
वेगवान मराठी बीड के डी मुंडे आंम्बाजोगाई – दिनांक 21/01/2025 रोजी पोलीस मुख्यालय बीड येथे नेमणुकीस असलेले पोलीस अंमलदार ब.नं. 493 तेजस वाहुळे हे साप्ताहीक सुटी असल्याने अंबाजोगई येथे घरी गेले होते. घरी असतांना दुपारी 03:00 वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाला शाळेतुन घेण्यासाठी गेले होते. शाळा सुटण्यास वेळ असल्याने तेजस वाहुळे हे बस स्थानक अंबाजोगाई येथे थांबलेले होते.
त्यादरम्यान बसस्टॅन्डवर एक बस आल्यानंतर एक इसम बसमध्ये चढणाऱ्या गर्दीचा हिस्सा झाला. परंतु तो गाडीत न चढ़ता परत माघारी फिरुन बाहेर जातांना दिसला.
त्यावेळी तेजस वाहुळ यांनी सदर संशयीताने पाकीट मारले असावे असा संशय आल्याने तो कोठे जातो यासाठी पायी पाठलाग केला. त्यावेळी सदरचा इसम हा बस स्टॅन्डच्या बाहेर निघुन गेला. सदर इसमाचे दोन साथीदार सुद्धा त्याला बस स्टॅन्ड परीसरातुन बाहेर उभ्या असलेल्या एका चारचाकीजवळ एकत्र मिळाले. ते सर्व मिळुन चारचाकी वाहनात बसुन घाईत निघाले त्यामुळे पोलीस अंमलदार तेजस वाहुळे यांचा संशय अधिकच बळावला. तेव्हा त्यांनी मोटारसायकल आणण्यासाठी वेळ न घालवता मागुन आलेल्या रिक्षात बसुन सदर चारचाकी वाहनाचा पाठलाग केला.
सदर चारचाकी ही भगवानबाबा चौकातील सीएनजी पंपावर थांबली. त्यावेळी पोलीस अंमलदार तेजस वाहुळे यांनी घाई न करता सदर वाहनात किती लोक आहेत याचा अंदाज घेतला असता सदर वाहनातून 4 इसम खाली उतरले. त्यावेळी तेजस वाहळे यांनी जवळ जावून त्यातील मुख्य संशयीतास पकडुन त्यास आपण पोलीस असल्याचे सांगुन बस स्टॅन्डवर काय केले? अशी विचारणा केली असता त्याने मोबाईल चोरी केल्याचे सांगीतले.
त्यावेळी तेजस वाहुळे यांनी पोलीसी खाक्या दाखवीला असता त्याचे इतर 3 साथीदार सदर ठिकाणावरून पळून गेले. तेजस वाहुळे यांना चारचाकी चालवता येत नसल्याने त्यांनी संशयीतास त्याच्या वाहनाने पोलीस स्टेशनला चालण्यास सांगीतले.
तेव्हा संशीयत पोलीस स्टेशनला चलण्यास टाळाटाळ करु लागला तेव्हा तेजस वाहुळे यांना आणखी संशय आल्याने त्यांनी सदर वाहनाची झडती घेतली असता त्यांना सदर वाहनात एकुण 63 मोबाईल मिळुन आले.
तेजस वाहुळे यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत साहेब यांना फोन करून घडलेली घटना सांगुन तात्काळ मदत पाठवीण्याबाबत विनंती केली. तेव्हा पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांनी त्यांना तेथेच थांबुन राहण्याच्या सुचना देवुन त्यांच्या मदतीसाठी तात्काळ अंबाजोगई शहर पोलीस स्टेशनचे अंमलदार पाठवीले.
संशयीत आरोपीस पोलीस स्टेशन येथे नेवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव जगु रामजी खडसे वय-36 वर्षे रा. लांझाड़ा पोस्ट डीडम ता. कुही जि. नागपुर ह.मु. प्लॉट नं. 138 साईबाबा नगर दिघोरी, नागपुर असे सांगीतले. तो त्याचे पर राज्यातील साथीदारांसह विविध शहरात फिरून चोऱ्या करीत असल्याचे कबुल केले आहे. तसेच तो त्याच्याकडे असलेल्या गाडीचा क्रमांक बदलुन सदर गाडी चोरी करण्यासाठी वापरत असतो. असे तपासात निष्पन्न झाले आहे.
आरोपीच्या ताब्यातुन 14,42,000/- रुपये किंमतीचे एकूण 63 मोबाईल व 8,00,000/- रुपये किंमतीची चारचाकी एक स्वीफ्ट कार बनावट क्रमांक एमएच 49 सीडी-8024 असा असलेली जिचा मुळ क्रमांक एमएच-31 एफयु-7528 असलेली असा एकुण 22,42,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंबाजोगई शहर पोलीस मिळालेले मोबाईल व इतर 03 आरोपींचा शोध घेत आहेत.
पोलीस अंमलदार तेजस वाहुळे यांनी दाखविलेल्या तत्परतेबद्दल व उत्कृष्ट कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भा.पो.से.) यांनी त्यांचे अभिनंदन केले असुन उद्या दिनांक 22/01/2025 रोजी पोलीस अंमलदार श्री. तेजस वाहुळे यांचा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत हे सत्कार करणार आहेत.
पोलीस अंमलदार तेजस वाहुळे यांनी दाखविलेल्या तत्परतेपासुन इतर अंमलदार यांनी प्रेरीत होवुन काम करावे व बीड जिल्हा पोलीस दलाचा नावलौकीक करावा असे पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कॉवत (भा.पो.से.) यांनी सांगीतले आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.