क्राईमबीड

बियाणी बाहेतीचे पोद्दार स्कुल म्हणजे ! लावलं रताळु उगवले केळ आणि नाही कुणाचा कुणाला मेळ

The Rajasthani school of Baheti Biyani is like a sugarcane gardener and a quarrelsome fox.

!! राजस्थानी चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित पोदार लर्न स्कुल मध्ये घडताहेत नाट्यमय घडमोडी !!

!! दर चार महिण्याला बदलतेय मैनेजमेंट !! घोटाळे आणि फसवणुकीच्या प्रकारामुळे पालक,विद्यार्थी,आणि ठेवीदार त्रस्त !!

!! धिरज बाहेती कडुण अशोक जैन,हरीश्चंद्र वंगे,कैलास घुगे आणि नविन प्रिंसिपल काशीद नामक व्यकतींच्या विरोधात जाहिर प्रगटण !!

!! जुने प्रिंसिपल बीपी सींग यांच्याकडुण वरील व्यक्तीं विरोधात फसवणुक व शाळेच्या तोडफोड प्रकरणी पोलीस अधिक्षक श्री नवनीत कॉवत यांच्याकडे ऑनलाईन तक्रार दाखल !!

!! धिरज बाहेतीने जाहिर प्रगटणावरुण हात झटकले ! मग धिरज बाहेती च्या नावाने जाहिर प्रगटण कोणी सादर केले ? पोलीसां पुढे नवा पेच 

!!वेगवान मराठी प्रतिनिधी -केशव डी मुंडे!! (उपसंपादक) यांचे कडुण राजस्थानी पोदार शाळेचा चालुघडामोडीवर आधारित इतिवृतांत 👇

प्रति,पोलीस अधीक्षक,बीड, महाराष्ट्र

फिर्यादी – बी. पी. सिंग मुख्याध्यापक राजस्थानी पोदार लर्न स्कूल,परळी-वै.

विषय: मुख्याध्यापकांच्या कार्यालयात अनधिकृत प्रवेश व कुलूप तोडण्याबाबत तक्रार

महोदय,

मी आपल्या लक्षात एक गंभीर बाब आणून देऊ इच्छितो की राजस्थानी पोदार लर्न स्कूल, परळी-वि. येथील मुख्याध्यापक कार्यालयात अनधिकृतरित्या प्रवेश करण्यात आला आहे.

उन्हाळी सुट्टीनंतर मी शाळेत परत आलो असता, माझ्या कार्यालयाचे कुलूप तोडून ते नवीन कुलूप लावण्यात आलेले आढळले. हे सर्व माझ्या पूर्वपरवानगीशिवाय व माझ्या माहितीस न देता करण्यात आले, जे एक गंभीर प्रकारचा अधिकारभंग आहे.

मी २०१६ सालापासून या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष श्री. चंदुलाल बियाणी यांनी मला अधिकृतपणे शाळा व्यवस्थापन व संचालन करण्याची जबाबदारी दिली होती. सद्यस्थितीत ते राजस्थानी मल्टी-स्टेट बँकेशी संबंधित एका प्रकरणात पोलीस चौकशीत सहभागी झाले आहेत.

आमची शाळा, राजस्थानी पोदार लर्न स्कूल, ही सीबीएसईशी संलग्न आहे (अधिसंख्य क्रमांक 1130808, शाळा कोड: 30736). सीबीएसईच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार एका कॅम्पसमध्ये एकाच नावाने व संलग्नतेने एकच शाळा चालवता येते.

तथापि, मला माहिती मिळाली आहे की श्री. अशोक जैन, श्री. कैलाश गुग्गे व श्री. हरीशचंद वांगे यांनी सीबीएसईची पूर्वपरवानगी न घेता शाळेचे नाव बेकायदेशीररीत्या बदलले आहे.

¶ संचालक मंडळाचा नियोजन शुन्य भोंगळ कारभार आणि धरसोडवृत्ती चा उद्रेक भोवला ¶

आगोदर दिपक देशमुख नंतर बंडु मुंडे गंगाखेडकर आणि आता ड्रा वंगे,व कैलास घुगे यांच्या खंद्यावर बंदुक ठेवुण परळीतील सावकार आसलेल्या अशोक जैन च्या हातामध्ये बंदुकीचा ट्रिगर देण्यात आला आहे

परंतु मलिदा संपला की खांदा देणारांनी बंदुक उलटी फिरवली आणि अशोक जैन ट्रिगर चा वापर आपल्यावर दाबु शकतो हे लक्षात येताच संचालक मंडळ खडबडुण उठले आणि अशोक जैन, ड्रा वंगे व कैलास घुगे यांच्या विरोधात धिरज बाहेतीच्या परस्पर  त्याच्या नावाने जाहिर प्रगटण सादर केले !

आणि माजी प्रिंसिपल बिपी सींग याला पुढे करत वरील लोकांवर एसीपी कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे !

