
!!! सावधान तो आलाय !!!
!! परळी तालुक्याच्या सिमे लगत व परळी शहरा पासुण 25 किमी अंतरावर असलेल्या परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरात तो आलाय !!

दि 23 मे 2025 ( वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे सोनपेठ/परभणी )-सोनपेठ शहर परिसरात बिबट्याचा बछड्या सह वावर निदर्शनास आला आसुण शहरी व ग्रामीण नागरीकांसह शेतकरी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे !
सोनपेठ सोनपेठ शहरातील व्यंकटेश्वरा फिलींग सेंटर वर रात्रीच्या सुमारास बिबट्याच्या मादी बछड्यासह आढळुन आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे .
सोनपेठ शहरात प्रवेश करते वेळी सुरवातीलाच असलेल्या व्यंकटेश्वरा फिलींग सेंटर वर रात्रपाळीत काम करणाऱ्या शिवप्रसाद लोंढे यांना दि.२२ रोजी रात्री कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज आला आसता उठुण पाहीले तर कुत्रे पंपावरुन पळुन गेल्याचे त्यांच्या लक्षात आल्या मुळे त्यांनी चिकित्सा म्हणुन

त्यांनी सकाळी सिसीटीव्ही चे फुटेज तपासले असता त्यांना सिसी टिव्हीत रात्री दिड वाजे च्या सुमारास बिबट्या सदृश प्राणी आपल्या पिल्यासह वावरतांना आढळुन आला तर त्याने कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न केल्याने कुत्रा पळुन गेल्याचे दिसले .
या बाबत त्यांनी पंपाचे मालक सुमीत पवार यांना या बाबत कळवले . त्यांनी या बाबत स्थानिक पोलीस व वन विभागाला माहिती दिली.
सोनपेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड वनरक्षक सुरेखा टोम्पे यांनी पेट्रोल पंप व आजुबाजूच्या परीसराची पाहणी केली .
सीसीटीव्हीत बिबट्याच्या सदृश प्राणी आपल्या बछड्यासह दिसुन आला आसुण तो कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतांना दिसला तर गवळी पिंपरी शिवारात त्यांच्या पायचे ठसे आढळुन आले आहेत.

या बाबत पोलीस निरीक्षक सुर्यमोहन बोलमवाड यांनी नागरीकांनी घाबरुन न जाता योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
तर सुरेखा टोंम्पे यांनी या प्राण्याला पकडण्यासाठी कॅमेरा ट्रॅप व इतर आवश्यक ती कारवाई वनविभागा मार्फत वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचे सांगितले.
या वेळी परमेश्वर कदम सुधीर बिंदु प्रा. वसंत सातपुते बाबासाहेब गर्जे, नामदेव जाधव यांच्या सह नागरिक उपस्थित होते.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








