देऊणही मराठा अरक्षणा संदर्भात ठोस भूमिका न घेतल्यामुळे मराठा समाजाचे मते हि एकनाथ शिंदे यांना डोळ्यासमोर ठेवून महायुतीकडे मोठ्या प्रमाणात वळली…
5–संविधानाच्या भितीने लोकसभा निवडणुकीत मुस्लिम आणि आंबेडकरवादी समाजाने महाविकास आघाडीच्या झोळीत एकबाल मते टाकले,परंतु विधानसभा निवडणूकीत मात्र लोकप्रतिनिधी आणि उमेदवाराशी आसलेले संबंध आणि स्थानिक विषयाला म्हत्व दिल्याने या समाजाची निर्णायक मते देखील महायुतीच्या विजयाच्या पथ्यावर पडले गेले…
6–शरद पवार यांनी मुख्यमंत्राी पदाच्या शर्यतीमध्ये राष्ट्रवादी पक्ष नसल्याचे जाहीर केल्यामुळे पक्षातील नेत्यांसह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे जे योगदान मिळुण फायदा होणार होता तो न होता उलट नुकसान झाले…
7–तर दुसरीकडे कांग्रेस आणि शिवसेना युबीटी यांच्यात मुख्यमंत्राी पदाची स्पर्धा निर्माण झाली याच स्पर्धेतुन युबीटीने कांग्रेसला रोखण्यात आणि कांग्रसणे युबीटीला राखण्यात,एवढेच नाहीतर 100℅ सत्ता आपलीच येणार आहे या आत्मविश्वासातुन पक्षांतर्गत नेत्यांचा पराभव करण्यासाठी आपली प्रतिष्ठा आणि ताकद वाया घातली त्याचेच परिणाम म्हणजे,बाळासाहेब थोरात,यशोमती ठाकुर,पृथ्वीराज चव्हाण,यांच्या पराभवाकडे तर नाना पटोले यांच्या निसटत्या विजयाकडे पाहता येईल…थोडक्यांत काय तर महाविकास आघाडी हि मुख्यमंत्री पदासाठी लढली आणि ते पण मतदारांना ग्राह्य धरुण,आणि महायुती सामुहीक विजयासाठी लढली, कारण एकनाथ शिंदे आणि आजित पवार यांच्या साठी तर करो या मरो अशीच स्थिती होती,परंतु देवेंद्र फडणवीस यांच्या राजकिय कारकिर्देवर देखील दुरोगामी परिणाम होणार होते….
8–ओबीसीं आणि लाडक्या बहिण योजनेचा फायदा झाला हे जरी खरे आसले तरी,क्लीनस्विप करण्या इतपत झालेला नाही,त्याचे कारण आसे की अनेक मतदार संघात ओबीसी अपक्ष उमेदवार हे दुसऱ्या,तिसऱ्या,क्रमांकावर आहेत,लाडक्या बहिणींचा विषय देखील कुटुंबीयांच्या हितासोबतच आसतो हे त्रिवार सत्य आहे…
9–महाविकास आघाडीतील जे तिन पक्ष आहेत त्यातील तुतारी,आणि मशाल गटातील त्यांचे मुख्य नेते आणि लोकप्रतिनिधी यांनी वेगळी चुल मांडल्याने या दोन्ही गटाकडे आर्थिकदृष्टय़ा आणि इतर बाबतीतही विरोधातातील उमेदवारांना भिडु शकतील आसे उमेदवार नव्हते परंतु उमेदवारी मिळेल या आशेणे आलेल्या बाहुबली नेत्यांना उमेदवारी देण्यात आल्या नाहीत
10–प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ आसते या मार्गाने महायुतीकडुण मोठ्या प्रमाणात साम,दाम,दंड,भेद,या नितीचा करण्यात आलेला वापर इथेही महाविकास आघाडी कमी पडली आणि आशा पद्धतीने महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव तर महायुतीने ऐतिहासीक आसा विजय संपादन केला आहे,त्यामुळे
“ईव्हीएम के नाम का रोना तो बस्स एक बहाना है ! असली वजह को छुपा कर,अंदर की बात बाहर नही लाना है ” !
✏️ @ KESHAV munde 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.