बीडमहाराष्ट्र

बहुचर्चित आष्टी सिंचन प्रकल्पाचे स्वरुप आणि म्हत्व काय ?

Why is the Khunefal Irrigation Project of Mhatva?

अशी आहे आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३

वेगवान मराठी बीड,आष्टी खुंटेफळ दि. ५ (जिमाका केशव मुंडे ) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील खुंटेफळ येथे आज आष्टी उपसा सिंचन योजना क्रमांक ३ अंतर्गत खुंटेफळ साठवण तलाव हे शिंपोरा बोगदा कामाचा शुभारंभ करण्यात आला.

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा आष्टी उपसा सिंचन योजना एक महत्त्वाचा भाग आहे.

जलसंपदा विभागाने जुलै २००९ मध्ये कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सुधारित जल नियोजनास मान्यता प्रदान केली आहे.

या योजनेच्या अद्ययावत द्वितीय सुधारित प्रशासकीय प्रकल्प अहवालास ऑक्टोबर २०२२ मध्ये ११ हजार ७२६ कोटी ९ लक्ष किंमतीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

या प्रकल्पाच्या उपसा सिंचन योजना क्र. १ मधून १०.४१ अ.घ.फू. व उपसा सिंचन क्र.२ मधून ७.५७ अ.घ. फू. पाणी धाराशिव जिल्हयातील एकूण ८७,१८८ हेक्टर क्षेत्रासाठी आणि आष्टी उपसा सिंचन योजना क्र. ३ द्वारे ५.६८ अ.घ.फू. पाणी बीड जिल्ह्यासाठी २७,५४३ हेक्टर क्षेत्रास देण्याचे प्रस्तावित आहे.

आष्टी साठवण तलाव – उपसा सिंचन योजना क्र.३

योजनेचे स्वरूप – उपसा सिंचन योजना -३  साठी १.६८ अ.घ.फु पाणी उजनी जलाशय ते खुंटेफळ साठवण तलाव येथे ६० दिवसांत उपसा करून आणण्याचे नियोजित आहे.

यामध्ये ७२ कि.मी. पाईपलाईनद्वारे पाणी खुंटेफळ साठवण तलावात आणण्यात येणार आहे. तेथून पुढे ३ उपसा टप्प्यात आष्टी तालुक्यातील ८१४७ हेक्टर क्षेत्रामधील सिंचनास लाभ मिळणार आहे.

        योजनेचे फायदेः

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात आष्टी उपसा सिंचन योजना -३ ची कामे पूर्ण झाल्यास आष्टी तालुक्यांत खालील लाभ होतील.

● अवर्षण प्रवण व दृष्काळग्रस्त भागातील २६ गावांतील ८१४७ हेक्टर क्षेत्राला सिंचन व पिण्याच्या पाण्याचा लाभ होईल. त्याचा अंदाजे ४१,९७५ इतक्या लोकसंख्येला फायदा होईल.

● सन २०२३-२४ च्या उन्हाळ्यात प्रशासनाद्वारे आष्टी तालुक्यांत ६२ टँकरद्वारे पिण्यासाठी पाण्याची सोय केली होती. आष्टी उपसा सिंचन योजना-३ पूर्ण झाल्यास पाणी टँकरच्या संख्येत घट होईल.

● या योजनेद्वारे अंदाजे ३४६४० जनावरांच्या व १२११४८ कुक्कुट पक्षांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच चारा छावण्यांचा प्रश्न मार्गी लागेल.

● या योजनेद्वारे लाभक्षेत्रात येणा-या गावातील नागरिकांच्या दरडोई उत्पन्नात वाढ होवून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

            खुंटेफळ साठवण तलाव

या तलावाची साठवण क्षमता १.६८ अ.घ.फू. / ४७.५७ द.ल.घ.मी. इतकी आहे. सदर धरणाची लांबी २००० मी. व उंची २८.५० मी. इतकी आहे. सद्यस्थितीत एकूण ५८ लक्ष घनमीटर मातीकामापैकी ४०.६० लक्ष घनमीटर (७०%) चे काम पूर्ण झालेले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत.

टप्पा क्र-१ उजनी जलाशय (मौजे शिंपोरा) ते थेट खुंटेफळ साठवण तलाव- दि. १५ मार्च २०२४ रोजी कामाची निविदा अंतिम करून कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे.

सद्य:स्थितीत पंपगृह व उर्ध्वगामी नलिकांची कामे प्रगतीपथावर आहेत. टप्पा क्रमांक १ उजनी जलाशय ते खुंटेफळ साठवण तलाव संरेखेचे काम ३५% पूर्ण झाले आहे.

पुढील टप्पा ३ अ (सिंचन क्षेत्र-५३०२ हेक्टर), टप्पा ३ व (सिंचन क्षेत्र-७४५ हेक्टर), व टप्पा ४ (सिंचन क्षेत्र-२१०० हेक्टर) चे काम झाल्यानंतरच प्रथम टप्पा १.६८ अ.घ.फू. च्या पाणी साठ्याच्या मर्यादेत ८१४७ हेक्टर सिंचन क्षेत्र निर्मित होणार आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!