क्राईम

परळी मध्ये मल्टिस्टेट चे दलाल कार्यरत ! कृती समिती करणार संबंधितांवर मकको लावण्याची मागणी

राजस्थानी मल्टिस्टेट च्या संघटित गैंगचे नविन गोरख धंदे सुरुच

परळीच्या मार्केट मध्ये ‘जगदीश बियाणी बद्रिनारायण  बाहेती धिरज बाहेती पुजा बियाणी व विजयप्रकाश  लड्डा या मल्टीस्टेट च्या फरार संचालक व कुटंबाताली सदस्यांकडुण ठेवीदारांच्या मड्यावरचे लोणी खाण्याचा नविन धंदा सुरू !

वेगवान मराठी परळी वैजनाथ -बीड प्रतिनिधी केशव डि.मुंडे- दिनांक- 16 फेब्रुवारी 2025-

एफ डी द्या आणि अर्धे पैसे घ्या,परत वरुण दलालांची टक्केवारी राजस्थानी मल्टीस्टेट ची नवीन स्कीम घेऊन जगदीश बियाणी यांनी एजन्ट मार्केटमध्ये उतरवले आहेत

परळी वैजनाथ -परळी शहरात अनेक दलाल ठेविदारांच्या मड्यावरचे लोणी खाण्यासाठी टक्केवारी देऊण परळीच्या मार्केट मध्ये आणले आहेत.

ज्यांचा जन्म स्कीम चालवण्यात गेला ते मरेपर्यंत हेच धंदे करणार का ? आशी चर्चा ठेवीदारांसह परळीच्या बाजारपेठेत सुरु आहे. आगोदरच गोरगरीबांच्या डोक्यात दिवसा ढवळ्या दगड घालुन ठेवीदारांना देशोधडीस लावलेले आसताना फरार आसलेले आरोपी बद्रिनारायण बाहेती दाम्पत्य व मुलगा धिरज बाहेती,तसेच चंदुलाल बियाणी परिवारातील सदस्य भाऊ,जगदीश बियाणी,व मुलगी पुजा बियाणी हे बाहेर राहुण मल्टिस्टेटच्या संपतीच्या आणि कर्जप्रकरण व एमपीआयडी प्रस्ताव दाखल झालेल्या पोदार स्कुलच्या व्यवहारात अवैद्यपणे अफरातफर करत आहेत. ठेवीदारांच्या ठेवीतुन जमवलेली संपती व वाटप करण्यात आलेले कर्ज आणि पोदार शाळेतील जमापुंजीवर डल्ला मारण्याचे काम करत आहेत !

तर दुसरीकडे भयभीत झालेल्या गरीब ठेवीदारांच्या घरी शहरातील काही उच्चभ्रु समाजातील निच गिधाड वृतीचे काही दलाल हे रात्री बेरात्री जाऊण ठेवीदारांना भयभीत करुण आर्ध्या किमतीमध्ये ठेवी देण्यासाठी पावत्या जमा करत आसल्याची धकादायक माहिती समोर येत आहे.

दरम्यान या दलालांच्या पाठीशी ‘जगदीश बियाणी आणि बद्रिनारायण बाहेती,धिरज बाहेती व पुजा बियाणी,विजयप्रकाश लड्डा यांच्यासह मल्टिस्टेट मधिल एका उच्चपदस्त आधिकाऱ्याचा सहभाग असून एफडी जमा करुण घेणाऱ्या दलालाच्या बुक्की मालकाने ठेवीदार कृती समितीच्या सदस्यांना सांगीतले आहे.

दलालांकडुण ठेविदारांशी गुपचुप संपर्क साधण्यात येत असून कोणालाही कळु देवु नका गुपचुप कागदपत्र आणि 2 फोटो व कागदपत्रांवर सह्या करुण आम्हाला द्या अशी शर्त ठेविदारांकडे ठेवण्यात येत असून या बदल्यात आगोदर हे दलाल पैसे मिळवुण देण्याच्या बदल्यात कमीशन म्हणुन ठेविदारां कडुण पैसे देखील उखळत आसल्याची माहिती समोर आली आहे.

