आलीरे आली आता बुलेटस्वारांची बारी ✅

केशव मुंडें वेगवान मराठी परळी –
बीड दि.28/11/2024 जिल्हा वाहतुक शाखेची कारवाहीमा.पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने दिनांक 27/11/2024 संपूर्ण बीड जिल्हयात विशेष मोहिम राबवून रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण होऊन व येणा-या जाणा-या लोकांच्या जिवीतास धोका व इजा निर्माण होईल अशा स्थितीत उभा केल्याचे मिळून आल्याने 214 वाहन
चालकाविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285 प्रमाणे कारवाया करण्यात आल्या. तसेच दिनांक 28/11/2024 रोजी बुलेट मोटार सायकल या वाहनास मोठा आवाज करणारे सायलंन्सर बसविणा-या विरुध्द संपूर्ण बीड जिल्हयात विशेष मोहिम राबवुन 100 बुलेट मोटार सायकल चालकाविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.
सदर विशेष मोहिम मध्ये विना हेल्मेट वाहन चालविणे, वाहनास RTO नियामाप्रमाणे नंबर न टाकणे, वाहनास फॉन्सी नंबर प्लेट बसविणे, विना सिटबेल्ट वाहन चालविणे, वाहनामध्ये अतिरीक्त प्रवाशी वाहतुक करणे, विना इंन्शुरंन्स वाहन चालविणे, लायसन्स जवळ न बाळगणे, विना लायसन्स वाहन चालविणे, मालवाहु वाहनातुन प्रवाशी वाहतुक करणे, ट्रिपलसिट मो सा चालविणे तसेच इतर हेडखाली प्रभावी मोहिम राविण्यात आली आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ.यांच्या आदेशाप्रमाणे मा.अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती तिडके मैडम यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा वाहतुक शाखा बीड व पोलीस स्टेशनकडील वाहतुक अमलदार, यांनी संयुक्तीक कारवाई केली असुण सामान्य नागरीकां कडुण बीड पोलिस प्रशासनाच्या या कामीगिरी बद्दल समाधान व्यकत करण्यात येत आहे