¶ वादग्रस्त मनोरुग्ण प्रिंसिपल बिपी सिंग चा भिम प्रताप (पराक्रम) उघडकीस ¶

1 एकतर राजस्थानी पतसंस्थे शी प्रिंसिपल म्हणुन बिपी सिंग चा कसलाही संबंध आणि आधिकार नसताना ठेवीदारांना शाळेतील खर्च जाता उर्वरित रक्कम प्रशासकाच्या खात्यात जमा करण्याचे शपथ घेऊण अश्वासण दिले …

2 दुसरे दिले तर दिले वेळ आल्यावर ते पाळले पण नाही ! उलट चौकशी करण्यासाठी आलेल्या ठेवीदारांना दादागीरीची भाषा वापरुण अपमाणीत केले

3 त्या नंतर झालेल्या प्रकारा बद्दल संभाजी नगर पोलीस स्टेशन परळी येथील पोलीस निरीक्षकां समक्ष दिलगीरी व्यकत करत ठेवीदार कृती समितीचे अध्यक्ष श्री सेवकराम जाधव यांनी वर्षभर अत्यंत मोलाचे सहकार्य केले आसुण झालेला प्रकार गैरसमजातुन झाला आहे त्यामुळे मी कसलीही तक्रार दाखल करणार नसल्याचे सांगीतले

4 परंतु दोन दिवसा नंतर त्याच बिपी सिंग याने त्याच सेवकराम जाधव आणि त्यांच्या सहकार्यांवर गुन्हा दाखल केला

वेगवान मराठीला देण्यात अलेल्या खात्रीलायक वृतानुसार – दि 30 मार्च 2025 रोजी राजस्थानी चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित पोदार लर्निंग इंग्लिश स्कूलच्या प्रिंसिपल पदाचा बिपी सिंग याने राजिनामा दिलेला आसुण तो गंगाखेड येथील एका इंग्लिश स्कूल वर प्रिंसिपल म्हणुन रुजु झालेला आहे

6 त्या नंतर बिपी सिंग याने ड्रा वंगे व कैलास घुगे यांच्या कडे 500 रुपयाच्या बौंड पेपरवर एग्रीमेंट द्वारे पोदार शाळेचा लेखी स्वरूपात अधिकृत ताबा दिला आहे ! एवढच नाही तर तोंडी स्वरुपात देखील व्हिडिओ बनवुन शाळेचा कार्यभार व ताबा हा मी कैलास घुगे यांच्याकडे संपवत आसल्याचे सांगीतले आहे …

7 एवढं सगळ करुण आता तोच बिपी सिंग सांगतोय की माझा परस्पर शाळेचे कूलुप तोडले फर्निचरची मोडतोड केली आणि शाळेवर इतर नावाचा बोर्ड लावुन अनाधिकृत पणे ताबा घेतला आहे आणि त्यामुळे मि संबंधितांवर कारवाई करण्यात यावी आशी विनंती करत आहे ! व्हा रे पट्या

8 मग प्रश्न हा आहे की ज्यावेळी दिपक देशमुख यांनी शाळेतील लाखोची जमा रक्कम जोर जबरदस्तीनी पळवली आणि गंगाखेड च्या बंडु मुंडे याने देखील याच्या डोळ्या समोर शाळे ची मोठ्या प्रमाणात अर्थिक लुट केली तेंव्हा तक्रार दाखल करावी आसे सिंगला का वाटले नाही ?

9 किती खोटे बोलावे आणि किती भ्रष्टाचार करावा याला देखील काही मर्यादा आसते पण ति सगळी मर्यादा बिपी सिंग याने उलांडली आहे

10 एकंदरीत या प्रिंसिपल चे कारणामे पाहता बिपी सिंग हा मनोरुग्ण वृतीचा असल्याचे दिसुण येते त्यामुळे पोलीस प्रशासणाने पुढील पाऊल उचलण्या आगोदर या प्रिंसिपल ची रिमांड काढुण कसुण चौकशी केली पाहिजे

( चौकट )- राजस्थानी चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचलित चंदूलाल बियाणी बद्रीनारायण बाहेती धिरज बद्रिनारायण बाहेती यांच्या नावे आसलेल्या मालमतेवर इशार पावतीच्या आधारे 3 कोटी 84 लाखाचे कर्ज अशोक जैन या परळीतील सावकाराकडुण बियाणी आणि बाहेती यांनी 18 महिण्यापुर्वी 18 महिण्याच्या कालवधी मध्ये परत करण्याच्या अटीवर घेतले गेले

संचालक मंडळ फरार झाल्यानंतर अशोक जैन याने इसार पावतीची ढाल करत संबंधीत स्कुल व मालमतेवर कब्जा केला की संचालकांनी दिला हा ठेवीदारां सह पालकांपुढे रक्ष प्रश्न ?