खरच संचालकांनी लाजा सोडल्या कि काय ? ठेवीदारांच्या भावनेशी खेळने बंद करा -आणखी किती छळ करणार आहात आता तरी मड्यावरचे लोणी खाण्याचे धंदे बंद करा आशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत ठेवीदार कृती समिती कडुण या घटणेचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान राजस्थानी चे संचालक मंडळ व त्यांना मदत करणाऱ्या पोद्दर स्कुल मधिल बाजारु कारभाऱ्यांसह आणि त्यांना देखील मदत करणाऱ्या सर्वांवर संघटित गुन्हेगारी मकोका लावणयाची मागणी प्रशासनाकडे ठेवीदार कृती समिती करणार आसुण संबंधीत लोकांच्या पुराव्यासह व नाव मोबाईल क्रमांकासह जिल्हा स्तरावरच नाही तर मंत्रालया पर्यंत यासाठीचा पाठपुरावा करुण पोदार शाळेतील मलीदा खाणारे व मल्टीस्टेट मधील कुकार्यात सहभाग असलेल्या अरोपीनां मदत करणाऱ्यांवर देखील मकोका लावण्यात यावा यासाठी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक,पालकमंत्री अजित पवार व गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन या प्रकरणी कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे.

दि. 24/5/24 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आसुण तब्बल 9 महिन्यांपासून फरार असलेले संचालक अटक करण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आसुण ! संचालकां कडुण संबधित पोलीसांना मोठी रक्कम देण्यात आली आसल्याची धकादायक माहिती बाहेर आली आहे.

या मल्टिस्टेट ची घटणा समोर आल्यानंतर केवळ परळी शहरात हाय खाऊन आतापर्यन्त 5 ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे. काहीजण अंथरुणावर खिळून आहेत तर काही ठेवीदारांच्या डोक्यावर परिणाम झाला आसुण अनेकांचे घर संसार उद्धवस्त झाले आहेत,मुला मुलींचे लग्न थांबले आहेत तर काही जनांचे शिक्षण घेणे बंद झालेत तर काहीजन दवाखाण्यात जाण्या पासुण वंचित झाले आहेत.

या संपती पिसाटांच्या हाव्यासापोटी ठेवीदारांच्या मुलभुत गरजा देखील प्रभावित झालेल्या आहेत त्यामुळे ठेवीदारांच्या जगण्याच्या आधिकारावर देखील गद्दा आली आहे

परंतु फरार संचालक मात्र संकटात सुद्धा संधी शोधत आसुण ठेवीदारांना देशोधडीस लाऊण स्वतःच्याच तुंबड्या भरण्यासाठी रोज नव नविन प्रयोग करुन वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून माणुसकीला काळीमा फासण्याचे दुषकर्म या अमानवी व अधर्मी संपत्ती पिसाटां कडुण कांड करणे आणखी हि सुरुच आहे .

दरम्यान ठेवीदारांच्या संयमाची सिमा पार झाली आसुण कृती समिती ठेवीदारांनां समजावत आहे, आम्ही जोपर्यंत बोलत नाही तो पर्यंत शांत राहा,न्यायलयीन लढाई टप्यात आलेली आहे,योग्य वेळी आपण निर्णय घेऊ आसे ठेविदारांना सांगण्यात आले आहे

जर न्याय मिळण्यात अडथळे निर्माण केले किंवा ठेवीदारांसोबत परत काही चुकिचे करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही होऊण प्रथम पुढे येऊ आणि वेळ आली तर न्याय हक्कासाठी सर्वजन मिळुण तन मन धनाणे आपण संघर्ष सुरु ठेवणार असल्याचे ठेवीदार कृती समिती कडून संतप्त ठेविदारांना सांगण्यात आले आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!