नोकरीबीडमहाराष्ट्र

बातमी विद्यार्थांच्या कामाची ! CAST CARTIFICATE VALIDATY च्या संदर्भात मोठी अपडेट

BIG NEWS OF CAST VALIDATY CARTIFICATE ON CANDIDATE

 जात प्रमाणपत्र पडताळणी बाबत समिती कडुण सुचना,SEBC,& OBC प्रवर्गातील विद्यार्थांसह अभियांत्रिकी,वैद्यकीय व इतर व्यवसायिक अभ्यासक्रमां करीता विशेष सुचना जारी 👇 

 बीड दि. 15 ( वेगवान मराठी प्रतिनिधी- केशव डी मुंडे  ) : राज्यातील सध्या सुरू असलेल्या सन 2024-2025 मधील विविध शैक्षणिक संस्थां मधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी (अभियांत्रिकी वैद्यकीय आणि इतर व्यवसायिक अभ्यासक्रमा सहित)

एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील जे उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहेत परंतु विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकलेले नाहीत.

अशा उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय दिनांक 2 मे 2025 अन्वये शासन आदेशाच्या दिनांक पासून अधिक 3 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे.

आधीकचा 3 महिन्याचा कालावधी हा एसईबीसी व ओबीसी प्रवर्गातील ज्या उमेदवारांचे प्रवेश निश्चित झालेले आहे परंतु जात वैधता प्रमाणपत्र विहित वेळेत सादर करू शकले नाहीत

अशा उमेदवारासाठीच राहील. या आधीच्या मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत अशा उमेदवारांचे प्रवेश होऊ न शकल्यास त्या संबंधित उमेदवार जबाबदार राहतील असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे…

वेगवान मराठी न्युज नेटवर्क परळी-बीड महाराष्ट् 8888 387 622 केशव डी मुंडे 

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!