
वेगवान मराठी न्यूज /
नवी दिल्लीः 1 जानेवार 24 राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळा हा मोठ्या दिमाखात 22 जानेवारी रोजी पार पडणार आहे आणि या सोहळ्याची जोरदार तयारी ही रामाच्या भूमीमध्ये म्हणजे आयोध्यात सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचा दोन दिवसापूर्वी लोकार्पण केलं मात्र आता हेच राम मंदिर उडवून देण्याची धमकी आणि उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत योग्य आदित्यनाथ यांना उडून देण्याचे धमकी मिळाली असून उत्तर प्रदेशचे एटीएस प्रमुख अमिताभ यश यांनाही ठार मारण्यात येणार असल्याचं धमकीचा मेल प्राप्त झालेला आहे.
भारतीय किसान म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा मेल पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला. या मेलमध्ये आक्षेपार्ह शब्दाचा भडीमार करण्यात आला आहे. ईमेल पाठवणारा व्यक्तीने स्वत:चे नाव जुबेर हुसैन खान असल्याचे म्हटले आहे.
आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर आपल्या सुरक्षेबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे गौसेवेच्या नावावर आपण शहीद होऊ शकतो. असे अमिताभ यश यांनी म्हटले आहे. त्यामुळे राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची लगबग आणि त्यात ही बातमी पोलीसांसमोर डोकेदुखी ठरणार आहे.
