
⊂
नांदगाव मनमाड हा नॅशनल हायवे अत्यंत सुटसुटीत आणि चांगला रस्ता झाल्याने या रस्त्यावर सध्या वाहतूक वाढलेली आहे दरम्यान फुलेनगर येथे एक दुचाकी स्वार आपली दुचाकी वर पत्नीसोबत नांदगावच्या दिशेने मार्गक्रम असताना पाठीमागून त्याच दिशेने भरधावेगाने येणारी कारणे त्यांना जबर धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले जखमींना नांदगाव येथील गुप्ता मेडिकेअर येथे उपचार देण्यात येत आहे. यात कारचालक देखील गंभीर जखमी झाला या घटनेमुळे परिसरात लोकांमध्ये होणारे अपघाताबद्दल चिंता वाढलेली आहे .
दरम्यान या घटने प्रसंगी कार मध्ये काही दारूच्या बाटल्या मिळून आल्याचे समजते यादरम्यान पोलिसांनी घटनेची पाहणी केली असून पुढील कामकाज चालू आहे दिनांक पाच जानेवारी 25 रोजी दुपारी ठीक दोन ते अडीच दरम्यान नांदगाव मनमाड रोडवरील फुलेनगर येथे तिसऱ्या किलोमीटरवर हा अपघात झाला अपघात इतका भयानक होता की पुढे चालणाऱ्या दुचाकी वर कारचालक मागून त्या दुचाकी वर चढून गेला आणि शंभर फूट अंतरावर शेतात जाऊन पलटी झाला यावेळी दुचाकी वरील महिला चेंडू सारखी हावेत उडाली व खाली पडून गंभीर जखमी झाली.
यादरम्यान शेतावर पाणी भरणारे एक शेतकरी या अपघातात बाल-बाल बचावला सदर कार शेतात जाऊन पडल्याने त्या ठिकाणी शेतात रुतली व तिचा वेग मंदावला .
या घटनेमध्ये दुचाकी वरील रमेश बबन मोरे वय 50 सरला बबन मोरे वय 45 हे दोघे गंभीर जखमी झाले रा. नांदगाव श्रीराम नगर असून त्यांच्यासोबत असलेले त्यांची चिमुकली नात रस्त्यावर फेकली गेली तीला भेदरलेल्या अवस्थेत याचमुकलिला तात्काळ फुलेनगर येथील नागरिकांनी उचलून तिला धीर दिला नागरिकांनी या ठिकाणी कांताबाई आणि सुमनबाई या दोन महिलांनी गंभीर जखमी महिलेला पंप केल्याने तिचा जीव वाचला आणि नंतर दवाखान्यात हलवण्यात आले यादरमन फुलेनगर येथील जगधने परिवारातील नागरिकांनी जखमींना उपचारासाठी मदत केली दरम्यान कारचालक हा याचा देखील गंभीर जखमी झालेला आहे .दुसरा व्यक्ती सुरक्षित वाचल्याने वाहनातील मद्यपीच्या बाटल्या घेऊन तो पाळाला असे सांगण्यात आले. दरम्यान नांदगाव पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे
नांदगाव-मनमाड रस्त्यावर फुलेनगर परिसरात अनेक अपघातांच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे या मार्गावरील सुरक्षिततेबाबत चिंता वाढली आहे. उदाहरणार्थ, सप्टेंबर 2024 मध्ये हिरेनगर शिवाराजवळ दोन कारची समोरासमोर धडक झाली, ज्यात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आणि चार जण गंभीर जखमी झाले.
तसेच, मनमाड-नांदगाव रस्त्यावर पानेवाडी जवळ अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीस्वारांना धडक दिली, ज्यामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आणि तीन जण गंभीर जखमी झाले.
या अपघातांमुळे रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाहनचालकांनी वेग मर्यादांचे पालन करणे, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, तसेच रस्त्यावरील अतिक्रमणांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनानेही रस्त्यांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलणे गरजेचे आहे, ज्यामुळे भविष्यात अशा दुर्दैवी घटनांना आळा घालता येईल. कार नंबर
Mh/12 bg 3619 व दुचाकी नंबरmh 41/ax 8316 या दोन वाहनांमध्ये जबर अपघात झाला
