गोपीनाथ मुंडे यांचा मकोका शी पुराणा रिस्ता !
Gopinath Munde, the Makoka Act and the eradication of gang war syndicates in Maharashtra

वेगवान मराठी बीड केशव मुंडे : दि 29 डिसेंबर:–सध्या बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणा मुळे आख्खा महाराष्ट् ढवळुन निघाला आहे,सोशल मिडीया आसो,वृत्तपत्रे,प्रिंटमिडिया,इलेक्ट्रोनिक मिडिया आसो कि सामाजिक राजकिय क्षेत्र आसो सगळीकडेच संतोष देशमुख,वाल्मिक कराड,धनंजय मुंडे,परळी,आणि बीड हि नावे आणि ठिकाणे राज्यातील चर्चेचे मुख्य केंद्र ठरत आहेत,तसेच विषयाला उचलून धरणारे आष्टीचे आमदार सुरेश आण्णा धस,आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणीया,यांनी देखील प्रसिद्धि माध्यमांचे लक्ष वेधुण घेतले आहे, त्याचे प्रमुख कारण आहे या प्रकरणातील आरोपींवर मकोका कायद्याच्या अंतर्गत शासणा कडुण गंभिर दखल घेउण सुरु असलेली कारवाई –
थोडक्यात पाहुयात मकोका कायद्याची सुरुवात,व्यापती,आणि गोपीनाथ मुंडे यांचा या कायद्याशी असलेला संबंध ! – महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA कायदा) (महाराष्ट्र संघटक नियंत्रण कायदा MCOCA कायदा)
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा हा भारतातील संघटित गुन्हेगारीला संबोधित करण्यासाठी लागू केलेला पहिला राज्य कायदा होता. हे MCOCA 1999 बेअर ऍक्ट म्हणूनही ओळखले जाते.
तो विधानसभेत प्रथम श्री.गोपीनाथ मुंडे यांनी मांडला आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेने तो मंजूर केला. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा राज्य पोलिसांना,गुन्ह्याचे सिंडिकेट तपासण्याचे, तपास करण्याचे आणि खटला चालवण्याचे अधिकार देतो, ज्यामध्ये संप्रेषणात अडथळा आणणे आणि गुप्त साक्षीदार आणि मालमत्ता जप्त करणे समाविष्ट आहे. भारतातील संघटित गुन्हेगारीशी लढण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन आहे.
या कायद्यांतर्गत प्रत्येक गुन्हा फौजदारी प्रक्रिया संहिता कायद्यांतर्गत आवश्यक खबरदारीसह दखलपात्र गुन्हा म्हणून ओळखला जातो.
: राज्यातील कायदा सुव्यवस्था सलोखा कायम ठेवण्यासाठी गोपीनाथ मुंडे यांना अनेक धर्मसंकटांना सामोरे जावे लागले, त्यांची कारकीर्द आजही राज्यातील जनतेच्या स्मरणात कायम स्वरूपी ठाण मांडून बसली आहे. जे समाजासाठी आवश्यक आहे ते करताना राजकीय जोखीम स्वीकारण्याची त्यांची मानसिक तयारी होती. याच कारणांमुळे व धोरणांमुळे गृहमंत्री पदावर असतांना त्यांनी राज्यातील पोलिसांचे मनोधैर्य वाढविले. कुप्रसिद्ध गुण्डांना कंठस्नान घातले. पोलीस तेच होते बदलला होता गृहमंत्री व त्यांनी दिलेला आत्मविश्वास गर्दीत लोकप्रिय असणारा नेता, धाडसी अधिकारी वर्गात लोकप्रिय झाला हे महाराष्ट्राचे भाग्य समजले जाते .
तेंव्हांच्या संयुक्त भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या काळात कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याची नोंद झालीच पाहिजे असा आदेशच तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता.भाजप-सेनेच्या युतीसरकारच्या सत्तेच्या काळात उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना समाजातील विविध अडचणी सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळेस मुम्बईची कायदा सुव्यवस्था कमालीची खालावलेली होती. दिवसा ढवळ्या रस्त्यावर टोळीयुद्ध सुरू झाले होते. मुंडे यांनी पोलिसांना आदेश दिला, “गोळीचा मुकाबला गोळीनेच करा‘’ परिणामी मुम्बईतील टोळीयुद्ध आटोक्यात आले. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री असताना गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले गोपीनाथ मुंडे म्हणजे गुंडाच्या टोळ्यांना ते धनाजी संताजी वाटत. समाजातील वाईट प्रवृत्तीविरुद्ध संघर्ष करणे ही त्यांची खासियत होती,
ज्या बीड जिल्ह्यातल्या सुपुत्राने गुन्हेगारी क्षेत्राला संपविण्याचे धाडसी कार्य करूण जिल्ह्याचे नाव केले त्याच गोपीनाथ मुंडे यांच्या जिल्हयाचे नाव गुन्हेगारांचा जिल्हा म्हणुण बदनाम होताना दिसत आहे,त्यांच्याच कुटुंबातील सदस्यांकडे आज संशयाने पाहिले जात आहे,ज्या जातीमध्ये मुंडे साहेबांचा जन्म झाला त्याच वंजारी जातीतील नागरीकांकडे गुन्हेगारी जात म्हणुन संशयाने बघीतले जात आहे,ज्या जातीने देशाच्या प्रत्येक लढ्यात आपले योगदान दिले,ज्या जातीने भगवान बाबां सारखा राष्ट्र संत दिला ज्या जातीचे तरुण देशाच्या सिमेवर बलिदान देण्यासाठी अग्रेसर आहेत, ज्या जातीच्या तरुणांनी शासकीय सेवेत आपला ठसा उमटवला आहे,एवढेच काय तर स्वतः च्या कर्तत्वार प्रत्येक क्षेत्रात संख्येच्या मानाणे अल्प असुण देखील बहुसंख्येने वर्चस्व निर्माण केले आहे,त्या सर्वांचे कार्य आणि योगदान एखाद्या घटणेमुळे किंवा काही दहा पाच चुकीच्या लोकां बरोबर सरसकट जातीला एकाच तराजुत मापले जाऊ नये,आणि मापले – जाणार पण नाही.
परंतु जिथुन गोपीनाथ मुंडे यांनी दोरी फेकली तिथेच परत येऊण बसली आहे.याचे अवलोकन प्रत्येक जबाबदार आणि सुज्ञ नागरीकांनी स्वतःच्या ह्रदयावर हात ठेवुण करणे गरजेचे आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.