महाराष्ट्र

दावोस मध्ये देवाभाऊ छा गए ! राज्यात छप्पर फाड गुंतवणूक

Devendra Fadnavis went to Davos! Roofing investment in Maharashtra

WEGWAN MARATHI -K.D.MUNDE -DATE:–21 JANWARI 2025  दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत १५.७० लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण ५४ सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून १५.९५ लाख रोजगारनिर्मिती होणार आहे.

आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहासोबत ३ लाख ५ हजार कोटींचा करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा क्षेत्रात होणार असल्याने सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती यातून होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांची वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमदरम्यान भेट घेतली. या दोघांमध्ये ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूक क्षेत्रासंदर्भात चर्चा झाली.

वेगवान मराठी अपडेट मराठवाडा महाराष्ट्  जाहिराती साठी संपर्क आणि मोबाईल –

K D MUNDE 8888 387 622 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!