महाराष्ट्रशेती

पिक विम्या संदर्भात नविन अपडेट आलं., शासन निर्णय जारी

Big news regarding crop insurance, latest update on government decision

ई-पीक पाहणी डीसीएस मोबाईल ॲपद्वारे होणार

  वेगवान मराठी बीड,  दिनांक 01 (वेगवान प्रतिनिधी)  : रब्बी हंगाम एक डिसेंबर 2024 पासून राज्यात सुरू होत आहे. शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्यासाठी आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते.

परंतु आता केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे काही तांत्रिक दुरूस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲप उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. या नंतर 100 टक्के पीक पाहणी  सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण राज्यात होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी. जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचण येणार नाही, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले आहे.

           शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदवायचे व उर्वरीत पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदवलेली नाही, ते तलाठी यांच्यामार्फत होत असत.

त्यामध्ये दुरूस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्यासाठी सहायक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी सहायक उपलब्ध राहणार असून सहायकामार्फत पीक नोंदणी होणार आहे.

पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, एमएसपी अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे.

नवीन मोबाईल ॲपमधील आवश्यकता

  • पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून 50 मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य आहे.
  • पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक.

सुधारित ॲपमधील नवीन सुविधा

  • शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबंधित समस्या सोडविण्यासाठी सहायक उपलब्ध असेल, असेही प्रशासनाने कळवले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!