नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसाचा धूमाकुळ (व्हिडीओ )

वेगवान मराठी / एकनाथ भालेरवा
नाशिक,ता. 5 डिसेंबर 2024- नाशिक जिल्ह्यामध्ये आज सकाळी बेमौसमी पावसाने हजेरी लावली. नाशिक जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये आज पावसाने हजर लावली. एवढेच नाही तर आता5 डिसेंबरला रात्री दहा वाजेच्या सुमाराला नाशिक शहर आणि परिसरामध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाने बॅटिंग केली.
नाशिक ग्रामीण मध्ये बेमौसमी पाऊस पडल्यास कांदा पीक काढण्यासाठी आलेला असल्यामुळे मोठे नुकसान होणार आहे. द्राक्ष पिकालाही या बेमौसमी पावसाचा फटका बसणार आहे.
आकाशामध्ये ढग भरून असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठी भीती निर्माण झालेली आहे. लाख मोल किमतीचा कांदा जर या पावसामध्ये भिजला तर काढून पडलेला कांद्याचे सडून गेल्याशिवाय राहणार नाही अशी शेतकऱ्यांना भीती वाटत आहे.
देवळाली सह नाशिक शहर पंचक्रोशीत पावसाची जोरदार हजेरी लावल्याची माहीती आमच्या स्थानिक प्रतिनिधीने कळविले आहे. अवेळी पाऊस, वातावरणात होणारे अचानक बदलामुळे पिकांंवरील वाढणारे किड आणि रोगांचे वाढते प्रमाण यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.
लासलगाव परिसरात पाऊस
सकाळी लासलगाव टाकळी परिसरात पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यामध्ये पाणी साचले होते.








