दिव्यांग शरद सानप चढले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर
Unique protest by disabled people against District Collector's office

दिव्यांग प्रमाणपत्र दुरुस्तीसाठी उपोषण शंभर टक्के अपंग चढाला बीड जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाच्या भिंतीवर
जिल्हा रुग्णालयात मधील अपंग प्रमाणपत्रातील टक्केवारी मधील प्रकार थांबवा.-शरद सानप
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी दिनांक 10 मार्च 2025 जिल्हा रुग्णालयामधील अपंग बोर्डावरील डॉक्टर कट्टे हाडाचे यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी गेल्या सात दिवसापासून शरद सानप शंभर टक्के अंध व्यक्ती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत उपोषणाची दखल न घेतल्यामुळे आज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बांधलेल्या संरक्षण भिंतीवर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला.
सामाजिक कार्यकर्ते अनिल तुरुकमारे यांच्या मध्यस्थीने जिल्हा शल्य चिकित्सक थोरात यांची संपर्क साधल्यानंतर एका तासानंतर ते खाली उतरले परंतु उपोषण चालूच आहे ते भेटीसाठी सीएस यांच्याकडे गेले आहेत.
बीड जिल्हा शल्यचिकित्सक कमिटीने मुलाच्या दिव्यांग प्रमाणपत्रात ५० टक्के दिले असून, ऑनलाइनला २० टक्के नोंद झाली आहे. ती दुरुस्त करुन देण्यात यावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शरद सानप या दिव्यांग व्यक्तीने सोमवारी उपोषण केले.
जिल्हा शल्यचिकित्सक कमिटीने मुलाला ५० टक्के असलेले ऑफलाइन दिव्यांग प्रमाणपत्रात दिले होते. मात्र ते ऑनलाइन करणाऱ्यांनी यात बदल करुन ५० ऐवजी २० टक्के केले. या संबंधित
अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. या प्रकरणी दोषीवर कारवाई करुन दिव्यांग प्रमाणपत्रात ऑनलाइनला ५० टक्के नोंद करण्यात यावी, अशी मागणी उपोषणकर्ते शरद सानप यांनी केली आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.