लढाईत जिंकणाऱ्या मराठ्यांचा तहात हारण्याचा शापित इतिहास
The Marathas, who won in battle, have a history of losing in peace.

पानीपत ते शरद पवार,व एकनाथ शिंदे,आणि मनोज जरांगे पाटील ते सुरेश धस !
लढाईत जिंकणाऱ्या मराठ्यांचा तहा मध्ये पराभव होतो,हा शापित इतिहास
वेगवान मराठी -केशव डि.मुंडे ,थोडे इतिहासा मध्ये डोकाऊण पाहुयात म्हणजे सध्याच्या चालु घडामोडीचा संदर्भ लक्षात येईल.तर चला मग थोडे भुतकाळात जाऊयात… इ.स. १७६१ या दिवशी मराठ्यांचा निर्णायक पराभव झाला. हे पानिपतचे तिसरे युद्ध म्हणून ओळखले जाते. यानंतर मराठा साम्राज्याचा विस्तार थांबून विभाजन होण्यास सुरुवात झाली.
१७६१ नंतर पाच मराठा राज्ये स्वायत्त झाली. इ.स. १७७५ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीबरोबर पहिले युद्ध लढण्यात आले. यात मराठा सरदारांनी एकजूट होउन इंग्रजांचा सामना केला परिणामी अनेक ठिकाणी इंग्रजांचा पराभव झाला
इ.स. १८०२ मध्ये इंग्रजांनी बडोद्याच्या वारसदाराला अंतर्गत वादात मदत केली. बडोद्याला वेगळे राज्य म्हणून मान्यता देऊन त्याबदल्यात त्यांनी इंग्रजांच्या प्रभुत्वाची पावती मिळवली.
दुसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८०३-इ.स. १८०५) मराठ्यांनी स्वातंत्र्य तर वाचवले पण ओडिसा, गुजरात इत्यादी भाग गमवावे लागले.
तिसऱ्या इंग्रज-मराठा युद्धात (इ.स. १८१८) मराठ्यांना पराभव पत्करावा लागला आणि जवळजवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता आली.
यात पुणे आणि देशावरील इतर भाग कोल्हापूर आणि सातारा यांचा अपवाद वगळता इंग्रजांच्या हातात गेले. ग्वाल्हेर, इंदूर आणि नागपूरही इंग्रजांच्या राज्यात ‘स्वतंत्र संस्थाने’ म्हणून सामील झाले.
सोनीया गांधींच्या विदेशी मुद्यावरुण शरद पवारांचे बंड आणि पवारानां चालुन आलेली संधी
शिवसेनेत 45 मराठा आमदार असूनही सत्तेची सूत्रं मराठा नेतृत्वाकडे नव्हती. ग्रामीण भागातील श्रीमंत शेतकरी जातीही अस्वस्थ होत्या.
मराठा जातींतली ही फूट शिवसेनेला फायदेशीर ठरत होती. महाराष्ट्राच्या बदलत्या अर्थव्यवस्थेत शेतकरी जातींचं महत्त्व कमी होऊ लागलं होतं.
या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी सोनिया गांधींना विरोध करत 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची स्थापना केली.
शरद पवारांनी सोनिया गांधीं यांच्या विदेशी मुद्यावर उपस्थित केलेला प्रश्न भारतीय राजकारणातील इतका प्रभावी मुद्दा होता की, जर शरद पवार हे या मुद्यावर ठाम राहिले आसते तर कांग्रेस विरोधी विचारांच्या भाजपासहीत इतर प्रादेशीक पक्षांच्या पाठींब्यावर शरद पवार हे 101 % भारताचे पंतप्रधान झाले आसते आसे राजकीय क्षेत्रातील तज्ञांचे ठाम मत होते
दरम्यान विदेशी मुद्यावरुण बंड केल्यानंतर 6 महिण्यां नंतर झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत लढाई जिंकून देखील शरद पवारांनी सोनिया गांधीं सोबत तह करुण पंतप्रधान पदाची संधी गमावली
मराठा आरक्षण,अंतरवाली सराटी,मनोज जरांगे पाटील,यश टप्यात आसताना तह आणि टांगा पलटी घोडे फरार….
अनेक दशका नंतर कधी नव्हे ते मराठे प्रचंड संख्येने एकत्र आले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी डोळे झाकुन तन मन धनाणे खंबीरपणे पाय रोवून उभे राहिले,मनोज जरांगे पाटील जी बोलतील ति पुर्वदिशा समजु लागले,सामान्य तर सोडा परंतु राजकिय सामाजीक धार्मीक क्षेत्रातील मान्यवर देखील जरांगे पाटील यांच्या प्रभावाखाली आले….
