महाराष्ट्रात एवढ्या दिवस पाऊस पडत राहणार
It will continue to rain in Maharashtra for so many days

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव, मुक्ताराम बागुल
नाशिक, ता. नांदगाव तालुक्यातील बोलठाण परिसरामध्ये 15 ते 20 मिनिटं अवकाळी पाऊस झाला असून त्यामुळे कापसाचे नगदी पिकाचे नुकसान झाले. कांदा पिकाचे देखील नुकसान झाले. अचानक अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांची गुरे बांधण्यासाठी चांगली चांगलीच धावपळ उडाली.
निफाड, पिंपळगाव भागात दमदार पाऊस झाला.. मनमाड शहर परिसरात सोबत येवला तालुक्यातील अनेक भागाला जोरदार पावसाने झोडपून काढलं.
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि यामुळे समुद्रसपाटीपासून साडेतीन किलोमीटर उंचीपर्यंत चक्रकार वार्याची स्थिती निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रातला अनेक भागांमध्ये पाऊस पडत आहे.
नाशिक जिल्ह्याला काल व आज पहाटे वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढलं. नांदगाव, निफाड, चांदवड, तालुक्यामध्ये रात्रीच्या सुमारास पाऊस कोसळला तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली.
उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत 30-40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस अन् गारपीट होत आहे.
सध्या महाराष्ट्रतील हवामान वातावरणात सतत बदल होत असल्यामुळे काही भागात थंडीचा कडाका जाणवत आहे
तर काही भागात ढगाळ वातावरण जाणवत आहे. तर काही भागात तुफान अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळाली
नाशिक जिल्ह्यात परिसरात तुफान पाऊस सुरु आहे. रात्री पासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असल्यानं शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहेत
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची प्रचंड धावपळ उडाली आहे. या अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांना मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आहे
हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला होता. त्यानंतर दिनांक 28 च्या रात्री 12 वाजेच्या सुमारास जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकरी वर्गाची प्रचंड धावपळ झाली आहे.
अवकाळी पावसामुळं रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसामुळं कांदा ,द्राक्षे,गहू, हरभरा, मका, भाजीपाला या पिकांचे प्रचंड नुकसान होण्याची शक्यता निर्माण आहे.
दरम्यान, हवामान विभागानं राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात मध्य महाराष्ट्रात 27 ते 29 डिसेंबर या काळात मेघगर्जना, गारपीटीसह पाऊस होऊ शकतो.
नाशिक जिल्ह्यांतील अनेक भागांमध्ये 29 डिसेंबर रोजी दुपारपासून हवामानात बदल होण्यास सुरुवात होईल आणि पाऊस बरसेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर 27 ते 29डिसेंबरच्या रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड या भागात वादळी पाऊस होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे. यातील काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांत काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर 28 डिसेंबरच्या पहाटेपर्यंत पाऊस पूर्वेकडे सरकेल. हाच पाऊस विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. बदलत्या हवामानाची हीच शक्यता लक्षात घेऊन हवामान विभाग तसेच हवामान अभ्यासकांनी शेतकऱ्यांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