अशोक जैन यांच्या कडुण पैशाच्या बळावर होतेय कायद्याची पायमल्ली ! मालमता हडप करण्यासाठी वाटेल ते केले जात आहे ! गैरमार्गाने पिटीआर ला नाव लावणे , एमपीआयडी प्रस्तावा मध्ये गेलेली मालमत्ता विक्रीस काढणे,किरायाणे देणे,आणि सब माल अंदर करणे,

एक प्रकारे अशोक जैन यांनी कायदा सुव्यवस्थेचा समोर आव्हान निर्माण केले आसुण आधिकारी हातासी वरुण अशोक जैन हा सब माल अंदर करण्याच्या प्रयत्नात आहे…

बद्रिनारायण बाहेती आणि त्याचं पोरग खुलेआम पोलीसांच्या डोळ्या देखत हुंदडताहेत परंतु मजाल नाही पोलीसांची त्या फरार चोरांना बेड्या ठोकायची

पोदार शाळे बाबतीत ठेवीदार कृती समितीची भुमीका कायम शाळेच्या हिताची •

© परळीच वैभव असलेली पोद्दार स्कुल बंद होण्यास कोण कारणीभूत ? राजस्थानीची जहाज बुडाल्याच्या पहिल्या दिवसापासुन आज पर्यंत ठेवीदार कृती समिती ने विद्यार्थांच्या भविष्याचा विचार केला,प्रसंगी स्वतः चा स्वार्थ बाजुला ठेवुण स्कुल मैनेजमेंट सोबत दोन पाऊलं मागे घेत सतत सहकार्याची भुमीका घेतली

® परंतु स्कूल व्यवस्थापकांनी आणि संचालक मंडळांनी मात्र संकटात संधी शोधण्याचे पाप सातत्याने सुरु ठेवले ! पोद्दार एज्यूकेशन नेटवर्क ची रॉयल्टी का भरली नाही, साधं लाईटबील तुम्ही भरू शकला नाहीत आणि वर थुतर करुण ठेवीदारांच्या नावाने चोरांच्या उलट्या बोंबा मारणे सुरु ठेवले !

कधी पालकांना फितवुण ठेवीदारांच्या विरोधात घालण्याचे केवीलवाणे प्रयत्न केले तर,कधी धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करुण ठेवीदारांना भिती दाखवण्याचे अयशस्वी प्रयत्न केले तर कधी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची ढाल बनवुन ठेवीदारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे उधोग केले !

©परंतु सामाजीक भान आणि वंचित पिडीतांची जान आसलेल्या सामाजीक कार्यकर्ते सेवकराम जाधव यांच्या सक्षम नेतृत्वाखाली ठेवीदार कृती समिती ने संचालक मंडळ आणि पोदार शाळेच्या व्यवस्थापक मंडळाच्या गिधाड धमक्यांना भिक न घालता ठेवीदारांच्या लढ्यासोबतच शाळा,पालक,आणि विद्यार्थांचे हित जपत दुहेरी संघर्ष कायम सुरु ठेवला तो पण कोणाच्याही मदती शिवाय,

© विद्यार्थ्यांची ने आन करणाऱ्या शाळेला लावलेल्या गाड्यावाल्यांचे भाडे दिल्या गेले नाही. पालकांकडून तर फीस जमा झाली. काही शिक्षकांच्या पगारी दिल्या नाहीत. पालकांनी जमा केलेली अनामत रक्कम परत करु शकले नाहीत मग या लबाड लांडग्यांनी वर्षभरातील जमा झालेला पैशाचे काय केले 6 कोटी  नेमके गेले कुठे..?

®  ठेवीदारांनी शाळा बंद करा हा शब्द कधीच वापराला नाही ! शाळा वाचवण्यासाठी स्कुल मैनेजमेंट तर सोडाच पण संचालक मंडळाने जे केले नाही त्यापेक्षा अधिक प्रयत्न ठेवीदार कृती समिती कडुण करण्यात आले ! या उलट संचालक मंडळ आणि स्कुल मैनेजमेंट यांनी संगनमत करून शाळेचे लक्तरं तोडुन शाळा बंद पाडण्याचे महा पाप केले आणि अद्याप हि सुरूच आहे

© आता नवीन सुरु झालेल्या शाळेला सुद्धा ठेवीदारांचा विरोध नाही. आमचेच लेकरं तिकडे शिकणार आहेत या विचारांसोबत ठेवीदार कायम बांधील होते आहेत आणि राहतील हा ठेवीदार कृती समिती चा शब्द होता आहे आणि पुढे हि राहणार आहे

™ परंतु अट एवढीच जागेचे भाडे मात्र प्रशासना कडे जमा झाले पाहिजे हि ठेवीदारांची भूमिका ठाम होती आहे आणि भविष्यात देखील असणार आहे ™

!! एकंदरीत काय तर लावलं रताळु उगवले केळ !! आणि नाही कुणाचा कुणाला मेळ !!

👁️ प्रती-केशव डी मुंडे उप-संपादक वेगवान मराठी मिडीया समुह परळी बीड महाराष्ट्र संपर्क-8888387 622 👁️✒️👁️

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!