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रस्थापीत सत्ताधारी पक्षाच्या विरोधात रान उठवले आणि यामध्ये त्यांना यश देखील आले,लागलीच चार महिण्यां नंतर विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आणि मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षण समिती निवडणुका लढणार असल्याचे जाहिर केले…
लोकसभा निवडणुकीत लागलेले धक्कादायक निकाल पाहता मराठा समाजातील राजकीय क्षेत्रात करीअर करणाऱ्या अनेकांनी त्यांच्या राजकीय पक्षांना रामराम ठोकुण अंतरवली सराटीची वाट धरली आणि मनोज जरांगे यांच्या आरक्षण स्थळी उमेदवारीच्या अपेक्षेणे तळ ठोकुन बसले
वातावरण पोषक परिस्थिती आसताना देखील मनोज जरांगे पाटील यांनी यश टप्यात दिसत आसताना मराठा तरुनांनां आमदार झाल्यासारखे वाटत आसताना सर्व तयारी झालेली आसताना ऐण वेळी अनपेक्षितपणे माघार घेऊण मराठ्यांचा करेक्ट कार्यक्रम उरकुण टाकला आणि मराठ्यांनी पाहिलेल्या स्वपन्नांवर पाणी फिरवले ! क्षणार्धात होत्याचे नव्हते करुण टाकले ! आणि परत एकदा मराठे सैरभैर होऊण पळत सुटले परत एकदा मराठ्यांच्या नशीबाचे पानीपत झाले परत एकदा आरक्षणाच्या लढाईत जिंकत आलेले मराठे जरांगे पाटील यांनी केलेल्या तहात हारले…
मस्साजोग प्रकरण,सरपंच संतोष आण्णा पंडीतराव देशमुख,आवाधा कंपनी,खंडणी, सरपंचाचा खुन,सुरेश धस …..
आगोदर प्रमोद महाजन विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांच्या क्रमश:झालेल्या आकस्मित मृत्यु मुळे मराठवाड्यात कधी नव्हे ती राजकीय क्षेत्रात सर्वसमावेशक नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली होती.
दरम्यान संतोष देशमुख,सोमनाथ सुर्यवंशी,कळसे मास्तर संगीत डिघोळे,किशोर फड,महादेव मुंडे,ते बापु आंधळे,यांचे खुन प्रकरणे,आणि वाळुमाफीया,राखमाफीया,भुमाफीया,बीड जिल्ह्यातील बहुचर्चित मल्टिस्टेट घोटाळे,आणि जिल्ह्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा उडलेला बोजवारा व राजकीय क्षेत्रातील बोकाळलेला भ्रष्टाचार,
वरील सर्वसमावेशक मुद्यांना हात घालुन सुरेश धस यांनी सभागृहात आणि मिडीयात आवाज उठवला यातच त्यांची बोलण्याची शैली साधे राहणीमान,रांगडे व्यकतीमत्व,आणि बोलण्यातील खरेपणा हा जनतेला एवढा भावला की मराठवाड्यातील राजकीय क्षेत्रातील निर्माण झालेली सर्वसमावेशक नेतृत्वाची पोकळी सुरेश धस यांच्या रुपाने भरुण निघेल आशी लोकांमध्ये भावना निर्माण झाली होती….
दरम्यान सुरेश धस यांनी उभारलेल्या लढ्याचे यश टप्यात आलेले दिसत आसताना आणि सुरेश धस यांच्या नेतृत्वावर राज्यभर निर्विवाद शिकामोर्तब होण्याची संधी निर्माण झालेली आसताना सुरेश धसांच्या भुमिकेवर प्रश्न चिन्ह निर्माण होणारी घटणा खुद सुरेश धसांच्या हातुन घडली,आणि परत एकदा मराठे एका चांगल्या नेतृत्वास मोठे झालेले पाहण्या पासुण मुकले,परत एकदा निराशा पदरी आली परत एकदा लढाईत जिंकलेले सुरेश धस तहा मध्ये हारले…
तसं पाहिले तर एकनाथ शिंदे देखील याच कैटेगरी मध्ये आलेले आहेत विधानसभेत युतीला मिळालेले यश हे निर्विवाद त्यांचेच होते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर दुसऱ्यांदा बसतील याच भावनेतुन मराठ्यांनी युती च्या उमेदवारांना भर भरुण मते दिली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांचा करेक्ट कार्यक्रम उरकुण लढाईत जिंकलेल्या एकनाथ मामा शिंदेचा तहात पराभव करून टाकला.! लढाई मध्ये जिंकून तहा मध्ये हारने हा मराठ्यांचा शापीत इतिहास आहे,यावरुण हे पुन्हा पुन्हा दिसुण येते…..
✒️ केशव डि.मुंडे- वेगवान मराठी, (नमामि॥ वैद्यनाथम् निवास परळी वै.) 8888387622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.